महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागातर्फे महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांच्या विकासासाठी अनेक योजना राबविल्या जातात. अलीकडच्या काळात आदिवासी विकास विभागातर्फे नागरिकांच्या सोईसाठी व पारदर्शकतेसाठी अनेक योजनांचे डिजिटल रुपांतर केले असून त्यातील एक अत्यंत महत्वाची सुविधा म्हणजे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी (Schedule Tribe Caste Validity)
अनुसूचित जमाती म्हणजे काय ?
महाराष्ट्र राज्यातील नागरिकांचे त्यांच्या पूर्वपार चालत आलेय रूढी परंपरेनुसार वेगवेगळ्या जाती जमातीमध्ये विभाजन करण्यात आलेले आहे. त्यापैकी जे आदी काळापासून ह्या भूमीवर वास्तव्यास आहे, ज्यांची संस्कृती, रूढी, परंपरा, सन-उत्सव हे मूळ प्रवाहापासून वेगळे किंवा पुरातन आहे अश्या लोकांना आदिवासी म्हणून संबोधले जाते. व भारतीय घटनेनुसार आदिवासींची गणना हि अनुसूचित जमाती (Schedule Tribe) मध्ये करण्यात येते.
अनुसूचित जमाती प्रमाणपत्र म्हणजे काय ?
महाराष्ट्र राज्यातील नागरिकांचे भारतीय कायद्यानुसार अनेक वेगवेगळ्या जाती जमातीमध्ये विभागणी केलेली दिसते (उदा. खुला प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास वर्ग, आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्ग. व जाती जमातीनुसार महाराष्ट्र शासनाने शासकीय विभाग तयार केले असून जे त्या त्या संबंधित विभागांतर्गत येणाऱ्या जाती जमातींच्या विकासासाठी विविध योजना राबवून कार्य करत असतात.
महाराष्ट्रातील अनुसूचित जमाती (Schedule Tribe) या जमातीच्या विकासकामांची जबाबदारी हि महाराष्ट्र सरकारच्या आदिवासी विकास विभागाकडे आहे. महाराष्ट्रातील अनुसूचित जमाती कुटुंबात जन्म घेणाऱ्या व्यक्तीस आदिवासी म्हणून ओळखले जाते व त्याची हि ओळख सिद्ध करण्यासाठी कुटुंबातील वडिलधाऱ्या व्यक्तींच्या जातीच्या दाखल्याच्या पुराव्यांनुसार सदर व्यक्तीस आदिवासी विकास विभागातर्फे तहसीलदार (Tehsildar) / उपविभागीय अधिकारी (Sub Divisional Officer / Sub Divisional Magistrate) पदाच्या त्याच्या समतुल्य अधिकार असलेला अधिकाऱ्यातर्फे जातीचा दाखला देण्यात येतो, सदर जातीच्या दाखल्यास अनुसूचित जमाती प्रमाणपत्र म्हणून ओळखले जाते.
अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी म्हणजे काय ?
महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमाती (Schedule Tribe) अंतर्गत येणाऱ्या नागरिकांना भारतीय कायद्यानुसार शिक्षण, सरकारी नोकरी, निवडणूक, सरकारी योजना यामध्ये काही प्रमाणात आरक्षण दिलेले आहे. सदर आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी व्यक्तीस तो अनुसूचित जमाती मध्ये मोडतो हे सिद्ध करून देणे आवश्यक असते, त्यासाठी अनुसूचित जमाती प्रमाणपत्र हे मुख्य कागदपत्र मानले जाते. परंतु अनेक समाजकंटकांद्वारे अनुसूचित जमाती अंतर्गत शासनातर्फे मिळणारे लाभ मिळवून घेण्याच्या उद्देशाने खोटी अनुसूचित जमाती प्रमाणपत्र सादर केली जातात. अश्या प्रकारांना आळा घालण्यासाठी शासनातर्फे जात प्रमाणपत्र छाननी समिती ची स्थापना करण्यात आलेली असून, या समितीद्वारे अनुसूचित जमाती अंतर्गत येणाऱ्या नागरिकांच्या प्राप्त अर्जानुसार त्यांच्या अनुसूचित जमाती प्रमाणपत्राची कसून चौकशी केली जाते, ज्या अंतर्गत अर्जदाराच्या वडलांचे, आजोबांचे, पणजोबांचे जुने कागदपत्र व सरकारी नोंदवहीतील रेकॉर्ड्स ची तपासणी केली जाते जसे कि च्या रक्तातील नातेवाईकांचे जातीचे दाखले, जात पडताळणी प्रमाणपत्रे, शाळा सोडायचे दाखले, जन्म मृत्यू नोंद, गाव नमुना १४, आदिवासी जमीन धारक असल्यास जुने ७/१२ चे दाखले व फेरफार व इतर कागदपत्रे. अश्या प्रकारे खऱ्या अनुसूचित जमाती प्रमाणपत्र धारकाची ओळख पटल्यानंतर त्यास जात वैधता प्रमाणपत्र देण्यात येते. अश्या प्रकारे खरे आदिवासी शोधून त्यांच्या अनुसूचित जमाती प्रमाणपत्राची चौकशी करून जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध करून देणे या प्रक्रियेस अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी असे म्हणतात
महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागातर्फे प्रामुख्याने शिक्षण, सरकारी नोकरी व निवडणूक ह्या गोष्टीसाठी जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रकरणे विचारत घेतली जातात. आपले अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी प्रकरण कसे करावे, लागणारी कागदपत्रे, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया या संबंधित सविस्तर माहिती या पोस्ट द्वारे आपण जाणून घेणार आहोत
अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी करण्यापूर्वीची पूर्व-तयारी
- आपल्याकडे असलेले अनुसूचित जमाती प्रमाणपत्र हे FORM C स्वरूपाचे आहे याची खात्री करून घ्या.
- आपल्याकडे असलेले अनुसूचित जमाती प्रमाणपत्र हे तहसीलदार (Tehsildar) / उपविभागीय अधिकारी (Sub Divisional Officer / Sub Divisional Magistrate) यांच्या कार्यालयामार्फत अधिग्रहित केलेले आहे कि नाही याची खात्री करून घ्या.
- आपल्याकडे असलेले अनुसूचित जमाती प्रमाणपत्रावर Outward No / MRC No, बारकोड क्रमांक, जातीच्या दाखला प्रदान केल्याचा पूर्ण दिनांक (DD/MM/YYYY), सक्षम अधिकाऱ्याची डिजिटल स्वाक्षरी, प्रमाणपत्र निर्गमित करणाऱ्या अधिकाऱ्याचा हुद्दा नमूद आहे कि नाही हे तपासून घ्या
- आपल्याकडे असलेले अनुसूचित जमाती प्रमाणपत्रावर आपले नाव हे आधार कार्ड, इयत्ता १० वी गुणपत्रक, अधिवास प्रमाणपत्र व इतर महत्वाच्या कागदपत्रांनुसार बरोबर आहे कि नाही याची खात्री करून घ्या यदा कदाचित जर आपल्या जातीच्या दाखल्यात बदल असेल तर आपण नवीन जातीच्या दाखला काढून त्यानंतर ज्जात पडताळणीसाठी अर्ज करावा, जेणेकरून भविष्यात नावात बदल असल्यामुळे महाविद्यालयीन प्रवेश, सरकारी नोकरी किंवा निवडणूक सारख्या महत्वाच्या गोष्टीना मुकावे लागणार नाही.
- आपल्याकडे असलेले अनुसूचित जमाती प्रमाणपत्रावर आपल्या जमातीचे नाव बरोबर असल्याची खात्री करून घ्या (उदा. कोळी महादेव जमातीचा उल्लेख महादेव कोळी असा असल्यास, KOKNA जमातीचे स्पेलिंग KOKANA असे असल्यास) (जमातींच्या नावाच्या यादी साठी येथे क्लिक करा)
- ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवाराकडे शिफारस पत्र असणे गरजेचे आहे
- ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवाराकडे १०० रुपये किमतीच्या बॉंड वर वंशावळ व प्रतिज्ञापत्र नमुना “फ” मधील शपथपत्रामध्ये खालील प्रमाणे विस्तृत वंशवृक्ष / वंशावळीची माहिती द्यावी

- उमेदवाराकडे अलीकडच्या काळात काढलेला पासपोर्ट आकाराचा फोटो असणे गरजेचा आहे, ऑनलाईन अर्ज सादर करतांना उपलोड केलेला फोटो हा जात पडताळणी प्रमाणपत्रावर छापील स्वरुपात येतो
अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
वरीलप्रमाणे सर्व कागदपत्रांची पूर्तता पूर्ण झाल्यानंतर आपण जात पडताळणी च्या प्रक्रियेस सुरवात करू शकतो
अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी संकेतस्थळ
आदिवासी विकास विभागातर्फे नागरिकांना पारदर्शक व जलद सुविधा उपलब्ध होण्याच्या उद्देशाने अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया ऑनलाईन उपलब्ध करून दिलेली आहे. सदर प्रणालीस आदी प्रमाण प्रणाली असे संबोधले जाते, या प्रणालीचा वापर करून नागरिक आपल्या प्रमाणपत्राच्या पडताळणी करीता ऑनलाईन अर्ज सादर करू शकता, त्याचप्रमाणे आपल्या अर्जाची प्रक्रिया कोणत्या टप्प्यावर आहे याची माहिती ऑनलाईन घेऊ शकता, प्रणालीमार्फत नागरिकांना त्यांच्या अर्जासंबंधी स्थिती एस.एम.एस व इमेल द्वारे पुरवली जाते. जात पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वैधता प्रमाणपत्र ऑनलाईन PDF स्वरुपात डाऊनलोड करता येते.
आदी प्रमाण प्रणाली चे अधिकृत संकेतस्थळ : https://etribevalidity.trti-maha.in
अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
१) आपल्या संगणकाचा वापर करून आदी प्रमाण प्रणाली चे अधिकृत संकेतस्थळ उघडावे. संकेतस्थळावर उजव्या बाजूस लॉग इन करण्याचा पर्याय दिलेला आहे त्याच्या खालोखाल नवीन युजर नोंदणी (New user? Register here) च्या पर्यायावर क्लिक करा

२) नवीन युजर नोंदणी (New user? Register here) ह्या पेजवर आपणास आपली माहिती अचूक भरायची आहे जसे कि
- Purpose(उद्देश) : आपणास जात पडताळणी प्रमाणपत्र कोणत्या उद्देशासाठी पाहिजे आहे (शिक्षण, सरकारी नोकरी, निवडणूक) आपल्या गरजेप्रमाणे योग्य तो पर्याय निवडा
- Gender(लिंग) व Salutation(अभिवादन) : योग्य तो पर्याय निवडावा
- First name(पहिले नाव), Middle name(मधले नाव), Last name(आडनाव) : या ठिकाणी अर्जदाराने अनुसुचित जमाती प्रमाणपत्रावर जसे आहे तसे नाव टाईप करावयाचे आहे. लक्षात घ्या कि या ठिकाणी आपण जसे नाव टाकणार आहात तसेच नाव आपल्या जात पडताळणी प्रमाणपत्रावर येणार आहे, जर आपल्या नुसुचित जमाती प्रमाणपत्रावरील नाव चुकले असल्यास आपण ते दुरुस्त करून मगच जात पडताळणी साठी अर्ज करावा.
- विवाहित महिला उमेदवार असेल तर अर्जदाराने आपल्या वडिलांकडील नावाची नोंद करायची आहे.
- UID (Aadhaar | आधार क्रमांक) : अज्दाराने आपला आधार कार्ड क्रमांक अचूक नमूद करायचा आहे. आदी प्रमाण प्रणाली द्वारे आधार कार्ड च्या व्हेरिफिकेशन साठी ए. आय. (Artificial Intelligence) तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. त्यामुळे अर्जदाराने आपला आधार्क्रमांक अचूक नोंदविणे गरजेच आहे.
- Email ID (ई – मेल आयडी) व Mobile (मोबाइल क्रमांक) : आदी प्रमाण प्रणाली द्वारे भविष्यात आपल्या अर्जासंबंधी पत्र व्यवहारासाठी आपल्या ई – मेल आयडी व मोबाइल क्रमांक चा वापर केला जातो त्याच प्रमाणे अर्ज करतांना ई – मेल आयडी हा वापरकर्ता नाव (Username) म्हणून वापरला जातो त्यामुळे अर्जदाराने Email ID (ई – मेल आयडी) व Mobile (मोबाइल क्रमांक) अचूक नमूद करणे गरजेचे आहे त्याच प्रमाणे नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येणारा OTP हा इ-मेल मोबाईलवर येतो त्यामुळे आपल्या इ-मेल चे स्टोरेज फुल नाही व त्यावर नवीन मेल प्राप्त होऊ शकता याची खात्री करून घ्या.
- Password (पासवर्ड) : अर्जदाराने पासवर्ड ची पूर्तता करतांना पासवर्ड ची वर्ण लांबी किमान ८ असणे गरजेचे आहे त्याच प्रमाणे त्यात एक कॅपिटल वर्ण, एक लहान वर्ण, एक संख्या आणि एक विशेष वर्ण असणे देखील गरजेचे आहे (उदा. Pass@1234 / Yourname@BirthDate)
- वरीलप्रकारे सर्व माहिती नमूद केल्यानंतर Next या पर्यायावर क्लिक करावे

- Next या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपण नमूद केलेल्या Email ID (ई – मेल आयडी) व Mobile (मोबाइल क्रमांक) वर OTP प्राप्त होतील सदर OTP अचूक नमूद करून Submit या पर्यायावर क्लिक करावे

- अश्या प्रकारे अर्जदाराची आदी प्रमाण प्रणाली वर नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली, अर्जदाराने नोंदणी करण्यासाठी वापरलेला Email ID (ई – मेल आयडी) व पासवर्ड चे जतन करून ठेवणे आवश्यक आहे.
- नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुन्हा आपल्या संगणकाचा वापर करून https://etribevalidity.trti-maha.in हे संकेतस्थळ उघडावे, व उजव्या बाजूला असलेल्या Login to your Account सेक्शन मध्ये नोंदणी करतांना वापरलेला Email ID (ई – मेल आयडी) व पासवर्ड त्याच प्रमाणे कॅप्चा (CAPTCHA) कोड टाकावा व लॉग इन करावे.

- आपल्या खात्यात लोगिन केल्यानंतर सर्वात वर आपणास ७ पायऱ्या (Steps) दिसतील, ज्यात
- Applicant details (अर्जदाराचा तपशील)
- Address details (पत्त्याचा तपशील)
- Education details (शैक्षणिक तपशील)
- Family details (कुटुंबाचा तपशील)
- Family migration details (कुटुंबाच्या स्थलांतराचा तपशील)
- Family caste/tribe validity details (कुटुंबाच्या जात/जमात वैधतेचा तपशील)
- Upload document (दस्तऐवज अपलोड करा)

- सर्वप्रथम अर्जदारास Applicant details (अर्जदाराचा तपशील) भरावयाचा असतो तो कसा भरायचा ते स्टेप बाय स्टेप बघुया
- अर्जदाराने नोंदणी करतांना नमूद केल्याप्रमाणे Salutation (अभिवादन), Applicant’s first name (अर्जदाराचे नाव), Applicant’s middle name (अर्जदाराचे वडिलांचे/पतीचे नाव), Applicant’s last name (अर्जदाराचे आडनाव), Mobile Number (मोबाईल क्रमांक) हि माहिती आधीच उपलब्ध असते त्यामुळे अर्जदार त्यात बदल करू शकत नाही.
- Marital status (वैवाहिक स्थिती) : या मध्ये अर्जदाराने आपल्या वैवाहिक स्थिती बद्दल योग्य ती माहिती द्यावी.
- Applicant name as per tribe certificate (जमात प्रमाणपत्राप्रमाणे अर्जदाराचे नाव) : या ठिकाणी अर्जदाराने आपल्या अनुसुचित जमाती प्रमाणपत्रावर जसे आहे तसे नाव टाईप करावयाचे आहे जर प्रमाणपत्रावरील नाव First name(पहिले नाव), Middle name(मधले नाव), Last name(आडनाव) अश्या स्वरुपात असेल तर त्ते तसे नमूद करावे किंवा जरा नाव Last name(आडनाव), First name(पहिले नाव), Middle name(मधले नाव) असे असेल तर ते तसे नमूद करावे
- Mobile Number (मोबाईल क्रमांक) : अर्जदाराने नोंदणी करतांना नमूद केल्याप्रमाणे हि माहिती आधीच उपलब्ध असते त्यामुळे अर्जदार त्यात बदल करू शकत नाही.
- Is this your WhatsApp number? (हा तुमचा व्हॉट्सॲप क्रमांक आहे का?) : या ठिकाणी आधीच नमूद केलेला मोबाईल क्रमांक हा आपण व्हॉट्सॲप साठी वापरत असाल तर Yes पर्याय निवडावा नसेल वापरत तर No हा पर्याय निवडावा, No पर्याय निवडल्यास व्हॉट्सॲप साठी जो मोबाईल क्रमांक आपण वापरता तो नमूद करावा, जेणेकरून भविष्यात आपणास आपल्या अर्जाची स्थिती व्हॉट्सॲप देखील कळू शकेल.
- Date of Birth (जन्म तारीख) : अर्ज्दारांन्ने आपली जन्म तारीख अचूक नमूद करावी.
- Birth Place (जन्म ठिकाण) : अर्जदाराने आपले जन्म ठिकाण अचूक नमूद करावे.
- Category Applied (अर्ज केलेली प्रवर्ग श्रेणी) : या ठिकाणी Scheduled Tribes हा पर्याय आधीपासूनच निवडलेला असेल त्यात कोणताही बदल करण्याची आवशकता नाही.
- Caste/Tribe Applied (अर्ज केलेली जात/जमात) : या ठिकाणी अर्जदाराने आपली जमात अचूक निवडायची आहे (उदा. कोकणा, भिल्ल, पारधी, वसावा, गोंड).
- Caste/Tribe certificate MRC or Outward number (जात/जमात प्रमाणपत्राचा एमआरसी (MRC) किंवा जावक क्रमांक) : या ठिकाणी अर्जदाराने आपल्या जात/जमात प्रमाणपत्रावरील MRC no किंवा Outward no अचूक नमूद करावा.
- Caste/Tribe certificate barcode number (जात/जमात प्रमाणपत्राचा बारकोड क्रमांक) : या ठिकाणी अर्जदाराने आपल्या जात/जमात प्रमाणपत्रावरील बारकोड क्रमांक अचूक नमूद करावा.
- Caste/Tribe certificate issuing date (जात/जमात प्रमाणपत्र निर्गमित केल्याचा दिनांक) : या ठिकाणी अर्जदाराने आपल्या जात/जमात प्रमाणपत्रावरील Issue Date अचूक निवडावी.
- Caste/Tribe certificate issued from district (जात/जमात प्रमाणपत्र निर्गमित केलेला जिल्हा) : या ठिकाणी अर्जदाराने आपले जात/जमात प्रमाणपत्र कोणत्या जिल्ह्यातून प्राप्त केले आहे तो जिल्हा निवडावा.
- Caste/Tribe certificate issued from taluka (जात/जमात प्रमाणपत्र निर्गमित केलेला तालुका) : या ठिकाणी अर्जदाराने आपले जात/जमात प्रमाणपत्र कोणत्या तालुक्यातून प्राप्त केले आहे तो तालुका निवडावा.
- Designation of certificate issuing authority (प्रमाणपत्र निर्गमित करणाऱ्या प्राधिकाऱ्याचे पदनाम) : या ठिकाणी अर्जदाराने आपले जात/जमात प्रमाणपत्र कोणत्या अधिकाऱ्यामार्फत निर्गमित केले आहे ते निवडावे.
- Mother tongue (मातृभाषा) : अर्जदाराने आपली मातृभाषा निवडावी.
- Regional dialect (प्रादेशिक बोलीभाषा) : अर्जदाराने आपण राहत असेलेल्या भागात जी बोली भाषा बोलली जाते ती बोली भाषा नमूद करावी (उदा. कोकणी, गोंडी, भिल्ली, वारली, कोरकू, कोलामी, कातकरी, पावरा आणि मावची). जर आपणास बोली भाषेचे ज्ञान नसेल तर आपण मराठी अस नमूद करू शकता.
- God/Goddess name (देव/देवतेचे नाव) : अर्जदाराने आपल्या कुटुंबातील पूर्वजांपासून पूजन करीत असेलल्या कुळ दैवतांचे नावे नमूद करावी (उदा. आई देवमोगरा माता, याहामोगी माता, हिरवा देव, डोंगऱ्या देव, वाघदेव, नागदेव ई.)

- Name of the Document on which Caste/Tribe Certificate is Obtained from Competent Authority (सक्षम प्राधिकाऱ्याकडून जात/जमात प्रमाणपत्र ज्या कागदपत्राच्या आधारे मिळवले आहे त्या कागदपत्राचे नाव)
- अर्जदाराने जात/जमात प्रमाणपत्र (Caste Certificate) काढतांना अर्जासोबत कोणकोणते कागदपत्रे जोडले होते ते सिलेक्ट करा. (आपण सिलेक्ट केलेली कागदपत्रे आपल्या जात पडताळणीच्या वेळेस सादर करावयास लागू शकता त्यामुळे जी कागदपत्रे आपल्याकडे उपलब्ध आहे तीच कागदपत्रे निवडा)

- Five surnames of the applicant’s relatives / community. (अर्जदाराच्या नातेवाईकांची / समाजाची पाच आडनावे.) : अर्जदाराने आपल्या नातेसंबंधातील 5 वेगवेगळी आडनावे नमूद करावी. व Save & Next वर क्लिक करावे
- अश्या प्रकारे Applicant details (अर्जदाराचा तपशील) मधील सर्व माहिती भरावी

- त्यानंतर Address details (पत्त्याचा तपशील) हि माहिती कशी भरावी हे बघूया
- Address details (पत्त्याचा तपशील) या सेक्शन मध्ये अर्जदारास Address of Applicant /Applicant’s Father/Grandfather/Great-Grandfather was residing as on/before 6th September 1950. (अर्जदार / अर्जदाराचे वडील / आजोबा / पंजोबा ६ सप्टेंबर १९५० रोजी किंवा त्यापूर्वी ज्या पत्त्यावर राहत होते तो पत्ता.) म्हणजे अर्जाराचे पूर्वज ०६ सप्टेंबर १९५० पूर्वी ज्या पत्त्यावर राहत होते तो पत्ता अचूक नमूद करायचा आहे.
- त्यानंतर Correspondence address is same as permanent address? (पत्राचाराचा पत्ता आणि कायमचा पत्ता एकच आहे का?) असा प्रश्न दिसेल आपण आजही जर ०६ सप्टेंबर १९५० च्याच पत्त्यावर वास्तव्यास असाल तर या ठिकाणी Yes हा पर्याय निवडावा, जेणेकरून आदिवासी विकास विभागातर्फे आपल्या जात पडताळणी संदर्भात होणारे लेखी स्वरूपाचे पत्र व्यवहार त्याच पत्त्यावर होतील, ह्रापल्या ०६ सप्टेंबर १९५० च्याच पत्त्यावर वास्तव्यास नसाल किंवा आपल्याला लेखी पत्र व्यवहारासाठी दुसरा पत्ता नमूद करायचा असेल तर No हा पर्याय निवडून त्या ठिकाणी पत्र व्यवहाराचा पत्ता नमूद करावा.
- अर्जदाराने आपल्या गरजेप्रमाणे पर्याय निवडून व अचूक पत्ता नमूद करून Save & Next पर्याय निवडावा

- Education details (शैक्षणिक तपशील) या सेक्शन मध्ये अर्जदारास आपली शैक्षणिक माहिती पुरवावी लागते ज्यात Primary Education (प्राथमिक शिक्षण), Secondary Education (माध्यमिक शिक्षण), Higher Education (उच्च शिक्षण), Other (इतर) अश्या क्रमानुसार अर्जदाराने माहिती नमूद करणे अपेक्षित आहे
- उदा. प्राथमिक शिक्षण हा पर्याय निवडल्या नंतर
- Name of educational institute and address : उमेदवाराने प्राथमिक शिक्षण कोणत्या शाळेत पूर्ण केले त्या शाळेचे नाव व संपूर्ण पत्ता.
- : प्राथमिक शाळेत प्रवेश घेतल्याचे साल (वर्ष).
- : प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्याचे किंवा प्राथमिक शाळा सोडल्याचे वर्ष.
- Education status : प्राथमिक शिक्षण पूर्ण केले, चालू आहे कि सोडून दिले त्याबद्दलची माहिती.
- अश्या प्रकारे अर्जदाराने पूर्ण केलेल्या Secondary Education (माध्यमिक शिक्षण), Higher Education (उच्च शिक्षण), Other (इतर) अभ्यासक्रमाची नोंद करणे गरजेच आहे.
- शैक्षणिक तपशील पूर्ण नमूद केल्यानंतर Save & Next पर्याय निवडावा

- त्यानंतर Family details (कुटुंबाचा तपशील) सेक्शन मधील माहिती कशी भरावी याची माहिती घेऊ
- Father First Name (वडिलांचे नाव ) : या ठिकाणी अर्जदाराने आपल्या वडिलांचे प्रथम नाव आपल्या जातीच्या दाखल्या वर जसे असेल तसे नमूद करावे
- Father Middle Name (वडिलांचे मधले नाव) : या ठिकाणी अर्जदाराने आपल्या वडिलांचे मधले नाव आपल्या जातीच्या दाखल्या वर जसे असेल तसे नमूद करावे
- Father Last Name (वडिलांचे आडनाव) : या ठिकाणी अर्जदाराने आपल्या वडिलांचे आडनाव आपल्या जातीच्या दाखल्या वर जसे असेल तसे नमूद करावे
- Grandfather First Name (आजोबांचे नाव) : या ठिकाणी अर्जदाराने आपल्या आजोबांचे नाव नमूद करावे
- Grandfather Middle Name (आजोबांच्या वडिलांचे नाव) : या ठिकाणी अर्जदाराने आपल्या आजोबांच्या वडिलांचे नाव नमूद करावे
- Grandfather Last Name (आजोबांचे आडनाव) : या ठिकाणी अर्जदाराने आपल्या आजोबांचे आडनाव नमूद करावे

- Permanent Address of Father (If Father is not alive, then please mention full address of his last Residence) (वडिलांचा कायमचा पत्ता (वडील हयात नसल्यास, त्यांच्या शेवटच्या निवासाचा पूर्ण पत्ता नमूद करावा)) : या ठिकाणी अर्जदाराचे वडील ज्या ठिकाणी वास्तव्यास आहे तो पत्ता नमूद करावा, यदा कदाचित जर अर्जदाराचे वडील मयत असतील तर त्यांच्या शेवटच्या वास्तव्याचा पत्ता नमूद करावा.
- Office / Business Address (कार्यालय / व्यवसायाचा पत्ता) : अर्जदाराचे वडील जर सरकारी किंवा खाजगी नोकरीत असतील तर त्यांच्या कार्यालयाचा पत्ता नमूद करावा जर त्यांचा स्वताचा व्यवसाय असेल तर व्यवसायाचा पत्ता नमूद करावा.
- Contact Number (संपर्क क्रमांक) : अर्जदाराच्या वडिलांचा संपर्क क्रमांक नमूद करावा
- Inherited Profession of Family (कुटुंबाचा पारंपरिक/वंशपरंपरागत व्यवसाय) : अर्जदाराचे कुटुंब वंशपरंपरागत कोणते काम करत आलेले आहे त्याचा उल्लेख करावा (उदा. शेती, शेतमजुरी, कातकरी, मासेमारी, पशुपालन ई.)

- Is Applicant’s Father Literate? * (अर्जदाराचे वडील साक्षर आहेत का? *) : या ठिकाणी जर अर्जदाराचे वडील साक्षर असतील तर त्यांची शैक्षणिक माहिती भरावी
- वरील प्रकारे सर्व माहिती भरून झाल्यानंतर Save & Next पर्याय निवडावा
- अश्या प्रकारे आपण Family details (कुटुंबाचा तपशील) हा भाग पूर्ण केला
- त्यानंतर Family migration details (कुटुंबाच्या स्थलांतराचा तपशील) या सेक्शन मध्ये अर्जदाराने पुढीलप्रमाणे माहिती भरावी
- Is Applicant / Applicant’s family migrated to Maharashtra State? (अर्जदार / अर्जदाराचे कुटुंब महाराष्ट्र राज्यात स्थलांतरित झाले आहे का?) : जर अर्जदार किंवा अर्जदाराचे कुटुंब हे मुळचे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी नाही परंतु ते इतर राज्यातून महाराष्ट्रात स्थलांतरित झालेले असल्यास Yes हा पर्याय निवडावा किंवा No हा पर्याय निवडावा

- Yes हा पर्याय निवडल्यास अर्जदार / अर्जदाराचे कुटुंब महाराष्ट्र राज्यात कोणत्या राज्यातून स्थलांतरित झाले आहे ते निवडावे.
- कोणत्या वर्षी स्थलांतरित झाले आहे ते निवडावे.
- काबर स्थलांतरित झाले त्याचे कारण निवडावे.
- Native Place Migration (मूळ गावाकडून स्थलांतर) या सेक्शन मध्ये पुढीलप्रमाणे माहिती भरावी
- Is Applicant / Applicant’s family left the native place (अर्जदार / अर्जदाराच्या कुटुंबाने मूळ गाव सोडले आहे का?) : अर्जदाराने जर ६ सप्टेंबर १९५० च्या वास्तव्याचे गाव सोडून जर इतर ठिकाणी वास्तव्यास गेला असेल तर Yes निवडावे जर त्याच मूळ गावी वास्तव्यास असेल तर No निवडावे

- Yes हा पर्याय निवडल्यास कुटुंबातील कोन्तु व्यक्ती स्थलांतरित झाली ते निवडावे
- कोणत्या वर्षी स्थलांतरित झाले ते निवडावे
- काबर स्थलांतरित झाले ते निवडावे
- Whether Applicant/Applicant’s family holding house/land at native place? (अर्जदार/अर्जदाराच्या कुटुंबाची मूळ गावी घर/जमीन आहे का?) : अर्जदाराच्या नवे किंवा अर्जदाराच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावे जर आदिवासी शेतजमीन असेल तर Yes हा पर्याय निवडावा जर नसेल तर No हा पर्याय निवडावा

- जर Yes हा पर्याय निवडल्यास Name of the relative who is residing at native place currently? (सध्या मूळ गावी राहणाऱ्या नातेवाईकाचे नाव?) : या ठिकाणी मूळ गावी राहणाऱ्या नातेवाईकाचे नाव नमूद करावे
- Relation with the relative residing at native place (मूळ गावी राहणाऱ्या नातेवाईकाशी असलेले नाते) : या ठिकाणी मूळ गावी राहत असलेल्या नातेवाईकासोबत अर्जदाराचे नाते निवडावे
- Address of the relative staying at Native place (मूळ गावी राहणाऱ्या नातेवाईकाचा पत्ता) : आपल्या मूळ गावचा सविस्तर पत्ता नमूद करावा
- Contact Number of Relative (नातेवाईकाचा संपर्क क्रमांक) : मूळ गावी राहत असलेल्या नातेवाईकाचा संपर्क क्रमांक नमूद करावा
- Email Address of Relative (नातेवाईकाचा ईमेल पत्ता) : मूळ गावी राहत असलेल्या नातेवाईकाचा ईमेल नमूद करावा
- वरील प्रकारे सर्व माहिती भरून झाल्यानंतर Save & Next पर्याय निवडावा
- Family Caste/Tribe Validity Details (कुटुंबातील सदस्यांच्या जात/जमात वैधता प्रमाणपत्राचा तपशील) या सेक्शन मध्ये अर्जदाराने आपल्या रक्ताच्या नातेसंबंधातील ज्या व्यक्तींची जात पडताळणी झाली आहे त्याची माहिती नमूद करावी
- Whether scrutiny of the Caste/Tribe certificate of any member of the family has done earlier? (कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या जात/जमात प्रमाणपत्राची पडताळणी यापूर्वी झाली आहे का?) या ठिकाणी जर अर्जदाराच्या कुटुंबातील सदस्याची जात पडताळणी झाली असेल तर Yes पर्याय निवडावा अन्यथा No पर्याय निवडावा

- Yes हा पर्याय निवडल्यास
- Name of Relative (नातेवाईकाचे नाव) : ज्या नातेवाईकाची जात पडताळणी पूर्ण झाली आहे अश्या नातेवाईकाचे नाव नमूद करावे.
- Relation with applicant (अर्जदाराशी असलेले नाते) : जात पडताळणी पूर्ण झालेल्या नातेवाईकाशी अर्जदाराचे नाते नमूद करावे.
- Scrutiny Committee (पडताळणी समिती) : नातेवाईकाची जात पडताळणी प्रक्रिया कोणत्या जात प्रमाणपत्र छाननी समिती मार्फत करण्यात आली त्याचे नाव.
- Select Reason for Scrutiny (पडताळणीचे कारण निवडा) : नातेवाईकाने जात पडताळणी कोणत्या कामासाठी केली ते कारण (उदा. शिक्षण, निवडणूक, सरकारी नोकरी, ई.)
- When verification took place(YYYY)? (पडताळणी कधी झाली (वर्ष)?) : नातेवैकाची जात पडताळणी कोणत्या वर्षी झाली ते नमूद करावे.
- Relative’s Caste/Tribe Validity Certificate No. (नातेवाईकाच्या जात/जमात वैधता प्रमाणपत्राचा क्रमांक) : नातेवाईकाच्या जात पडताळणी प्रमाणपत्राचा क्रमांक नमूद करावा.
- Date of issue of Caste/Tribe Validity Certificate (जात/जमात वैधता प्रमाणपत्र मिळाल्याचा दिनांक) : नातेवाईकाच्या जात पडताळणी प्रमाणपत्र निर्गमित केल्याचा दिनांक.
- Upload Relative’s Validity Certificate (नातेवाईकाचे वैधता प्रमाणपत्र अपलोड करा) : नातेवाईकाची वैधता प्रमाणपत्र ची स्कॅन प्रा उपलोड करावी.
- If Rejected give it’s details (नकार दिला असल्यास, त्याचा तपशील द्या) : अर्जदाराच्या नातेवाईकाने वैधता प्रमाणपत्र साठी अर्ज सदर केला असेल परंतु जात प्रमाणपत्र छाननी समिती मार्फत त्यांचा अर्ज रद्द केला गेला असल्यास त्याबद्दल माहिती नमूद करावी.

- If applicant has applied for Caste/Tribe validity certificate before any committee in State of Maharashtra? (अर्जदाराने महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही समितीसमोर जात/जमात वैधता प्रमाणपत्रासाठी यापूर्वी अर्ज केला आहे का?) : अर्जदाराने स्वतः याआधी वैधता प्रमाणपत्र साठी महाराष्ट्रात इतर कुठे जात प्रमाणपत्र छाननी समिती समोर अर्ज सादर केला असल्यास त्याची माहिती नमूद करावी जसे कोणत्या जात प्रमाणपत्र छाननी समिती समोर अर्ज सदर केला होता कोणत्या तारखेस केला होता समितीमार्फत अर्ज मंजूर करण्यात आला कि रद्द करण्यात आला.
- वरील प्रकारे सर्व माहिती भरून झाल्यानंतर Save & Next पर्याय निवडावा
- Upload document (दस्तऐवज अपलोड करा) या सेक्शन मध्ये आपण कागदपत्रे कसे उपलोड करायचे याबद्दल जाणून घेऊ
- आदी प्रमाण प्रणाली कागदपत्रे उपलोड
- आदी प्रमाण प्रणाली फक्त PDF स्वरूपातील कागदपत्रे स्वीकारते
- आपल्या PDF फाईल ची साईज हि 512KB पेक्षा जास्त असू नये याची काकालाही घ्यावी
- आपली मूळ कागदपत्रे कि संगणकावर स्कॅनर चा वापर करून 300 DPI ने स्कॅन केलेली असावीत, मोबाईल च्या कॅमेरा चा वापर करून काढलेले फोटो किवा मोबाईल च्या स्कॅनर चा वापर करून बनविलेले PDF चालणार नाही
- कागदपत्रे सरळ असावीत स्कॅन करताना ते वाकडे तिकडे होऊ नये उंची दक्षता घ्या त्याच प्रमाणे कागदपत्रांवरील मजकूर स्पष्ट दिसला पाहिजे अक्षरे स्पष्ट व वाचनीय असावीत
- आदी प्रमाण प्रणाली तर्फे कागदपत्रांच्या चानांनी साठी ए. आय. (Artificial Intelligence) चा वापर केला जातो त्यामुळे कागदपत्रांवरील शिक्के स्वाक्षरी व मजकूर स्पष्ट असल्याची खात्री करून घ्या
- आदी प्रमाण प्रणाली कागदपत्रे उपलोड
- कागदपत्रे अपलोड सेक्शन मध्ये उमेदवाराने पुढील प्रकारे कागदपत्रे उपलोड करावी
- अर्जदाराची कागदपत्रे (Applicant’s Documents)
- Applicant Scheduled Tribe Certificate: अर्जदाराचा अनुसूचित जमातीचा दाखला
- Original Affidavit (Form F): मूळ प्रतिज्ञापत्र (नमुना फ)
- Recommendation Letter: शिफारस पत्र
- Aadhaar Card: आधार कार्ड
- Applicant’s primary school leaving certificate: अर्जदाराचा प्राथमिक शाळा सोडल्याचा दाखला (L.C.)
- An extract of school admission register: शालेय प्रवेश निर्गम उताऱ्याची प्रत (General Register – G.R. Extract)
- An extract of birth and death register: जन्म-मृत्यू नोंदवहीचा उतारा
- वडिलांचे/आजोबांचे/पणजोबांचे पुरावे (दिनांक ६ सप्टेंबर १९५० पूर्वीचे) (या कागदपत्रांवर जातीची नोंद असणे आवश्यक आहे)
- Primary school leaving certificate: प्राथमिक शाळा सोडल्याचा दाखला
- An extract of school admission register: शालेय प्रवेश निर्गम उतारा
- An extract of birth and death register: जन्म-मृत्यू नोंदवहीचा उतारा
- Scheduled Tribe Certificate in the prescribed form: विहित नमुन्यातील अनुसूचित जमातीचा दाखला
- Service Record (Extract of first page): जर नोकरीत असतील, तर सेवा पुस्तकाच्या (Service Book) पहिल्या पानाचा उतारा (ज्यामध्ये जमातीची नोंद आहे)
- If father is illiterate: वडील निरक्षर असल्यास, अर्जदाराच्या रक्ताच्या नात्यातील ज्येष्ठ नातेवाईकांचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा शालेय प्रवेश निर्गम उतारा.
- इतर कागदपत्रे (Other Documents)
- Revenue record (7/12 extract, Sale Deed etc.): महसूल पुरावे जसे की, ७/१२ उतारा, खरेदीखत इ.
- Affidavits of near relatives: ज्या जवळच्या नातेवाईकांचे ‘वैधता प्रमाणपत्र’ (Validity) जोडले आहे, त्यांचे प्रतिज्ञापत्र.
- Any other relevant documents: अनुसूचित जमातीचा दावा सिद्ध करण्यासाठी इतर कोणतेही संबंधित पुरावे.
- Reason for non-availability: वरीलपैकी कोणतेही कागदपत्र उपलब्ध नसल्यास, ते का उपलब्ध नाही याची कारणे नमूद करणे.
- फोटो आणि स्वाक्षरी (Photo & Signature)
- Applicant Photo: अर्जदाराचा फोटो (JPEG फाईल साईज 50 KB)
- Applicant Signature: अर्जदाराची स्वाक्षरी (JPEG फाईल साईज 50 KB)
- Applicant’s Parent Signature: अर्जदाराच्या पालकांची (आई/वडील) स्वाक्षरी (JPEG फाईल साईज 50 KB)
- अर्जदाराची कागदपत्रे (Applicant’s Documents)
- वरीलप्रमाणे सर्व कागदपत्रे उपलोड केल्यानंतर Save & Next पर्याय निवडावा
- सर्व पायऱ्या पूर्ण झाल्यानंतर आपणास आपण नमूद केलेल्या माहितीच्या आधारावर आपल्या अर्जाची प्रत दिसेल या ठिकाणी सर्व माहिती नीट काळजीपूर्वक वाचून घ्या, काही बदल करावयाचा असल्यास तो बदल करून घ्या
- सर्व माहिती बरोबर आहे याची खात्री झाल्यानंतर अर्ज Submit and Lock करा, अर्ज पूर्ण करण्यासाठी अर्जदारास आपल्या mail ID (ई – मेल आयडी) व Mobile (मोबाइल क्रमांक) वर OTP प्राप्त होतील सदर OTP नमूद केल्यानंतरच अर्ज पूर्ण होईल अर्ज पूर्ण केल्यानंतर अर्जाची छापील प्रत काढून घ्या जात प्रमाणपत्र छाननी समिती समोर अर्ज सादर करण्यासाठी ती गरजेची आहे
अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणीकरिता कागदपत्रांचा क्रम
जात प्रमाणपत्र छाननी समिती समोर अर्ज सादर करण्यापूर्वी अर्जदाराने खालील क्रमानुसार कागदपत्रे लाऊन पुठ्ठ्याची फाईल तयार करावी
- अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणीकरिता कागदपत्रांचा क्रम
- कागदपत्रांची फाईल सादर करताना त्यातील कागदपत्रांचा क्रम पुढीलप्रमाणे असावा. (पुठ्ठ्याची फाईल)
- मुळ शिफारसपत्र (महाविद्यालयाचे/कार्यालयाचे/जिल्हाधिकारी यांचे पत्र) (Original Sponsoring Letter)
- ऑनलाईन भरलेल्या ( ई ) फॉर्मची प्रत (Xerox or Print)
- मुळ जातीचा दाखला (Original Cast Certificate)
- जातीच्या दाखल्याची झेरॉक्स प्रत
- मुळ प्रतिज्ञापत्र व वंशावळ (Original Affidavit) (टीप – फाईलमध्ये नातेसंबंधांची कागदपत्रे जोडलेली सर्व नावे वंशावळीमध्ये असणे आवश्यक आहे.)
- अर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखला (Xerox)
- ७/१२ उतारा, वनजमीन मालकीहक्क / जमिन नसल्यास भुमिहीन दाखला, गाव नमुना १४ उतारा (१९५० किंवा त्यापूर्वीचा पुरावा) (Xerox)
- नातेवाईकांचे जातवैधता प्रमाणपत्र, जातीचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, इत्यादी (१९५० किंवा त्यापूर्वीचा पुरावा – शाळा सोडल्याचा दाखला)(Xerox)
- उर्वरित जास्तीचे कागदपत्र (Xerox)
- महत्वाच्या सूचना:
- वरील सर्व झेरॉक्स कागदपत्रांच्या उजव्या कोपऱ्यावर नातेसंबंध लिहावे. (जसे – स्वतः, वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा, काका, आत्या)
- फाईलवर अर्जदाराचे संपुर्ण नाव, पत्ता, मोबाईल नं, जमात, युझर नेम व पासवर्ड लिहावे.
विभागानुसार जात प्रमाणपत्र छाननी समिती कार्यालये व संपर्क तपशील
अं. क्र. कार्यक्षेत्र कार्यालय पत्ता
1 मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, ठाणे
कार्यालयाचा पत्ता : ठाणे समिती
पत्ता- ६ वा मजला, एमटीएनएल टेलिफोन एक्सचेंज बिल्डिंग, मावळी मंडळ शाळेजवळ, चरई, ठाणे - ४००६०१
2 पालघर जिल्हा अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, पालघर
कार्यालयाचा पत्ता : सहआयुक्त, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती,
पालघर, २०२, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती,
पालघर, प्रशासकीय इमारत अ, जिल्हाधिकारी मुख्यालय संकुल,
नवनगर, कोळगाव, पालघर प, पालघर- ४०१४०४
3 नाशिक जिल्ह्यातील नाशिक, बागलाण, सरगाणा, कळवण, पेठ, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुके. अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, नाशिक १
कार्यालयाचा पत्ता : २ रा मजला, आदिवासी विकास भवन, जुना आग्रा रोड, रमाबाई आंबेडकर शाळेजवळ, नाशिक - ४२२००२
4 नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, देवळा, चांदवड, नांदगाव, निफाड, येवला आणि सिन्नर तालुके आणि अहिल्यानगर जिल्हा. अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, नाशिक २
कार्यालयाचा पत्ता : २ रा मजला, डॉक्टर हाऊस, ठक्कर बाजार समोर, त्र्यंबक रोड, नाशिक - ४२२००२
Location : Click here for directions
5 धुळे, जळगाव जिल्हे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, धुळे
कार्यालयाचा पत्ता : सहआयुक्त, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी तपासणी धुळे, सिंधूमाणिक बिल्डिंग, रेल क्र. ५३, एकविरा देवी हायस्कूल जवळ, शारदा नगर, देवपूर, धुळे - ४२४००५
Location : Click here for directions
6 नंदुरबार जिल्हा अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, नंदुरबार
कार्यालयाचा पत्ता : सहआयुक्त, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, नंदुरबार, आरटीओ (RTO) जवळ, साक्री रोड, नंदुरबार - ४२५४१२
7 पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर जिल्हे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, पुणे
कार्यालयाचा पत्ता : जात पडताळणी समिती (CVC) पुणे, पुणे विभाग, ५ वा मजला, सी विंग, कपिल टॉवर्स, आरटीओ (RTO) कार्यालयाजवळ, पुणे - ४११ ००१.
8 छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्हे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, छत्रपती संभाजीनगर १
कार्यालयाचा पत्ता : प्लॉट क्र. ८३५ एन-५, पाण्याच्या टाकीसमोर, सिडको, छत्रपती संभाजीनगर - ४३१००३
9 परभणी, बीड, धाराशिव जिल्हे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, छत्रपती संभाजीनगर २
कार्यालयाचा पत्ता : १ ला मजला, मंगेश गॅस सर्व्हिसच्या वर, बजरंग चौक, एन-८, सिडको, छत्रपती संभाजीनगर - ४३१००३.
10 नांदेड जिल्हा अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, किनवट १
कार्यालयाचा पत्ता : अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, किनवट मुख्यालय छत्रपती संभाजीनगर, प्लॉट क्र. २६५, अभिराम बिल्डिंग, एन-१ सेक्टर सी, टाऊन सेंटर, काला गणपती मंदिराजवळ, सिडको, छत्रपती संभाजीनगर
11 हिंगोली, लातूर जिल्हे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, किनवट २
कार्यालयाचा पत्ता : ए ४०१, तिसरा मजला, निशा बाफना प्लाझा, जालना रोड, आकाशवाणी चौक, चिंचन भवन समोर, छत्रपती संभाजीनगर
12 अमरावती, अकोला, बुलढाणा जिल्हे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, अमरावती
कार्यालयाचा पत्ता : सना बिल्डिंग, राज्य माहिती आयोग कार्यालयासमोर, चपरासीपुरा, अमरावती - ४४४६०२
13 यवतमाळ, वाशिम जिल्हे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, यवतमाळ
कार्यालयाचा पत्ता : सहआयुक्त आणि उपाध्यक्ष, अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, साई उत्तम व्हिला, बंगला क्र. ३, रांगोळी मैदानाजवळ, शास्त्री नगर, यवतमाळ - ४४५००१
14 नागपूर, वर्धा जिल्हे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, नागपूर
कार्यालयाचा पत्ता : आदिवासी विकास भवन, गिरी पेठ, नागपूर - ४४० ०१०
15 चंद्रपूर जिल्हा अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती गोंदिया
कार्यालयाचा पत्ता : अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, डॉ. पिल्ले आयटीआय (ITI) इमारत, २ रा मजला, विद्याविहार शाळेजवळ, एस.टी. वर्कशॉप चौक, छत्रपती नगर, ताडोबा रोड, तुकुम, चंद्रपूर - ४४२४०१
16 गोंदिया, भंडारा जिल्हे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, गडचिरोली
कार्यालयाचा पत्ता : अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, २ रा मजला, रूम क्र. २१४, आमगाव रोड, फुलचूर टोला, गोंदिया - ४४१६०१
17 गडचिरोली जिल्हा अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, चंद्रपूर
कार्यालयाचा पत्ता : अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, झेड. पी. कॉलनी कॉम्प्लेक्स परिसर, गडचिरोली - ४४२६०५.
तांत्रिक अडचणी संदर्भात हेल्पलाईन
इमेल आयडी : helpdesk[at]trti[dash]maha[dot]in
संपर्क क्रमांक : +919529152114
संपर्क करण्याची वेळ : सोमवार ते शुक्रवार सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजे पर्यंत
नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
- आदिवासी विकास विभागातर्फे जात पडताळणी प्रक्रिया ऑनलाईन उपलब्ध आहे का?
- महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागातर्फे जात पडताळणी प्रक्रिया सुलभ व पारदर्शक होण्यासाठी हि सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आलेली आहे
- जात पडताळणी प्रक्रिया पूर्ण होण्यास किती कालावधी लागतो?
- सर्वसाधारणपणे अर्जदाराने ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर ८-१५ दिवसांच्या कालावधी मध्ये अर्जदारास मुळ कागदपत्रांसाहित उपस्थित राहण्याचा ई-मेल किंवा मोबाईलवर संदेश प्राप्त होतो, उमेदवाराने सर्व कागदात्रांची यशस्वी पूर्तता केल्यास ३० – ४५ दिवसांच्या कालावधीत जात पडताळणी प्रमाणपत्र ऑनलाईन उपलब्ध होते.
- जात पडताळणी साठी अर्ज कुठे करावा?
- अर्जदाराचा जातीचा दाखला कोणत्या तहसील कार्यालयातून प्राप्त झालेला आहे त्यानुसार अर्जदारास जात पडताळणी समिती निवडता येते https://etribevalidity.trti-maha.in/contact_us ह्या लिंक वर क्लिक करून आपण आपली जात पडताळणी समिती जाणून घेऊ शकता
- जात पडताळणी प्रक्रियेस कोणकोणती कागदपत्रे लागतात
- जात पडताळणी प्रक्रियेसाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची याद्दी ह्या पोस्ट मध्ये नमूद करण्यात आलेली आहे, कागदपत्रांच्या यादी ची PDF डाऊनलोड करण्यसाठी येथे क्लिक करा
- माझ्या जातीच्या दाखल्यावर (अनुसूचित जमातीचा दाखला) माझे नाव किंवा इतर माहिती चुकीची आहे तर जात पडताळणी करावी का?
- नाही जर आपल्या प्रमाणपत्रावर काही बदल असेल तर आधी तो बदल करून घाय्वा, प्रमाणपत्रावर सर्व माहिती अचूक आहे याची खात्री झाल्यानंतरच जात पडताळणी करावी.
- स्कॅन केलेल्या कागदपत्रांची साईज 512 KB पेक्षा जास्त आहे? साईज कमी कशी करावी
- आपण स्कॅन केलेल्या ची साईज PDF 512KB पेक्षा जास्त असल्या https://bigpdf.11zon.com/en/compress-pdf/ या संकेतस्थळाला भेट द्या व गरजेनुसार Compression Level सिलेक्ट करून फाईल ची साईज कमी करून घ्या