UGC म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे (Union Grant Commission) वर्षातून दोनदा NET म्हणजे राष्ट्रीय पात्रता परीक्षा (National Entrance Test) चे आयोजन करण्यात येते, ज्या विद्यार्थ्यांचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण आहे किंवा शेवटच्या वर्षात प्रविष्ठ आहे असे विद्यार्थी या परीक्षेस पात्र ठरता, पदव्युत्तर शिक्षणानंतर अनेक सरकारी नोकऱ्यांसाठी, खाजगी नोकऱ्यांसाठी व PHD अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी NET परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य दिले जाते.
UGC तर्फे नुकतेच नेट (जून २०२६) परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून इच्छुक व पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक उमेदवार दिनांक २९ एप्रिल २०२६ ते २० मे २०२६ या कालावधीत अर्ज सादर करू शकता, अर्ज कसा करावा याबद्दल ह्या पोस्टद्वारे आपण सविस्तर माहिती जाणून घेवूया
ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी अर्जदाराने अर्ज प्रक्रियेच्या अधिकृत संकेतस्थळास भेट देऊन परीक्षेच्या जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करून घ्यावे, सदर जाहिरात ची अधिकृत PDF डाऊनलोड करण्यासाठी ह्या लिंक वर क्लिक करावे.
- जाहिरातीच्या पृष्ठ क्रमांक ३ वर आपणास परीक्षेसंबंधी वेळापत्रक बघावयास मिळेल.
- पृष्ठ क्रमांक १२ वर परीक्षेचे स्वरूप कसे असेल याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे.
- पृष्ठ क्रमांक १५ वर UGC नेट परीक्षेसाठी पात्रतेसंबंधी माहिती देण्यात आलेली आहे.
- पृष्ठ क्रमांक १८ वर उमेदवाराच्या वायोमार्यादेसंबंधी माहिती देण्यात आलेली आहे.
- पृष्ठ क्रमांक २५ वर ऑनलाईन अर्ज भरण्यासंबंधी महत्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहे.
- पृष्ठ क्रमांक ५० ते ५२ वर UGC नेट परीक्षेसाठी उपलब्ध विषयांची यादी देण्यात आलेली आहे.
- पृष्ठ क्रमांक ५३ ते ५८ वर UGC नेट परीक्षेसाठी उपलब्ध परीक्षा केंद्रांसाठी शहरांची यादी देण्यात आले आहे.
सदर जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन केल्यानंतर अर्जदाराने अर्ज भरण्यास सुरवात करावी
राष्ट्रीय पात्रता परीक्षा २०२६ साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
- अर्जदाराने सर्वप्रथम आपल्या संगणकावर ह्या लिंक चा वापर करून ऑनलाईन अर्ज प्रक्रियेचे अधिकृत संकेतस्थळ उघडावे. स्क्रीन वर आपणास माहितीपत्रक डाऊनलोड करा (Download Information Bulletin), नवीन नोंदणी करा (New Registration), व प्रवेश करा (Login) असे ३ पर्याय दिसतील. जर अर्जदाराने याआधीच नोंदणी केलेली असेल तर सरळ Login / प्रवेश करा या पर्यायावर क्लिक करावे. जर अर्जदार नोंदणीकृत नसेल तर New Registration / नवीन नोंदणी करा या पर्यायावर क्लिक करावे

- New Registration / नवीन नोंदणी करा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर अर्जदारास UGC नेट २०२६ परीक्षेची अधिकृत जाहिरात डाऊनलोड करण्याचा पर्याय दिसेल व ऑनलाईन अर्ज भरण्यासंदर्भात सूचना दिसतील, सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करून झाल्यानंतर खाली मी परीक्षेची जाहिरात डाउनलोड केली असून तिचे काळजीपूर्वक वाचन केले आहे अश्या आशयाच्या चेक बॉक्स वर टिक करून Click here to Proceed या पर्यायावर क्लिक करावे.
- पुढील पृष्ठावर आपणास डीजीलॉकर च्या लॉगीन साठी पर्याय दिसेल अर्जदाराने या आधी डीजीलॉकर ची नोंदणी केलेली असल्यास आपल्या मोबाईल क्रमांक किंवा आधार कार्ड क्रमांकाचा वापर करून डीजीलॉकर च्या खात्यात प्रवेश करावा व UGC NET ला आपले खाते वापरायचीपरवानगी देऊन Allow या पर्यायावर क्लिक करावे, त्यानंतर आपणास डीजीलॉकर चे प्रमाणीकरण पूर्ण झे आहे व नोंदणी प्रक्रियेकडे चला असा मेसेज दिसेल, डीजीलॉकर ची नोंदणी केलेली नसल्यास ती कशी करावी याबद्दल संपूर्ण माहिती आमच्या संकेतस्थळावर इतर पोस्ट मध्ये उपलब्ध आहे कृपया डीजीलॉकर ची नोंदणी कशी करावी या पोस्ट चा वापर करून याबद्दल माहिती घ्यावी.

- पुढील पृष्ठावर म्हणजेच Personal Details या स्टेप मध्ये अर्जदारास आपल्या माध्यमिक शालांत परीक्षेच्या गुणपत्रक किंवा प्रमाणपत्राप्रमाणे आपले संपूर्ण नाव, वडिलांचे नाव व आईचे नाव नमूद करायचे आहे लक्षात ह्या या ठिकाणी आधीपासूनच आपल्या आधार कार्ड प्रमाणे आपले नाव दिसेल आपल्या आधार कार्ड च्या नावात व माध्यमिक शालांत परीक्षेच्या गुणपत्रका च्या नावात बदल असल्यास योग्य तो बदल करून घ्यावा तसेच आपली जन्मतारीख व लिंक नमूद करावे

- त्यानंतर अर्जदाराने आपला संपूर्ण पत्ता नमूद करावा आपल्या आधार कार्ड प्रमाणे पत्ता आधीपासूनच या ठिकाणी दिसेल अर्जदाराने त्यात योग्य तो बदल करण्याची गरज असल्यास तो करून देश, राज्य, जिल्हा व पिनकोड नमूद करावे.

- त्यानंतर अर्जदाराने आपला इमेल आयडी व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करावा, अर्जाच्या पुढील टप्प्यात OTP येतो त्यामुळे आपल्या इमेल चे स्टोरेज भरलेले नाही ना याची खात्री करून घ्यावी.

- त्यानंतर अर्जदाराने आपल्याला लक्षात राहील असा पासवर्ड नमूद करावा, अर्जदाराने पासवर्ड ची पूर्तता करतांना पासवर्ड ची वर्ण लांबी किमान ८ असणे गरजेचे आहे त्याच प्रमाणे त्यात एक कॅपिटल वर्ण, एक लहान वर्ण, एक संख्या आणि एक विशेष वर्ण असणे देखील गरजेचे आहे (उदा. Pass@1234 / Name@2026).
- त्यानंतर कॅप्चा (CAPTCHA) कोड टाकावा वSubmit या पर्यायावर क्लिक करावे, त्यानंतर अर्जदारास आपण भरलेल्या माहितीच्या आधारे अर्जाचाPreview दिसेल सर्व माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी व मोबाईलवर प्राप्त OTP नमूद करून नोंदणी ची प्रक्रिया पूर्ण करावी.

- नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्ज क्रमांक प्राप्त होईल अर्जदाराने अर्ज क्रमांक जतन करून ठेवावा कारण अर्ज क्रमांकाचा वापर करून पुढील अर्ज प्रक्रिया पूर्ण करावे लागते तसेच परीक्षेचे प्रवेशपत्र व निकाल बघण्यासाठीही याचा उपयोग होतो.
- Personal Details च्या पृष्ठावर नोंदणी केल्याप्रमाणे अर्जदाराचे नाव जन्मतारीख, लिंग पालकांचे नाव दिसेल त्याखाली अर्जदाराने आपले राष्ट्रीयत्व निवडावे,
- त्यानंतर अर्जदाराने आपला प्रवर्ग निवडावा, अर्जदार जर राखीव प्रवर्गातील असेल तर अर्जदाराने आपल्या जात प्रमाणपत्राप्रमाणे जात प्रमाणपत्र क्रमांक, जात प्रमाणपत्र निर्गमित केल्याची तारीख, जात प्रमाणपत्र निर्गमन अधिकारी हि माहिती काळजीपूर्वक भरावी.
- त्यानंतर जर अर्जदार मधुमेह ग्रस्थ असेल तर त्या संबंधी माहिती द्यावी.
- त्यानंतर अर्जदाराने पालकांचे वार्षिक उत्पन्न आपल्या उत्पन्नाच्या दाखल्याप्रमाणे नमूद करावे.
- त्यानंतर अर्जदार जर मुस्लीम, ख्रिचन, शीख, बुद्धिस्ट, झोरोस्ट्रियन किंवा जैन समाजातील अल्पसंख्याक प्रवर्गातील असेल तर त्याबद्दल माहिती नमूद करावी.
- त्यानंतर अर्जदाराने पदव्युत्तर पदवी (Post Graduation) कोणत्या विषयातून केले आहे ते निवडावे.
- वरीलप्रमाणे सर्व माहिती नमूद केल्यानंतर अर्जदाराने Save & Next हा पर्याय निवडावा.

- पुढील पृष्ठावर अर्जदार विकलांग असेल तर Yes हा पर्याय निवडून यूडीआईडी कार्ड क्रमांक नमूद करावा व Save & Next हा पर्याय निवडावा.
- पुढील पृष्ठावर अर्जदाराकडे आपार आयडी असेल तर तो नमूद करावा जर आपार आयडी नसेल तर अर्जदार तो डीजी लॉकर च्या माध्यमातून किंवा https://www.abc.gov.in या संकेतस्थळावरून मिळवू शकतो. Yes किंवा No योग्य तो पर्याय निवडून अर्जदाराने Submit या पर्यायावर क्लिक करावे. आपार आयडी नमूद करणे निकडीचे नसून तो नमूद नाही केला तरी चालतो.
- पुढील पृष्ठावर परीक्षा व परीक्षा केंद्रासंबंधी महत्वपूर्ण माहिती पुरवायची आहे.
- I want to apply for UGC – NET June 2026 on the basis of या पर्यायासमोर अर्जदाराने आपण कोणत्या शैक्षणिक पात्रतेच्या बळावर UGC NET परीक्षा देत आहोत हे निवडावे जर अर्जदार ४ वर्षे कालावधीचा पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण असेल किंवा प्रविष्ठ असेल तर Four Year under Graduate Programme हा पर्याय निवडावा किंवा जर उमेदवार पदव्युत्तर पदवी धारक असेल किंवा समकक्ष अभ्यासक्रमास प्रविष्ठ असेल तर Master’s Degree हा पर्याय निवडावा.
- त्यानंतर Subject Opted for NET या पर्यायाकारीता अर्जदाराने त्यास कोणत्या विषयासाठी UGC NET परीक्षा द्यायची आहे ते निवडावे, सर्वसाधारणपणे अर्जदाराने ज्या विषयामध्ये पदव्युत्तर पदवी धारण केलेली आहे तो विषय निवडावा.
- त्यांनतर Question Paper Medium या पर्यायासमोर अर्जदारास कोणत्या भाषेत UGC NET परीक्षा द्यायची आहे ते निवडावे अर्जदारास या ठिकाणी इंग्लिश व हिंदी असे दोनच पर्याय उपलब्ध आहे.
- त्यानंतर अर्जदाराने आपल्या सोयीनुसार चार परीक्षा केंद्रासाठी शहरे निवडावी
- त्यानंतर आपल्या वडिलांची व आईची शैक्षणिक पात्रता व व्यवसाय निवडावा
- वरील सर्व माहिती नमूद केल्यानंतर save Next हा पर्याय निवडावा.

- पुढील पृष्ठावर अर्जदारास शैक्षणिक पत्रातेबद्दल माहिती नमूद करायची आहे, ज्यात अर्जदाराचे पदव्युत्तर पदवी चे शिक्षणाबद्दल सविस्तर माहिती द्यावी लागते
- Pass Status : या ठिकाणी अर्जदार पदव्युत्तर पदवी ची परीक्षा उत्तीर्ण आणि कि प्रविष्ठ आहे याबद्दल माहिती द्यावी, जर अर्जदार परीक्षा उत्तीर्ण असेल तर Passed हा पर्याय निवडावा, व जर अर्जदार परीक्षा प्रविष्ठ असेल तर Appearing हा पर्याय निवडावा.
- Year of Passing/appearing : या ठिकाणी अर्जदार पदव्युत्तर पदवी ची परीक्षा कोणत्या साली उत्तीर्ण झाला किंवा कोणत्या वर्षी पदव्युत्तर पदवी ची परीक्षा उत्तीर्ण होणार आहे ते वर्ष निवडावे.
- Course/Stream Name : या ठिकाणी अर्जदाराने आपली पदव्युत्तर पदवी ची परीक्षा कोणत्या अभ्यासक्रम शाखेतून केली आहे याबद्दल माहिती द्यावी (उदा. MA, MSC, MCOM) आपली अभ्यासक्रम शाखा लिस्ट मध्ये उपलब्ब्ध नसल्यास Other हा पर्याय निवडून येणाऱ्या रकान्यात आपली शाखा नमूद करावी.
- Whether in Final Year / Final Year Result Awaited : या ठिकाणी जर आपला अभ्यासक्रमाचा अंतिम वर्षाचा निकाल जाहीर होणे बाकी असल्यास Yes हा पर्याय निवडावा आणि जर निकाल जाहीर झालेला असेल तर No हा पर्याय निवडावा,
- Qualifying Examination From : आपले पदव्युत्तर पदवी चे शिक्षण भारतातून झालेले आहे कि भारता बाहेरून बद्दल योग्य ती माहिती द्यावी
- Qualifying Examination State : या ठिकाणी आपण आपले पदव्युत्तर पदवी चे शिक्षण कोणत्या राज्यातून पूर्ण केले आहे ते निवडावे.
- Board/University Name: या ठिकाणी पदव्युत्तर पदवी चे शिक्षण कोणत्या विद्यापीठातून पूर्ण केले आहे ते निवडावे.
- Result Mode : या ठिकाणी अर्जदाराचा निकाल कोणत्या पद्धतीचा आहे ते निवडावे या ठिकाणी Percentage व CGPA असे दोन पर्याय दिसतील अर्जदाराने आपल्या अंतिम वर्षाच्या निकालाप्रमाणे योग्य तो पर्याय निवडावा. व प्राप्त गुण किंवा CGPA व टक्केवारी ची नोंद करून Save & Next या पर्यायावर क्लिक करावे.
- पुढील Additional Details या पृष्ठावर पुढीलप्रमाणे अतिरिक्त महिती पुरवायची आहे.
- Are you a Twin and both applying for UGC – NET June 2026 ? : या ठिकाणी जर अर्जदारास जुळा भाऊ किंवा बहिण असेल व ते देखील UGC – NET June 2026 परीक्षा देणार आहे तर Yes हा पर्याय निवडून त्याचा माध्यमिक शालांत परीक्षेचा अनुक्रमांक व संपूर्ण नाव नोंदवावे
- Whether admitted in Ph.D. : जर अर्जदाराने या आधीच D. च्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतला असेल तर त्याबद्दल माहिती नोंदवावी जसे प्रवेश वर्ष विद्यापीठाचे नाव ई.
- Research I Ex-serviceman Details : या ठिकाणी जर याआधी अर्जदाराने काही शोध निबंध प्रसिद्ध केलेले असतील तर त्यासंबंधी माहिती द्यावी, तसेच माझी सैनिक असल्यास त्यासंबंधी माहिती द्यावी.
- वरीलप्रमाणे सर्व माहिती भरून झाल्यानंतर Save & Next या पर्यायावर क्लिक करावे.

- Apply For या पृष्ठावर अर्जदाराच्या शैक्षणिक पात्रतेनुसार अर्जदार UGC – NET अंतर्गत कोण कोणत्या प्रोग्राम साठी पात्र आहे ते दिसते अर्जदाराने आपल्या आवडीनुसार निवड करून Save & Next हा पर्याय निवडावा.

- पुढील पृष्ठावर अर्जदारास आपला लाइव फोटो अपलोड करावा लागतो अर्जदाराच्या संगणकास वेबकॅमेरा ची सुविधा असल्यास Capture Live Photograph या पर्यायावर क्लिक करून अर्जदार आपला फोटो अपलोड करू शकतो किंवा स्क्रीन वरील QR कोड स्कॅन करून आपल्या मोबाईल च्या सहाय्याने सुद्धा आपला फोटो अपलोड करू शकतो. लाइव फोटो अपलोड करतांना अर्जदाराने आपल्या मागील पृष्ठभाग का हलक्या रंगाचा असावा याची काळजी घ्यावी व लाइव फोटो मध्ये आपल्या व्यतिरिक्त इतर कोणाचा चेहरा येणार नाही याची देखील काळजी घ्यावी, आपण अपलोड करत असलेला फोटो हा आधार कार्ड च्या फोटो शी जुळवून बघितला जातो जर त्यात तफावत आढळली तर पुन्हा फोटो अपलोड करावा लागू शकतो.

- त्यानंतर अर्जदाराने आपले पासपोर्ट आकाराचे छायाचित्र व स्वाक्षरी स्कॅन करून घ्यावी व फोटो ची साईज १० ते २०० केबी व स्वाक्षरी ची साईज १० ते ५० केबी पर्यंत ठेवून ती उपलोड करावी. व त्यानंतर Save & Next हा पर्याय निवडावा.

- पुढील स्टेप मध्ये अर्जदारास अर्जदाराने दिलेल्या माहितीच्या आधारे अर्जाचा Preview बघावयास मिळतो अर्जदाराने सर्व माहिती काळजीपूर्वक वाचू घ्यावी काही बदल करावयाचा असल्यास योग्य तो बदल करावा व Final Submission of Application या पर्यायावर क्लिक करावे
- त्यानंतर अर्जदारास आपल्या इमेल आयडीवर प्राप्त OTP नमूद करून इमेल चे व्हेरिफिकेशन पूर्ण करून घ्यावे लागेल.
- त्यानंतर अर्जदाराने आपल्या इंटरनेट बँक, डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड, किंवा UPI सारख्या पर्यायांचा वापर करून अर्जाच्या शुल्काचा भरणा करावा व त्यानंतर अर्जाची एक छापील प्रत काढून स्वताजवळ जपून ठेवावी
- UGC – NET जून २०२६ साठी खुल्या प्रवर्गातील अर्जदारांसाठी परीक्षा शुल्क ११५०/- रुपये आहे
- राखीव प्रवर्गातील अर्जदारांसाठी परीक्षा शुल्क ६००/- रुपये आहे
- अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / विकलांग व तृतीयपंथी अर्जदारांसाठी परीक्षा शुल्क ३२५/- रुपये आहे
- अश्या प्रकारे आपण UGC – NET २०२६ चा अर्ज भरू शकता
मदत केंद्र
- अर्जदारास ऑनलाईन अर्ज प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास ते UGC च्या net-bureau@ugc.gov.in या इमेल वर किंवा 011-23604406 या संपर्क क्रमांकावर संपर्क करू शकता, किंवा https://www.ugcnetonline.in/contact.php या संकेतस्थळावर उपलब्ध कार्यालये व अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकता.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
- UGC NET २०२६ च्या परीक्षेत किती प्रश्पात्रिका असतात ?
- UGC NET च्या परीक्षेसाठी पेपर १ व पेपर २ या स्वरुपात प्रश्नपत्रिका असतात. परीक्षा हि CBT म्हणजे संगणक आधारित असते व परीक्षेचा कालावधी ३ तासांचा असतो.
- UGC NET २०२६ परीक्षेत वयोमर्यादा काय आहे?
- सदर परीक्षेस कोणतीही वयोमर्यादा नाही आहे.
- UGC NET २०२६ परीक्षेचा अभ्यासक्रम कसा डाउनलोड करावा?
- UGC NET २०२६ चा अभ्यासक्रम डाऊनलोड करण्यासाठी अर्जदाराने https://www.ugcnetonline.in/syllabus-new.php या संकेतस्थळाचा वापर करावा
- UGC NET च्या जुन्या प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत का ?
- हो जुन्या प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी अर्जदाराने पुढील अधिकृत संकेतस्थळाचा https://www.ugcnetonline.in/previous_question_papers.php वापर करावा
- UGC NET चा अर्ज पूर्णपणे Submit केला आहे आता त्यात सुधारणा करता येतील का ?
- हो अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर NTA तर्फे correction window चा पर्याय दिला जातो या कालावधीत अर्जदार आपल्या अर्जातील चुका दुरुस्त करू शकता.