How to Apply CTET | केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अर्ज कसा करावा

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे CTET चे आयोजन करण्यात आलेले आहे, शिक्षण विषयात पदविका, पदवी किंवा पदवीत्तर पदवी धारण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी CTET परीक्षा महत्वपूर्ण ठरते या पोस्ट द्वारे आपण CTET परीक्षा सप्टेंबर २०२६ बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया

 

पात्रता  

  • ही केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे CTET परीक्षेसाठी शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे
    • पेपर १ : शिक्षण क्षेत्रात पदविका (ed. / D.T.Ed. / D.El.Ed)
    • पेपर २ :
      • शिक्षण क्षेत्रात पदविका (ed. / D.T.Ed. / D.El.Ed) व कोणत्याही क्षेत्रात पदवी
      • शिक्षण क्षेत्रात पदवी (B.Ed)

 

अर्ज करण्याची पद्धत

पात्र व इच्छुक अर्जदारांनी दिनांक ११ मे २०२६ ते १० जून २०२६ या कालावधीत केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेच्या अधिकृत अर्ज प्रणालीच्या https://ctet.nic.in या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज सदर करायचा आहे, इतर कोणत्याही स्वरुपात अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.

 

परीक्षेचे आयोजन

परीक्षेचे आयोजन हे ६ सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात आलेले असून दोन सत्रांमध्ये परीक्षा होणार आहे

  • पेपर II सकाळ सत्र सकाळी ०९:३० ते दुपारी १२:०० या दरम्यान
  • पेपर I दुपार सत्र दुपारी ०२:३० ते ०५:०० या दरम्यान

 

परीक्षा शुल्क

अर्जदार कोणत्या पेपर साठी करत आहे यावरून व अर्जदाराच्या सामाजिक आरक्षणानुसार अर्जाच्या शुल्काची रक्कम ठरवली जाते

  • फक्त पेपर I किंवा पेपर II (कोणताही एकाच पेपर)
    • खुला (General) किंवा इतर मागास प्रवर्ग (OBC NCL) : १०००/- रुपये
    • अनुसूचित जाती / जमाती किंवा अपंग : ५००/- रुपये
  • पेपर I व पेपर II (दोन्ही पेपर)
    • खुला (General) किंवा इतर मागास प्रवर्ग (OBC NCL) : १२००/- रुपये
    • अनुसूचित जाती / जमाती किंवा अपंग : ६००/- रुपये
  • अर्जदार आपल्या अर्जाच्या शुल्काचा भरणा करण्यासाठी डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड, इंटरनेट बँकिंग, किंवा UPI या माध्यमांचा वापर करू शकता.

 

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अर्जदाराने आपल्या संगणकावर https://ctet.nic.in हे संकेतस्थळ उघडावे
  • Public Notices च्या लिस्ट मध्ये अर्जदारास CTET Sept २०२६ साठीची संपूर्ण माहितीपत्रिका उपलब्ध करून दिलेली आहे अर्जदाराने ती डाऊनलोड करून व्यवस्थित वाचून घ्यावी.
  • त्याच खालोखाल Candidate Activity च्या सेक्शन मध्ये CTET Sept २०२६ साठी ऑनलाईन अर्जाची लिंक उपलब्ध आहे अर्जदाराने Apply for CTET SEP 2026 या लिंक वर क्लिक करावे.

  • पुढील पेजवर आपणास माहितीपत्रक डाऊनलोड करा, नवीन नोंदणी करा, लॉगीन करा असे पर्याय दिसतील, जर आपण या आधीच नोंदणी केलेली असेल तर लॉगीन या पर्यायाचा वापर करून आपण आपल्या खात्यात प्रवेश करू शकता. जर नसेल तर New Registration या पर्यायावर क्लिक करावे.

 

 

  • पुढील पेजवर आपणास अर्ज करण्या संबंधी काही सूचना दिसतील त्या सूचनांचे वाचन करून झाल्यावर सर्वात खाली Click here to Proceed या पर्यायावर क्लिक करावे.
  • पुढील पेजवर आपणास वैयक्तिक माहिती, संपर्क माहिती, व पासवर्ड संबंधी माहिती नोंदवायची आहे. लक्षात घ्या कोणताही ऑनलाईन अर्ज भरतांना आपण अर्ज हा पूर्णपणे कॅपिटल लेटर मध्ये भरावा.
    • Candidate’s Name : या ठिकाणी अर्जदाराने आपले नाव आपल्या माध्यमिक शालांत परीक्षेच्या गुणपत्रक / प्रमाणपत्राप्रमाणे नमूद करावे.
    • Candidate’s Name व Mother’s Name : या ठिकणी आपल्या वडलांचे व आईचे नाव नमूद करावे.
    • Date of Birth : अर्जदाराने आपली जन्मतारीख नमूद करावी
    • Gender : अर्जदाराने आपले लिंग नमूद करावे.
    • Identity Type : या ठिकाणी अर्जदाराने आपले ओळखपत्र निवडावे, ओळखपत्र निवडतांना आपल्या ओळखपत्रा वरील नाव, जन्मतारीख, लिंग बरोबर आहे कि नाही याची खात्री करावी.
    • Identification Number : आपण जे ओळख पत्र निवडले आहे त्या ओळखपत्राचा क्रमांक नमूद करावा.
    • Confirm Personal Details : या ठिकाणी आपण वर भरलेली वैयक्तिक माहिती पुन्हा नमूद करावी

  • त्यानंतर संपर्क तपशील मध्ये अर्जदाराने आपला पत्ता काळजीपूर्वक नमूद करावा व इलेक्ट्रिक संपर्क तपशील मध्ये आपला मोबाईल क्रमांक व इमेल आयडी काळजीपूर्वक नमूद करावा. अर्जाच्या पुढील टप्प्यात इमेल व मोबाईल क्रमांकावर ओटीपी प्राप्त होतात.

 

 

  • Password (पासवर्ड): अर्जदाराने पासवर्ड ची पूर्तता करतांना त्यात एक कॅपिटल वर्ण, एक लहान वर्ण, एक संख्या आणि एक विशेष वर्ण असणे देखील गरजेचे आहे (उदा. Pass@1234 / Name@year)
  • वरीलप्रमाणे सर्व माहिती नमूद करून झाल्यानंतर Submit या पर्यायावर क्लिक करावे.

 

  • पुढील पेज वर क्लिक केल्यानंतर अर्जदारास आपल्या अर्जाचा प्रीव्हिव दिसेल अर्जदाराने आपण भरलेली माहिती काळजीपूर्वक तपासावी व काही बदल असल्यास योग्य तो बदल करून सर्वात शेवटी Submit and send OTP to verify Mobile Number या पर्यायावर क्लिक करावे
  • आपल्या मोबाईल वर प्राप्त OTP नमूद करून Submit Registration Form वर क्लिक करावे.

 

  • त्यानंतर आपल्या स्क्रीन वर उजव्या बाजूला Application No दिसेल अर्जदाराने हा क्रमांक जपून ठेवावा व Fill Up Application Form या पर्यायावर क्लिक करावे.
  • पुढील Application Status या पेजवर आपणास अर्जाच्या स्टेप्स दिसतील अर्जदाराने एक एक करून ह्या स्टेप्स पूर्ण करायच्या आहेत.
  • Personal Details या सेक्शन मधील माहिती कशी भरावी याबद्दल घेवूया.
    • या सेक्शन मध्ये अर्जदाराचे नाव, जन्मतारीख, लिंग, वडिलांचे नाव, आईचे नाव, हि माहिती या आधी नोंदणी केल्या प्रमाण उपलब्ध असेल
    • Nationality : या ठिकाणी अर्जदाराने आपले राष्ट्रीयत्व नमूद करावे.
    • Category व Confirm Category : या ठिकाणी अर्जदाराने आपला जातीचा प्रवर्ग नमूद करावा.
    • त्यानंतर अर्जदार अपंग असेल तर आपल्या अपंगत्वाची माहिती नमूद करावी
    • Employment Status : या ठिकाणी अर्जदाराने आपल्या रोज्गाराबद्दल माहिती द्यावी उदा. अर्जदार जर बेरोजगार असेल तर Not Employed हा पर्याय निवडावा, जर अर्जदार एक शिक्षक म्हणून कार्यरत असेल तर Employed as Teacher हा पर्याय निवडावा, अर्जदार जर शिक्षक व्यतिरिक्त इतर क्षेत्रात कार्यरत असेल तर Employed other than Teacher हा पर्याय निवडावा.
    • वरीलप्रमाणे सर्व माहिती नमूद करून झाल्यानंतर Save & Next या पर्यायावर क्लिक करावे.

 

  • पुढील Apply For या सेक्शन मध्ये आपल्याला कोणत्या पेपर साठी अर्ज करायचा आहे याबद्द माहिती द्यायची आहे.
    • Applying For : या ठिकाणी अर्जदार कोणता पेपर देण्यास इच्छुक आहे ते नमूद करावे अर्जदाराने आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पेपर १, पेपर २ किंवा दोन्ही पेपर यापैकी एक पर्याय निवडावा.
    • Language 1 व Language 2 : या ठिकाणी अर्जदाराने आपल्या सोयीनुसार भाषा निवडावी
    • Minimum Educational Qualifications for Classes I to V: या ठिकाणी अर्जदाराने आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार योग्य तो क्रमांक निवडावा
      • १. अर्जदाराने कमीत कमी ५०% गुणांसह १२ उत्तीर्ण केले आहे व शिक्षण क्षेत्रातील २ वर्ष कालावधीचा पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण आहे किंवा अंतिम वर्षात प्रविष्ठ आहे
      • २. अर्जदाराने कमीत कमी ५०% गुणांसह १२ किंवा समतुल्य अभ्यासक्रम उत्तीर्ण केले आहे व शिक्षण क्षेत्रातील २ वर्ष कालावधीचा एनसीटीई मान्यता प्राप्त पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण आहे किंवा अंतिम वर्षात प्रविष्ठ आहे
      • ३. अर्जदाराने कमीत कमी ४५% गुणांसह १२ उत्तीर्ण केले आहे व शिक्षण क्षेत्रातील El.Ed पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण आहे किंवा अंतिम वर्षात प्रविष्ठ आहे
      • ४. अर्जदाराने कमीत कमी ५०% गुणांसह १२ उत्तीर्ण केले आहे व विशेष शिक्षण क्षेत्रातील २ वर्ष कालावधीचा पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण आहे किंवा अंतिम वर्षात प्रविष्ठ आहे
    • Minimum Educational Qualifications for Classes VI to VIII
      • १. अर्जदाराने कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण केलेली आहे व शिक्षण शेत्रातील पदविका परीक्षा (El.Ed.) उत्तीर्ण किंवा अंतिम वर्षात प्रविष्ठ आहे
      • अर्जदाराने कमीत कमी ५०% गुणांसह पदवी किंवा पदवीत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण आहे व शिक्षण शास्त्रातील पदवी (B.Ed.) उत्तीर्ण आहे किंवा अंतिम वर्षात प्रविष्ठ आहे.
      • अर्जदाराने कोणत्याही शाखेतील पदवीधर धारण केलेली आहे व एनसीटीई मान्यता प्राप्त शिक्षण क्षेत्रातील पदवी (B.Ed.) परीक्षा उत्तीर्ण किंवा प्रविष्ठ आहे.
      • अर्जदाराने कमीत कमी ५०% गुणांसह १२ उत्तीर्ण केले आहे व शिक्षण क्षेत्रातील ४ वर्षे कालावधीची (El.Ed) पदवी उत्तीर्ण आहे किंवा अंतिम वर्षात प्रविष्ठ आहे.
      • अर्जदाराने कमीत कमी ५०% गुणांसह १२ उत्तीर्ण केले आहे व शिक्षण क्षेत्रातील ४ वर्षे कालावधीची A/B.Sc.Ed किंवा B.A.Ed/B.Sc.Ed पदवी उत्तीर्ण आहे किंवा अंतिम वर्षात प्रविष्ठ आहे.
      • अर्जदाराने कमीत कमी ५०% गुणांसह कोणत्याही क्षेत्रातील पदवी धारण केलेली आहे व विशेष शिक्षण क्षेत्रातील पदवी परीक्षा उत्तीर्ण आहे किंवा अंतिम वर्षात प्रविष्ठ आहे.
      • अर्जदाराने व एनसीटीई मान्यता प्राप्त B.Ed. अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे व एनसीटीई मान्यता प्राप्त कोणताही शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक्रम शिकत आहे.
      • अर्जदाराने कमीत कमी ५५% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी धारण केलेली आहे व ३ वर्ष कालावधीचा एकत्मित Ed-M.Ed अभ्यासक्रम उत्तीर्ण आहे किंवा अंतिम वर्षात शिकत आहे.
    • अर्जदाराने या ठिकाणी आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार योग्य ते पर्याय निवडावे
    • Subject offered for Paper-II : अर्जदाराने जर पेपर २ पर्याय निवडला असेल तर पेपर २ साठी Social Science किंवा Mathematics & Science यापैकी योग्य तो पर्याय निवडावा.
    • Qualifying Exam: या ठिकाणी अर्जदाराने आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदविका किंवा पदवी जी पात्रता धारण केलेली असेल ती निवडून Save & Next या पर्यायावर क्लिक करावे.

 

  • पुढील Document Upload सेक्शन मध्ये अर्जदाराने आपला पासपोर्ट आकाराचा फोटो व स्वाक्षरी ची स्कॅन केलेली फाईल अपलोड करावी. पासपोर्ट साईज फोटो ची साईज १० केबी ते २०० केबी या दरम्यान असावी. व स्वाक्षरी ची साईज ४ केबी ते ३० केबी या दरम्यान असावी. अर्जदाराने फोटो व स्वाक्षरी अपलोड केल्यानंतर View या पर्यायाचा वापर करून एकदा खात्री करून घ्यावी..

  • पुढील Review Page सेक्शन मध्ये अर्जदारास आपण भरलेल्या माहितीच्या आधारावर संपूर्ण अर्जाचे पुनरावलोकन करता येते अर्जदाराने सर्व माहिती काळजीपूर्वक वाचन करावे व काही बदल करायचा असल्यास योग्य तो बदल करून अर्ज Submit करावा व इमेल वर प्राप्त OTP टाकून अर्जाचा शुल्काचे पेमेंट करावे
  • अश्या प्रकारे आपण CTET २०२६ चा अर्ज

 


मदत केंद्र

अर्जदारास ऑनलाईन अर्ज करतांना ऑनलाईन अर्ज प्रक्रियेत कोणतीही अडचण आल्यास ते 011–24050477 या संपर्क क्रमांकावर किंवा ctet.cbse@nic.in किंवा directorctet@cbseshiksha.in या इमेल वर संपर्क करू शकता, किंवा https://ctet.nic.in/contact-us या संकेतस्थळावर उपलब्ध इतर संपर्क क्रमांकावर संपर्क करू शकता.


नेहमी विचारले जाणारे प्रश्न 

 

  • मी शिक्षण क्षेत्रातील पदविका किंवा पदवी अभ्यासक्रम प्रविष्ठ आहे, तर मी CTET परीक्षा देऊ शकतो का ?
    • हो शिक्षण क्षेत्रातील पदविका किंवा पदवी अभ्यासक्रम प्रविष्ठ असाल तरी CTET परीक्षा देऊ शकता.
  • CTET परीक्षेत एकूण किती पेपर असतात
    • CTET मध्ये मुख्यत्वे वर्ग १ ते ५ साठी पेपर १ व वर्ग ६ ते वर्ग ८ साठी पेपर २ असे दिन पेपर असतात
  • अर्ज भरतांना अर्जात चुका झाल्या आहे तर त्या दुरुस्त करता येतात का?
    • हो अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर अर्ज दुरुस्ती ची मुदत देण्यात येते त्या कालावधीत आपण अर्जात योग्य तो बदल करता येतात.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Index