भारतीय स्टेट बँक तर्फे अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदाच्या एकूण 1500 रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक उमेदवार दिनांक 18 जून २०२६ ते ०८ जुलै २०२६ या कालावधीत https://ibpsreg.ibps.in/sbipojun26/ या संकेतस्थळास भेट देऊन ऑनलाईन अर्ज सादर करू शकता.
ह्या पोस्टद्वारे आपण SBI प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदाच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पत्रता, वयोमर्यादा, आवश्यक कागदपत्रे, परीक्षा शुल्क, प्रश्पात्रिकेचे स्वरूप, व ऑनलाईन अर्ज कसा करावा याबद्दल स्टेप बाय स्टेप माहिती घेऊया तसेच आपला अर्ज यशस्वीरीत्या कसा पूर्ण करता येईल याबद्दल काही महत्वाच्या टिप्स देखील देण्यात आलेल्या आहेत.
अर्ज करण्यापूर्वी अर्जदाराने अधिकृत जाहिरातीचे सविस्तर वाचन केलेले पाहिजे व आपण या पदासाठी पात्र आहोत याची खात्री झाल्यानंतरच ऑनलाईन अर्ज करावा याची नोंद घ्यावी. अधिकृत जाहिरात हिंदी भाषेत वाचण्यासाठी ह्या लिंक चा वापर करावा व इंग्रजी भाषेत वाचण्यासाठी ह्या लिंक वर क्लिक करावे
शैक्षणिक पात्रता
- उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून कोणत्याही विषयामध्ये पदवीधर असायला हवा, किंवा पदवी परीक्षाक्रमाच्या अंतिम वर्षात प्रविष्ठ हवा.
भरती वेळापत्रक
- इच्छुक उमेदवार दिनांक ०१ एप्रिल २०२६ ते ०८ जुलै २०२६ या कालावधी मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज व अर्जाच्या शुल्काचे पेमेंट करू शकता, ऑगस्ट २०२६ मध्ये पूर्व परीक्षेचे आयोजन अरण्यात आलेले आहे त्याचे प्रवेशपत्र जुलै २०२६ च्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात डाऊनलोड करता येईल, पूर्व परीक्षेचा निकाल सर्वसाधारणपणे ऑगस्ट किंवा सप्टेंबर २०२६ मध्ये जाहीर होईल, त्यानंतर लगेचच ऑनलाईन मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध होतील व सप्टेंबर २०२६ मध्ये मुख्य परीक्षा घेतली जाईल, त्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबर २०२६ पर्यंत भारती प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.
वयोमर्यादा
- या भरती प्रक्रियेच्या वय गणनेसाठी ०१ एप्रिल २०२६ हि तारीख निच्छित करण्यात आलेली असून, या तारखेपर्यंत अर्जदाराचे वर कमीत कमी २१ वर्षे व जास्तीत जास्त ३० वर्षे असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे इतर मागासवर्गीय उमेदवारांना वयोमर्यादेत ३ वर्षाची सूट देण्यात आलेली असून अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना ५ वर्षे सूट देण्यात येत आहे, त्याचप्रमाणे अपंग उमेदवारांना १० ते १५ वर्षे व माझी सैनिकांना ५ वर्षे सूट देण्यात येत आहे.
- ०१ एप्रिल २०२६ पर्यंत आपले वय मोजण्यासाठी Age Calculator / वय गणक यंत्र चा वापर करण्यासाठी
येथे क्लिक करा
परीक्षा शुल्क
- अर्जदाराच्या प्रवर्गानुसार शुल्क पुढीलप्रमाणे
- खुला प्रवर्ग / EWS/ इतर मागास प्रवागाचे उमेदवारांसाठी ७५०/- रुपये परीक्षा शुल्क आहे
- अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती / अपंग उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क नाही आहे
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आवश्यक माहिती व कागदपत्रे
- आधार कार्ड
- पासपोर्ट आकाराचा स्कॅन केलेला फोटो (फाईल साईज : २०-५० KB)
- काळ्या शाई च्या पेन ने केलेली स्वाक्षरी : (फाईल साईज : १०-२० KB)
- पदवी परीक्षा गुणपत्रक
- काळ्या किंवा निळ्या शाई च्या पेन ने लिहलेले स्वयं घोषणापत्र : (फाईल साईज : ५०-१० KB)
- घोषणापत्र नमुना : “I,______(Name of the candidate), Date of Birth ______hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when required. The signature, photograph and left thumb impression is of mine”
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
- अर्जदाराचा नोंदणी
- सर्वप्रथम अर्जदाराने स्टेट बँक ऑफ इंडिया चे अधिकृत संकेतस्थळ उघडावे https://sbi.bank.in/web/careers/current-openings या संकेतस्थळावर स्टेट बँक ऑफ इंडिया तर्फे वर्तमान काळात चालू असेलेल्या सर्व भरती प्रक्रियांन बद्दल आपणास माहिती दिसेल. अर्जदाराने ADVERTISEMENT NO:CRPD/PO/2026-27/09 / RECRUITMENT OF PROBATIONARY OFFICERS या भारती प्रक्रियेचे APPLY ONLINE हा पर्याय निवडावा

- पुढील स्क्रीन वर अर्जदारास Click here for New Registration व Login for already Registered Candidates असे दोन पर्याय दिसतील जर अर्जदाराने या आधीच नोंदणी केली असेल तर लॉगीन चा पर्याय निवडावा व जर नोंदणी केलेली नसेल तर नवीन नोंदणी चा पर्याय निवडावा
- नवीन नोंदणी च्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर पुढील पेज वर अर्जदारास प्राथमिक स्वरुपाची माहिती नमूद करण्याचा पर्याय येईल ती माहिती कशी भरावी ते बघू, अर्जाचे एकूण ६ टप्पे असतील प्राथमिक माहिती, फोटो व स्वाक्षरी, सर्वसाधारण माहिती, शैक्षणिक माहिती, प्रीव्हीव, अपलोड, पेमेंट.
- प्राथमिक माहिती
- First Name: अर्जदाराने आपल्या कागदपत्रांनुसार आपले पहिले नाव नमूद करावे.
- Middle Name: अर्जदाराने आपल्या कागदपत्रांनुसार आपले वडलांचे नाव नमूद करावे.
- Last Name: अर्जदाराने आपल्या कागदपत्रांनुसार आपले आडनाव नाव नमूद करावे.
- Mobile Number: अर्जदाराने आपला मोबाईल क्रमांक नमूद करावा
- Alternative Number: अर्जदाराकडे एकापेक्षा जास्त मोबाईल क्रमांक उपलब्ध असल्यास तो क्रमांक नमूद करावा.
- Email ID: अर्जदाराने आपला इमेल आयडी नमूद करावा.
- Security Code : अर्जदाराने स्क्रीन वर दिसत असलेला कॅपचा कोड जसाच्या तसा नमूद करावा.
- वरीलप्रमाणे सर्व माहिती नमूद केल्यानंतर Save Next या पर्यायावर क्लिक करावे
- अर्जदारास आपल्या मोबाईल क्रमांक व इमेल आयडीवर अर्ज प्रक्रियेसाठी नोंदणी क्रमांक व पासवर्ड प्राप्त होईल अर्जदाराने तो जपून ठेवावा तसेच अर्जदारास स्क्रीनवर देखील नोंदणी क्रमांक व पासवर्ड दिसेल.
- OTP व्हेरिफिकेशन
- या पेजवर सर्वप्रथम अर्जदाराने OTP Verification या सेक्शन मधील कॅपचा कोड नमूद करून मोबाईल क्रमांकासामोरील Send OTP या पर्यायावर क्लिक करावे. व मोबाईल क्रमांकावर प्राप्त OTP नमूद करून Verify OTP वर क्लिक करावे.
त्यानंतर पुन्हा कॅपचा कोड नमूद करून ईमेल आयडी क्रमांकासामोरील Send OTP या पर्यायावर क्लिक करावे. व ईमेल आयडीवर प्राप्त OTP नमूद करून Verify OTP वर क्लिक करावे.
- या पेजवर सर्वप्रथम अर्जदाराने OTP Verification या सेक्शन मधील कॅपचा कोड नमूद करून मोबाईल क्रमांकासामोरील Send OTP या पर्यायावर क्लिक करावे. व मोबाईल क्रमांकावर प्राप्त OTP नमूद करून Verify OTP वर क्लिक करावे.

- Photo & Signature
- Scanned Photograph of Candidate: या ठिकाणी अर्जदाराने आपला पासपोर्ट आकाराचा स्कॅन केलेला फोटो ज्याची फाईल साईज २०-५० KB असेल तो अपलोड करावा. आपल्या फोटोचा पृष्ठभाग (Background) हा पंधरा किंवा हलक्या रंगाचा असेल तर उत्तम.
- Capture Photo using Webcamera :अ ठिकाणी अर्जदाराने आपल्या संगणकाच्या वेब कॅमेरा चा वापर करून आपला लाइव्ह फोटो अपलोड करावा.
- त्यानंतर अपलोड केलेले छायाचित्र माझेच आहे ह्या डिक्लेरेशन समोर टिकमार्क करावी.
- Scanned Signature of the Candidate: या ठिकाणी अर्जदाराने आली काळ्या शाई च्या पेन ने केलेली स्वाक्षरी ज्याची फाईल साईज १०-२० KB असेल ती अपलोड करावी.
- त्यानंतर अपलोड केलेली स्वाक्षरी माझीच आहे ह्या डिक्लेरेशन समोर टिकमार्क करावी.
- वरील प्रकारे सर्व माहिती नमूद करून झाल्यांनतर Next या पर्यायावर क्लिक करावे.
बेसिक डीटेल्स
या सेक्शन मध्ये अर्जदाराने पुढीलप्रमाणे माहिती ची नोंद करावी
- सर्वप्रथम अर्जदाराने आपल्या जात प्रवर्गाची निवड करावी व आपली पोट जात नोंदवावी.
- त्यांनतर अर्जदार अपंग असेल तर त्याबद्दल योग्य ती माहिती नोंदवावी. त्यात अर्जदारास अपंगत्वामुळे अर्जदारास परीक्षेसाठी अधिकचा वेळ हवा असेल किंवा लेखनिकाची गर असेल तर तसा पर्याय निवडावा.
- त्यानंतर अर्जदाराने आपला धर्म निवडावा. अर्जदार जर अल्पसंख्याक असेल तर तसा पर्याय निवडावा.
- त्यानंतर अर्जदार जर माझी सैनिक असेल असेल तर तसा पर्याय निवडावा व माजी सैनिक म्हणून किती महिने नोकरी केली आहे ते नोंदवावे.
- त्यानंतर अर्जदाराने या आधी किती वेळा SBI PO ची परीक्षा दिली आहे त्याची नोंद करावी व अर्जदाराने कोणत्याही बँकेकडून कर्ज किंवा क्रेडीट कार्ड घेतले असेल व त्याचे हफ्ते बाकी असतील तर त्यासंबंधी योग्य तो पर्याय निवडावा.
- त्यानंतर अर्जदाराने आपल्या चारित्र्याबद्दल काही प्रतिकूल रिपोर्ट असेल तर त्याबद्दल योग्य तो पर्याय निवडावा.
- या आधी अर्जदाराने स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये करत असल्यास किंवा काम केले असल्यास तसे नमूद करावे,

- त्यांनतर अर्जदाराने आपला पॅन कार्ड क्रमांक नमूद करावा.
- अर्जदाराने पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षेसाठी परीक्षा केंद्र ची निवड करावी. व परीक्षेच्या वेळेस जे ओळखपत्र सादर करणार आहे ते निवडावे ब ओळखपत्राचा क्रमांक नमूद करावा.

व्यक्तिगत माहिती
या सेक्शन मध्ये अर्जदाराने पुढीलप्रमाणे माहिती नमूद करावी
- सर्वप्रथम अर्जदाराने आपली जन्मतारीख नमूद करावी
- त्यानंतर अर्जदारास जुळा भाऊ किंवा बहिण असेल तर त्याबद्दल माहिती नमूद करावी
- त्यानंतर अर्जदाराने आपल्या वडिलांचे, आईचे व विवाहित असल्यास पतीचे/पत्नीचे नाव नमूद करावे

संपर्काचा पत्ता
- या सेक्शन मध्ये अर्जदाराने आपला पत्ता अचूकपणे नमूद करावा.
वरीलप्रमाणे सर्व माहिती नमूद करून झाल्यानंतर अर्जदाराने Save & Next हा पर्याय निवडावा.
शैक्षणिक पात्रता / अनुभव / भाषा
पुढील सेक्शन मध्ये म्हणजे शैक्षणिक पात्रता / अनुभव / भाषा या सेक्शन मध्ये अर्जदाराने पुढीलप्रमाणे माहिती नमूद करावी
- या परीक्षेसाठी कमीत कमी शैक्षणिक पात्रता पदवी आहे त्यामुळे अर्जदाराने सर्वप्रथम पदवी परीक्षेबद्दल माहिती नमूद करावी.
- अर्जदार जर पर्वी परीक्षा उत्तीर्ण असेल किंवा अंतिम वर्षात प्रविस्थ असेल तर त्याबद्दल योग्य तो पर्याय निवडावा.
- त्यानंतर अर्जदाराने कोणत्या क्षेत्रात पदवी परीक्षा उत्तीर्ण केली आहे ते निवडावे
- त्यांनतर अर्जदाराने पदवी परीक्षेचे महाविद्यालय व महाविद्यालयाचा पत्ता नमूद करावा.
- त्यानंतर अर्जदाराने पदवी परीक्षेची उत्तीर्ण दिनांक नमूद करावी व प्राप्त गुणांची टक्केवारी व ग्रेड नमूद करावी.
- त्यानंतर अर्जदार जर (SC/ST/OBC/PWBD) प्रवागातील असेल तर त्यांना परीक्षेसंबंधी मोफत परीक्षापूर्व प्रशिक्षण दिले जाते अर्जदार जर प्रशिक्षण घेण्यास इच्छुक असेल तर प्रशिक्षण केंद्र निवडून योग्य ती माहिती नमूद करावे
- त्यानंतर अर्जदाराने आपल्याला ज्ञात भाषांबद्दल माहिती नमून करावी व Save & Next हा पर्याय निवडावा
- .
अर्ज पूर्वावलोकन
- या सेक्शन मध्ये अर्जदारास त्याने भरलेली माहिती च्या आधारावर अर्जाचे पूर्वावलोकन करता येते अर्जदाराने संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचन करून काही बदल करायचा असल्यास योग्य तो बदल करून Complete Registration या पर्यायावर क्लिक करावे
- त्यानंतर अर्जदाराने जाहिरात मध्ये दिलेले घोषणापत्र स्व हस्ताक्षरात लिहून ते उपलोड करावे व त्याच प्रमाणे डाव्या हाताचा अंगठ्याचा ठसा अपलोड करावे
परीक्षा शुल्क
पुढील सेक्शन मध्ये अर्जदाराने आपल्या अर्जाच्या परीक्षा शुल्काचा भरणा करावा, त्यासाठी इंटरनेट बँकिंग, UPI किंवा कार्ड चा वापर करता येतो
परीक्षा शुल्क भरल्यानंतर अर्जदाराने आपल्या अर्जाची छापील प्रत काढून घ्यावी व ती जपून ठेवावी, SBI PO च्या पूर्व परीक्षा ऑगस्ट २०२६ मध्ये तर मुख्य परीक्षा सप्टेंबर २०२६ मध्ये आयोजित करण्यात आलेले आहे
अधिकृत स्त्रोत
- भारतीय स्टेट बँकचे अधिकृत संकेतस्थळ
- भरती प्रक्रियेची अधिकृत जाहिरात बघण्यासाठी लिंक
- हिंदी : https://tinyurl.com/3a4kaftb
- इंग्रजी : https://tinyurl.com/nurh37hx
- ऑनलाईन अर्ज लिंक