पासपोर्ट म्हणजे काय ?
परदेशात फिरायला जायचं मग पासपोर्ट का? असा संवाद आपल्य्पैकी बऱ्याच जणांनी ऐकला असेल, तर पासपोर्ट म्हणजे नेमकी काय? असाही प्रश्न आपल्याला पडला असेल. ह्या पोस्ट द्वारे आपण पासपोर्ट म्हणजे काय व पासपोर्ट साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा याबद्दल जाणून घेऊ. पासपोर्ट / Passport ह्या शब्दाचा उगम इटली किंवा फ्रांस मध्ये झाला असावा असा समज आहे. जेंव्हा व्यापारासाठी मोठ्या प्रमाणात समुद्री जहाजांद्वारे व्यापारी आंतरराष्ट्रीय प्रवास करू लागले त्या वेळेस त्या वेळेसच्या राजकर्त्यांनी व्यापाऱ्यांची ओळख पटावी व व्यापार व प्रवास सुरक्षित व्हावा म्हणून पास / Pass म्हणून कागदपत्रे किंवा मुद्रा देण्यास सुरवात केली, व ह्या कागदपत्रांचा किंवा मुद्रांचा वापर बंदर / Port वर मोठ्या प्रमाणत होत असे त्यामुळे पास व पोर्ट अश्या २ शब्दांचे पुढे पासपोर्ट असे रुपांतर झाले.
आजच्या युगात पासपोर्ट हे एक महत्वाचे कागदपत्र असून जगावरील जवळ जवळ प्रत्येक देशाकडे स्वताची पासपोर्ट यंत्रणा आहे. पासपोर्ट हे एक अत्यंत महत्वाचे कागदपत्र असून जेव्हा एखादा भारतीय नागरिक प्रवासासाठी, शिक्षणासाठी, व्यापारासाठी, वैद्यकीय उपचारासाठी किंवा इतर कोणत्याही उद्देशाने भारताबाहेर जातो त्या वेळेस पासपोर्ट हे एक ओळखीचा पुरावा, इमिग्रेशन साठी सर्वात महत्वाचे कागदपत्र, आपण भारतीय नागरिक आहोत याचा पुरावा व परदेशात काही अडचण आल्यास तेथील भारतीय दुतावासात मदत मिळविण्यासाठी मदत म्हणून फक्त पासपोर्ट उपयोगात येतो.
पासपोर्ट काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
पासपोर्ट काढण्यासाठी अर्जदाराकडे पुढीलप्रमाणे कागदपत्रे असणे गरजेचे आहे
- पत्त्याचा पुरावा
- पाणी पट्टी
- दूरध्वनी बिल
- वीज बिल
- मतदान कार्ड
- अर्जदार विवाहित असल्यास पती किंवा पत्नीचे पासपोर्ट
- अर्जदार नाबालिक असल्यास पालकांचे पासपोर्ट
- अर्जदार भाड्याच्या घरात राहत असल्यास भाडेकरारनामा
- अर्जदाराचे राष्ट्रीयकृत बँक चे खातेपुस्तक
- जन्मतारखेचा पुरावा
- जन्म प्रमाणपत्र
- शाळा सोडायचा दाखला
- पॅन कार्ड
- वाहन चालक परवाना / ड्रायव्हिंग लायसन्स
- मतदान कार्ड
- इतर कागदपत्रे
- नावात बदल असल्यास नावात बदल चे राजपत्र
- अर्जदार स्वतः, अर्जदाराची पत्नी, अर्जदाराचे पती, अर्जदार नाबालिक असल्यास अर्जदाराचे पालक कोणी जर सरकारी नोकरीस असतील तर संबंधित कार्यालयाकडून ना हरकत दाखला.
- अर्जदार NCVT तर्फे मान्यताप्राप्त २ वर्ष कालावधीचा पदविका अभ्यासक्रम किंवा ३ वर्षे कालावधीची पदवी परीक्षा उत्तीर्ण असल्यास त्याचे प्रमाणपत्र
पासपोर्ट साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
भारत सरकार तर्फे पासपोर्ट मिळविण्याची प्रक्रिया जलद व सुलभ करण्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
- सर्वप्रथम अर्जदाराने आपल्या संगणकावर ऑनलाईन पासपोर्ट अर्ज प्रणाली चे https://www.passportindia.gov.in/psp संकेतस्थळ उघडावे. व स्क्रीन च्या उजव्या बाजूस असलेल्या Register ह्या ह्या पर्यायावर क्लिक करावे.

- पुढील स्क्रीन वर अर्जदारासमोर अर्जदार नोंदणी फॉर्म दिसेल, सर्वप्रथम अर्जदार जर दिल्ली क्षेत्रातील रहिवासी असेल तर CPV Delhi हा पर्याय निवडावा किंवा Passport Office ह्या पर्यायावर क्लिक करून आपल्या रहिवासी पत्त्यानुसार आपले पासपोर्ट कार्यालय निवडावे, त्यानंतर अर्जदाराने आपले संपूर्ण नाव अचूकपणे नमूद करावे, त्यानंर अर्जदाराने आपला इमेल आयडी नमूद करावा, पासपोर्ट अर्ज प्रक्रियेसाठी अर्जदाराचा इमेल आयडीच आपला वापरकर्ता आयडी (User Name / User ID) म्हणून पाहिजे असेल तर तसा पर्याय निवडावा, जर अर्जदारास इमेल आयडी हा वापरकर्ता आयडी म्हणून वापरायचा नसेल तर आपल्या आवडीनुसार वापरकर्ता आयडी नमूद करावा व पासवर्ड च्या रकान्यात लक्षात राहील असा पासवर्ड नमूद करून Sign Up ह्या पर्यायावर क्लिक करावे. अर्जदाराने आपल्या आपला वापरकर्ता आयडी (User Name / User ID) काळजीपूर्वक जपून ठेवणे यदाकदाचित जर भविष्यात आपण आपले लॉगीन माहिती विसरला तर हि माहिती खूप गरजेची ठरते.

- त्यानंतर अर्जदारास त्याच्या इमेल आयडीवर ४ अंकी ओ टी पी प्राप्त होईल अर्जदाराने अचूकपणे ओ टी पी नमूद करून Complete Signup या पर्यायावर क्लिक करावे

- नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जदाराने पुन्हा ऑनलाईन पासपोर्ट अर्ज प्रणाली चे https://www.passportindia.gov.in/psp संकेतस्थळ उघडावे व स्क्रीन च्या उजव्या बाजूला असलेल्या Login या पर्यायावर क्लिक करावे, लॉगीन पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपण नोंदणी करतांना नमूद केलेला वापरकर्ता आयडी वापरून Continue या पर्यायावर क्लिक करावे, यापुढे आपणास पासवर्ड किंवा OTP असे दिन पर्याय दिसतील आपण आपल्या आवडीनुसार पर्याय निवडून पासवर्ड किंवा इमेल वरील OTP नमूद करून Sign In या पर्यायावर क्लिक करावे व आपल्या खात्यामध्ये प्रवेश करावा.

- आपल्या खात्यात लॉग इन केल्यानंतर आपल्यापुढे अनेक वेगवेगळ्या सेवांच्या लिंक दिसतील आपण ह्या त्यातल्या Apply for Fresh Passport / Re-Issue of Passport हता पर्यायावर क्लिक करावे

- पुढील पेजवर आपल्याकडे आधीच पासपोर्ट आहे का असा प्रश्न विचारला जाईल जर या आधी आपल्याकडे पासपोर्ट असेल तर त्याचा क्रमांक व आपली जन्मतारीख टाकावी, जर आपण पूर्णपणे नवीन पासपोर्ट साठी अर्ज करत असाल तर Skip For Now हा पर्याय निवडावा त्यानंतर आपल्यापुढे आपले पासपोर्ट कार्यालय निवडण्यासाठी पर्याय उपलब्ध होईल या ठिकाणी आपण नोंदणी करते वेळेस जे कार्यालय निवडले होते तेच कार्यालय दिसेल त्यामुळे सरळ Next या पर्यायावर क्लिक करावे.
- त्यानंतर आपल्यापुढे खरी अर्ज प्रक्रिया सुरु होते सर्वात प्रथम आपणास आपण नवीन पासपोर्ट साठी अर्ज करत आहात कि पासपोर्ट नूतनीकारणासाठी अर्ज करत आहात असा प्रश्न विचारला जाईल या ठिकाणी Fresh Passport या पर्यायावर क्लिक करावे, त्यानंतर आपल्याला आपल्याला अर्जाचा प्रकार विचारला जाईल ज्यात सामान्य व तत्काळ असे दोन पर्याय उपलब्ध असतात. सामान्य व तत्काळ प्रक्रियेमध्ये नावानुसारच फरक स्पष्ठ होतो तो म्हणजे वेळेचा सामान्य अर्ज प्रक्रिया व तत्काळ अर्ज प्रक्रियेचे मुलाखतीचे वेळापत्रक वेगवेगळे असते व सामान्य पासपोर्ट मुलाखतीनंतर १०-१५ दिवसात आपल्यास पोस्टाद्वारे मिळतो तर तत्काळ मध्ये २ ते ३ दिवसात, आपल्यास पासपोर्ट लवकरात लवकर हवा असेल तर आपण तत्काळ हा पर्याय निवडू शकता. पासपोर्ट सेवा केंद्रातील मुलाखत किंवा भेटीची वेळ कधी उपलब्ध आहे ते तपासण्यासाठी आपण Appointment Availability या लिंक चा वापर करून तारखेची उपलब्धता तपासू शकता व आपल्या सोयीनुसार सामान्य किंवा तत्काळ हा पर्याय निवडू शकता.
- सामान्य पासपोर्ट
- सेवा शुल्क
- १५ वर्षा खालील नागरिक : १००० रुपये
- १८ वर्ष वरील नागरिक (३६ पाणी पासपोर्ट ) : १५०० रुपये
- १८ वर्ष वरील नागरिक (६० पाणी पासपोर्ट ) : २००० रुपये
- सेवा कालावधी : पासपोर्ट सेवा केंद्रातील कागदपत्रे पडताळणीच्या १० ते १५ दिवसात
- सेवा शुल्क
- तत्काळ पासपोर्ट
- सेवा शुल्क
- १५ वर्षा खालील नागरिक : ३००० रुपये
- १८ वर्ष वरील नागरिक (३६ पाणी पासपोर्ट ) : ३५०० रुपये
- १८ वर्ष वरील नागरिक (६० पाणी पासपोर्ट ) : ४००० रुपये
- सेवा कालावधी : पासपोर्ट सेवा केंद्रातील कागदपत्रे पडताळणीच्या ३ दिवसात
- सेवा शुल्क
- तसेच आपणास किती पानांचा पासपोर्ट हवा आहे ते आपल्या आवडीनुसार निवडू शकता पानाच्या संख्येनुसार पासपोर्ट च्या धुळकट बदल होतो. जर आपण नेहमी परदेशवारी करणार असाल तर ६० पाणी पासपोर्ट साठी अर्ज करण्यास हरकत नाही. वरीलप्रमाणे सर्व महिनी नमूद केल्या नंतर Save and Next या पर्यायावर क्लिक करावे.
- पुढील स्टेप मध्ये म्हणजे Applicant Details मध्ये अर्जदाराने Given Name मध्ये आपले प्रथम नाव व मधले नाव नमूद करावे व Surname मध्ये आडनाव नमूद करावे (उदा. जर अर्जदाराचे नाव आत्माराम तुकाराम भिडे असेल तर Given Name मध्ये “आत्माराम तुकाराम” व Surname मध्ये “भिडे”) असे नमूद करावे, त्यानंतर अर्जदाराने आपले लिंग नमूद करावे, त्यानंतर अर्जदाराला जर एखाद्या दुसऱ्या नावाने ओळखले जात असेल तर Yes हा पर्याय निवडून ते नाव नमूद करावे, त्यानंतर अर्जदाराच्या नावात बदल असल्यास Yes हा पर्याय निवडून बदललेले नाव नमूद करावे, त्यानंतर अर्जदाराने आपली जन्मतारीख DD/MM/YYYY या या स्वरुपात नमूद करावी. त्यानंतर अर्जदाराने आपले जन्मस्थळ भारताबाहेरील आहे का या पर्यायासमोर योग्य तो पर्याय निवडून आपले जन्मस्थळ नमूद करावे.
- सामान्य पासपोर्ट

- त्यानंतर आपली वैवाहिक स्थिती बद्दल माहिती नमूद करावी, त्यानंतर अर्जदाराने आपण भारतीय नागरिकत्व कोणत्या स्वरूपाने आहे ते निवडावे, त्यानंतर पॅन कार्ड व मतदान कार्ड क्रमांक नमूद करावा,

- त्यानंतर अर्जदाराने आपले व्यवसाय किंवा रोजगार बद्दल माहिती निवडावी, अर्जदार जर नाबालिक असेल व अर्जदाराचे पालक शासकीय सेवेत असतील तर त्याबद्दल माहिती नमूद करावी, त्यांनतर अर्जदाराने आपली शैक्षणिक पात्रता नमूद करावी व त्यानंतर Non-ECR category? बद्दल माहिती नोंदवावी आपण Non-ECR category? अंतर्गत येता कि नाही याबद्दल माहितीसती Is applicant eligible for Non-ECR category? या पर्यायासामोरील येथे क्लिक करा या पर्यायावर क्लिक करून अधिक माहिती वाचू शकता त्यानंतर अर्जदाराच्या शरीरावर तीळ, जखमेचे निशाण, जन्मखून असेल तर ते नमूद करावे, व अर्जदाराने आपला आधार कार्ड क्रमांक नमूद करून खाली दिलेले घोषणापत्र मंजूर करून Save and Next या पर्यायावर क्लिक करावे.

- त्यानंतर Family Details या स्टेप मध्ये अर्जदाराने आपल्या वडलांचे नाव आपल्या आईचे नाव व विवाहित असल्यास आपल्या पत्नीचे नाव नमूद करावे, नाव नमूद करतांना Given Name या रकान्यात प्रथम नाव व मधले नाव व Surname या रकान्यात आडनाव नमूद करावे , सर्व माहिती नमूद करून झाल्यानंतर Save and Next या पर्यायावर क्लिक करावे.

- त्यानंतर पुढील स्टेप मध्ये अर्जदाराने आपला पत्ता अचूकपणे नमूद करावा, या ठिकाणी आपण जो पत्ता नमूद करू तोच पत्ता आपल्या पासपोर्ट वर दिसणार आहे जर पत्ता नमूद करतांना आपणा पत्ता शब्दमर्यादेच्या कारणामुळे पूर्ण बसत नसेल तर ज्या जेवढा पत्ता बसतो आहे तेवढा नमूद करावा व पासपोर्ट सेवा केंद्रात कागदपत्रे तपासणीच्या वेळेस उपस्थित अधिकाऱ्यांकडून तो पूर्ण करून घेणे.

- पुढील स्टेप मध्ये आपणास आपात कालीन संपर्क बद्दल माहिती नोंदवावी लागते ज्यात आपल्या नातेवाईकाचे किंवा जवळच्या परिचित व्यक्तीचे नाव व पत्ता देऊ शकतो, परदेशात असल्यावर जर आपल्यावर काही संकट आले तर आपल्या स्थिती बद्दल माहिती देण्यासाठी हा संपर्क तपशील वापरला जाईल.

- पुढील स्टेप मध्येअर्जदाराकडे याआधीच जर पासपोर्ट काढलेला असेल किंवा अर्ज केला आहे परंतु अर्ज रद्द करण्यात आला याबद्दल माहिती विचारण्यात आली आहे सर्वसामान्यपणे या ठिकाणीसर्व उत्तरे No अशी द्यावी परंतु जर या आधी अर्जदाराने पर्पोस्त धारण केला असेल तर त्या अनुशंघाने उत्तरांचा पर्याय निवडावा.

- पुढील स्टेप मध्ये अर्जदाराच्या कायदेशीर बाबींबाबत विचारणा करण्यात आलेली आहे, जर अर्जदारावर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल असेल, किंवा न्यायालयात एखादे प्रकरण प्रलंबित असेल तर त्याबद्दल माहिती द्यावी लागते, अर्जदारास यापूर्वी च्या सर्व कायदेशीर इतिहासाबद्दल व वर्तमान स्थितीबद्दल द्यावी
- त्यानंतरच्या स्टेप मध्ये अर्जदारास त्याने अर्जात नमूद केलेल्या माहितीनुसार Passport Preview दाखवला जातो, अर्जदाराने सर्व माहिती व्यवस्थित वाचून घ्यावी काही बदल असल्यास योग्य तो बदल करून घ्यावा व Save and Next या पर्यायावर क्लिक करावे

- या पुढील स्टेप मध्ये अर्जदाराने जन्मतारखेचा पुरावा, पत्त्याचा पुरावा साठी योग्य ते कागदपत्रे निवडून खाली आपल्या गावाचे शहराचे नाव नमूद करून Submit या पर्यायावर क्लिक करावे
- अर्ज सबमिट केल्यानंतर Pay and Schedule Appointment या पर्यायावर क्लिक करावे, पायरीवर Select PSK या पर्यायाखील आपल्याला हवे ते पासपोर्ट सुविधा केंद्र निवडावे.
- त्यानंतर अर्जदार आपल्या सोयीनुसार कागदपत्र तपासणीसाठी पासपोर्ट सुविधा केंद्राची मुलाखतीची तारीख निवडू शकता व Make Payment वर क्लिक करून आपल्या आवडीप्रमाणे इंटरनेट बँकिंग, UPI, डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड या सारख्या पर्यायांचा वापर करून पासपोर्ट अर्जाचे शुल्क भरू शकता.
- शुल्क भरल्यानंतर अर्जदाराने ऑनलाईन अर्जाची प्रत, शुल्क भरल्याची पावती व अपॉइंटमेंट स्लीप ची प्रिंट काढून घ्यावी व ती जपून ठेवावी
- त्यानंतर अर्जदाराने आपण निवडलेल्या तारखेला अर्जाच्या घापील प्रिंट व इतर आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन पासपोर्ट सुविधा केंद्रास भेट द्यावी, आपले कागदपत्र पडताळणी पूर्ण झाल्यानंतर, आपल्या पत्त्यानुसार आपल्या जवळच्या पोलीस स्टेशन ला भेट देऊन आपली पोलीस व्हेरिफिकेशन ची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.
- वरील सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पोस्टाद्वारे आपल्याला आपले पासपोर्ट घरपोच प्राप्त होईल.
- पासवर्ड विसरल्यास काय करावे ?
- अश्या परिस्थितीत अर्जदाराने लॉगीन पर्यायाखीलील Having Trouble Logging in ? या पर्यायावर क्लिक करावे त्या Login ID च्या रकान्यात आपण नोंदणी करतांना जो वापरकर्ता आयडी (User Name) नमूद करावा व उपलब्ध पर्यायामधून इमेल वर OTP प्राप्त करावा किंवा नोंदणी करतांना नमूद केलेला Hint Question किंवा मोबाईल वर OTP यापैकी सुविधेनुसार पर्याय निवडून गेट ओ.टी.पी. वर क्लिक करावे व आपल्याला प्राप्त OTP नमूद करून नवीन पासवर्ड सेट करावा.
- पासवर्ड सुविधा केंद्रात निच्छित केलेल्या तारखेस उपस्थित न राहिल्यास काय करावे?
- अश्या परिस्थितीत अर्जदाराने आपल्या लॉगीन डिटेल चा वापर करून आपल्या खात्यात लॉगीन करावे व Pay and Schedule Appointment या पर्यायावर क्लिक करून पासपोर्ट सुविधा केंद्र निवडावे व नव्याने तारीख निवडावी.
- पासपोर्ट शुल्काचा भरणा केल्यानंतर संकेतस्थळावर पेमेंट स्टेट्स अपडेट झाले नाही?
- अश्या परिस्थितीत अर्जदाराने ४५ मिनिट वाट बघावी सर्वसाधारणपणे ४५ मिनटात पेमेंट चे स्टेट्स अपडेट होते, त्यानंतरही स्टेट्स अपडेट न झाल्यास आपल्या खात्यात लॉगीन करून पेमेंट च्या पर्यायाखाली Verify Payment Status चा पर्याय वापरावा त्यानंतरही स्टेट्स अपडेट न झाल्यास आपल्या बँक खात्यात पैसे परत आले आहे कि नाही ते चेक करावे, बँक खात्यात पैसे परत आले नसतील तर 00691@sbi.co.in या इमेल वर किंवा 011-41561114 या क्रमांकावर संपर्क करून तक्रार नोंदवावी आपल्या तक्रारीची यीग्य ती दखल घेतली जाईल.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
- पासवर्ड विसरल्यास काय करावे ?
- अश्या परिस्थितीत अर्जदाराने लॉगीन पर्यायाखीलील Having Trouble Logging in ? या पर्यायावर क्लिक करावे त्या Login ID च्या रकान्यात आपण नोंदणी करतांना जो वापरकर्ता आयडी (User Name) नमूद करावा व उपलब्ध पर्यायामधून इमेल वर OTP प्राप्त करावा किंवा नोंदणी करतांना नमूद केलेला Hint Question किंवा मोबाईल वर OTP यापैकी सुविधेनुसार पर्याय निवडून गेट ओ.टी.पी. वर क्लिक करावे व आपल्याला प्राप्त OTP नमूद करून नवीन पासवर्ड सेट करावा.
- पासवर्ड सुविधा केंद्रात निच्छित केलेल्या तारखेस उपस्थित न राहिल्यास काय करावे?
- अश्या परिस्थितीत अर्जदाराने आपल्या लॉगीन डिटेल चा वापर करून आपल्या खात्यात लॉगीन करावे व Pay and Schedule Appointment या पर्यायावर क्लिक करून पासपोर्ट सुविधा केंद्र निवडावे व नव्याने तारीख निवडावी.
- पासपोर्ट शुल्काचा भरणा केल्यानंतर संकेतस्थळावर पेमेंट स्टेट्स अपडेट झाले नाही?
- अश्या परिस्थितीत अर्जदाराने ४५ मिनिट वाट बघावी सर्वसाधारणपणे ४५ मिनटात पेमेंट चे स्टेट्स अपडेट होते, त्यानंतरही स्टेट्स अपडेट न झाल्यास आपल्या खात्यात लॉगीन करून पेमेंट च्या पर्यायाखाली Verify Payment Status चा पर्याय वापरावा त्यानंतरही स्टेट्स अपडेट न झाल्यास आपल्या बँक खात्यात पैसे परत आले आहे कि नाही ते चेक करावे, बँक खात्यात पैसे परत आले नसतील तर 00691@sbi.co.in या इमेल वर किंवा 011-41561114 या क्रमांकावर संपर्क करून तक्रार नोंदवावी आपल्या तक्रारीची यीग्य ती दखल घेतली जाईल.
हेल्पलाईन नं व संपर्क क्रमांक
अर्जदारास जर ऑनलाईन अर्ज भरतांना किंवा इतर प्रक्रियेमध्ये काही अडचण आल्यास ते 1800-258-1800 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करून आपली अडचण सोडवू शकता.
त्याच प्रमाणे पासपोर्ट च्या अधिकृत संकेतस्थळावर संपर्क करा या पेजवरील पासपोर्ट कार्यालयाच्या विविध विभागाचे संपर्क क्रमांक उपलब्ध आहे ह्या लिंक वर क्लिक करून आपण याबद्दल अधिक माहिती घेऊ शकता