CRPF भरतीसाठी अर्ज कसा करावा? | HOW TO APPLY FOR CRPF RECRUITMENT?

नुकतेच CRPF तर्फे विविध पदांच्या ९१९५ जागांसाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. CRPF म्हणजे केंद्रीय राखीव पोलीस दल, CRPF चे कामकाज के केंद्र सरकार च्या गृह मंत्रालय अंतर्गत चालते, ह्या पोस्टद्वारे आपण भरती प्रक्रियेचा ऑनलाईन अर्ज कसा भरावा याबद्दल जाणून घेऊया.

CRPF भरती प्रक्रिया अर्ज पूर्वतयारी

कोणत्याही भरती प्रक्रियेमध्ये सहभाग घेण्याआधी अर्जदारास भरती प्रक्रियेमध्ये कोणकोणत्या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे, अर्ज करण्याचा कालावधी, पदानुसार शैक्षणिक व शारीरिक पात्रता काय आहे?, वयोमर्यादा काय आहे?,त्याच प्रमाणे सामाजिक आरक्षणानुसार उपलब्ध जागांची संख्या किती आहे? हे जाणून घेणे महत्वाचे आहे. CRPF तर्फे आयोजित ९१९५ पदांच्या भरतीसंबंधी माहिती घेण्यासाठी अर्जदाराने सर्वप्रथम ह्या लिंक चा वापर करून जाहिरात डाऊनलोड करा व  काळजीपूर्वक वाचन करा.

  • अधिकृत जाहिरात बघितल्यानंतर पृष्ठ क्रमांक १ वर अर्ज सुरु होण्याची तारीख २० एप्रिल २०२६ व अर्ज करण्याची अंतिम तारीख १९ मे २०२६ आहे हे समजते.
  • पृष्ठ क्रमांक २ व ३ वर Constable (Technical & Tradesmen) व Pioneer Wing ह्या २ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे असे समजते.
  • पृष्ठ क्रमांक ४ वर पदानुसार वयोमर्यादा व सामाजिक आरक्षणानुसार वयात दिली जाणारी सूट बद्दल माहिती दिलेली आहे.
  • पृष्ठ क्रमांक ८ वर पदानुसार शैक्षणिक पात्रता काय असावी याची माहिती समजते.
  • पृष्ठ क्रमांक ११ वर शारीरिक पात्रता परीक्षेत समाविष्ठ घटकांबद्दल माहिती समजते
  • पृष्ठ क्रमांक १२, १३ व १४ वर पदानुसार शारीरिक पात्रता काय असावी याची माहिती समजते.
  • पृष्ठ क्रमांक १४ वर प्रश्पात्रीकेचे स्वरूप बद्दल माहिती समजते.
  • पृष्ठ क्रमांक ३० ते ३६ वर राज्यानुसार प्रत्येक पदासाठी कोणत्या सामाजिक आरक्षणास किती जागा आहे ते विस्तृत मध्ये नमूद केलेलं दिसते
  • पृष्ठ क्रमांक ३७ व ३८ वर अर्ज करण्यासंबंधी मार्गदर्शक सुचना, फोटो सही व भरती प्रक्रिया शुल्क भरण्या संबंधी सविस्तर माहिती बघावयास मिळते
  • पृष्ठ क्रमांक ३९ ते ४७ वर विविध प्रकारचे परिशिष्ट बघावयास मिळतात ज्यात सध्या संरक्षक दलात कार्यरत असलेले अर्जदार, माझी सैनिक, जातीचे दाखले, शारीरिक मोजमापात सूट साठी पात्र असलेले उमेदवार ई.

जाहिरातीचे वाचन केल्यानंतर अर्जदारास कोणत्या पदासाठी अर्ज करायचा आहे ते निच्छित करावे.

 

समाविष्ठ पदे व पदसंख्या 

  • सदर जाहिराती मध्ये मुख्यत्वे २ पदांसाठी भरती चे आयोजन करण्यात आलेले असून त्याबद्दल माहिती पुढीलप्रमाणे
    • शिपाई (तांत्रिक आणि कारागीर) :  या मध्ये ब्रास बॅण्ड, न्हावी, बिगुलवाला, चांभार, स्वयंपाकी, सुतार, वाहनचालक, माळी, वाहन यांत्रिक, शिंपी या सारख्या एकूण १५ पदांचा समावेश आहे.

    • पोलीस शिपाई (पायोनिअर) : या मध्ये गवंडी व वीजतंत्री या दोन पदांचा समावेश आहे
  • अधिकत भरती जाहिरात च्या PDF मध्ये पृष्ठ क्रमांक ३० ते ३६ वर राज्यानुसार, पदानुसार व सामाजिक आरक्षणानुसार जहाचे विस्तृत विवरण बघावयास मिळेल, अर्जदाराने आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार व आपल्या सामाजिक आरक्षणानुसार उपलब्ध रिक्त पदांची संख्या जाणून घेऊन मगच अर्ज भरण्यास सुरवात करावी.

 

वेतनश्रेणी

  • केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेत उत्तीर्ण होऊन यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना ३ ऱ्या वेतन स्तर नुसार 21,700/- ते 69,100/- पगार दिला जातो

 

वयोमर्यादा 

  • सदर भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी अर्जदाराचे वय हे ०१ जानेवारी २०२६ रोजी २१ ते २७ या दरम्यान असले पाहिजे, म्हणजे अर्जदाराचा जन्म ०२ जानेवारी १९९९ ते ०१ जानेवारी २००५ या दरम्यान झालेला असावा आपण आपले वय मोजण्यासाठी आमच्या
    ×

    Age Calculator

    या तुल चा वापर करा आपली जन्मतारीख नमूद करा व जाहिरात तारीख मध्ये ०२/०२/२०२६ अशी नमूद करा ह्या जाहिरातीस आपले वय योग्य आहे कि नाही ते कळेल

 

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

सर्वप्रथम अर्जदाराने आपल्या संगणकावर CRPF च्या भरती प्रक्रियेचे अधिकृत संकेतस्थळ उघडावे https://recruitment.crpf.gov.in/ स्क्रीन च्या उजव्या बाजूस Register व Candidate Login असे २ पर्याय दिसतील जर अर्जदाराने या पूर्वी नोंदणी केलेली असेल तर Candidate Login या पर्यायावर क्लिक करावे जर यापूर्वी नोंदणी केलेली नसेल तर Register ह्या पर्यायावर क्लिक करावे.

  • Register ह्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्या स्क्रीन वर नोंदणी साठी अर्ज दिसेल यात अर्जदाराने आपल्या माध्यमिक शाळांत परीक्षेच्या (SSC) च्या प्रमाणपत्रानुसार आपले नाव नमूद करावे. तसेच इमेल आयडी व मोबाईल क्रमांक नमूद करावा व Generate OTP या पर्यायावर क्लिक करावे.

  • आपल्या इमेल व मोबाईल क्रमांकावर प्राप्त ६ अंकी OTP क्रमांक नमूद करून VERIFY OTP या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर आपल्या समोर सर्वसाधारण सूचनांची PDF दिसेल यात ऑनलाईन अर्जासंबंधी काही सूचना दिलेल्या आहे त्या आपण काळजीपूर्वक वाचून घ्याव्या. व Close या पर्यायावर क्लिक करावे.

  • त्यानंतर अर्जदारास Application History चा तक्ता दिसेल त्याच्या उजव्या बाजूस Apply New Advertisement या पर्यायावर क्लिक करावे, आपणास जाहिरात क्रमांक 02/2026 ची माहिती दिसेल, या ठिकाणी Apply Here या पर्यायावर क्लिक करावे.

  • पुढील पेजवर आपणास वैयक्तिक माहिती या सदराखाली नोंदणी करतांना पुरवलेल्या माहितीनुसार अर्जदाराचे नाव, मोबाईल क्रमांक, व इमेल आयडी दिसेल
  • त्या खाली Identity Details या पर्यायामध्ये अर्जदारास परीक्षेचे वेळेस जे ओळखपत्र सादर करणार आहे त्याबद्दल माहिती द्यायची आहे. उदा. आधार कार्ड चा क्रमांक व आधार कार्ड वरील नाव, लक्षात घ्या आपण ज्या ओळख पत्राची या ठिकाणी माहिती सादर करणार आहोत त्यावरील नाव हे आपल्या अर्जावरील नावाशी तंतोतंत जुळणारे पाहिजे. जर आपण विवाहित महिला असाल व आपल्या नावात बदल असेल तर परीक्षेस जातांना नावात बदलाचे राजपत्र किंवा विवाह प्रमाणपत्र सोबत घेवून जावे.

  • त्यानंतर Additional Information या सदराखाली अर्जदाराने आपली जन्मतारीख अचूकपणे नमूद करावी त्यानंतर अर्जदाराचे वय ये आपोआप दिसेल, त्यानंतर अर्जदाराने आपले राष्ट्रीयत्व नमूद करावे. त्याचप्रमाणे वडिलांचे नाव, आईचे नाव, अर्जदाराचे लिंग, शरीरावरील ओळखीचे चिन्ह व वैवाहिक स्थिती नमूद करावी, त्यानंतर Domicile Details या सदराखाली अर्जदाराकडे अदिवास प्रमाणपत्र उपलब्ध असेल तर Yes व नसेल तर No पर्याय निवडावा, जर अर्जदाराकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध असेल तर अधिवास प्रमाणपत्र निर्गमित करणारे राज्य, जिल्हा निवडून प्रमाणपत्राचा क्रमांक नमूद करावा.

  • त्यानंतर अर्जदाराने Category Reservation मध्ये आपला धर्म निवडावा व आपली कॅटेगरी निवडावी, त्यानंतर आपल्या जात प्रमाणपत्राचा क्रमांक, जात प्रमाणपत्र निर्गमित करणाऱ्या राज्याचे नाव, जिल्ह्याचे नाव, अधिकाऱ्याचे नाव व प्रमाणपत्राची तारीख नमूद करावी.
  • त्यानंतर Other Reservation Details मध्ये Mode of Recruitment या पर्यायासाठी अर्जदार जय माझी सैनिक असेल तर माझी सैनिक हा पर्याय निवडावा किंवा अर्जदार जर सर्वसामान्य नागरिक असेल तर Direct entry(DE) हा पर्याय निवडावा, त्यानंतर अर्जदारावर काही गुन्हा दाखल असेल,१९८४ साली झालेल्या दंगली चा दंगल पिडीत असेल किंवा अर्जदार गुणवत्ता धारक खेळाडू असेल तर त्यासंबंधी माहिती नमूद करावी

  • त्यानंतर Post Selection या पर्यायाखाली अर्जदाराने ह्या पदासाठी अर्ज सादर करायचा आहे ते पद निवडावे. लक्षात घ्या आपण ज्या पदासाठी अर्ज करता आहात त्या पदाबद्दल सर्व माहिती सर्वप्रथम ह्या लिंक वर क्लिक करून जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. आपल्या कॅटेगरी नुसार पदांची संख्या व शैक्षणिक व शारीरिक पात्रतेच्या निकषांमध्ये आपण बसतो कि नाही याबद्दल खात्री करून घ्यावी. योग्य ते पद निवडल्यानंतर SAVE & NEXT या पर्यायावर क्लिक करावे.

 

  • त्यानंतर Permanent Address या ठिकाणी अर्जदाराने आपला संपूर्ण पत्ता अचूकपणे नमूद करावा आपला मूळ पत्ता व पत्रव्यवहाराचा पत्ता एकाच असल्यास Same as Permanent Address या पर्यायासमोर टिक करावे अन्यथा आपला पत्रव्यवहाराचा पत्ता नमूद करून SAVE & NEXT या पर्यायावर क्लिक करावे.

  • त्यानंतर Qualifications Details या पर्यायाखाली आपण अर्ज करत असलेल्या पदास अनुसरून सर्व शैक्षणिक पात्रता  नमूद करणे आवश्यक आहे, सर्वप्रथम अर्जदाराने योग्यता निवडावी व त्या योग्यतेच्या प्रमाणपत्राप्रमाणे, प्रमाण पत्र संख्या उत्तीर्ण वर्ष बोर्डाचे किंवा विद्यापीठाचे नाव, व पात्रता ज्या रायातून धारण केली आहे त्या राज्याचे नाव नमूद करावे. एकापेक्षा जास्त योग्यता नमूद करायच्या असतील तर  + ADD या पर्यायावर क्लिक करून आपण ते करू शकता. सर्व शैक्षणिक तपशील नमूद केल्यानंतर SAVE & NEXT या पर्यायावर क्लिक करावे.

  • त्यानंतर Apply या पर्यायाखाली Post Selection मध्ये अर्जदाराने ज्या पदासाठी अर्ज सादर करायचा आहे ते पद निवडावे. लक्षात घ्या आपण ज्या पदासाठी अर्ज करता आहात त्या पदाबद्दल सर्व माहिती सर्वप्रथम ह्या लिंक वर क्लिक करून जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. आपल्या कॅटेगरी नुसार पदांची संख्या व शैक्षणिक व शारीरिक पात्रतेच्या निकषांमध्ये आपण बसतो कि नाही याबद्दल खात्री करून घ्यावी. योग्य ते पद निवडल्यानंतर Save & Next या पर्यायावर क्लिक करावे. उदा. आपण या पूर्वी च्या स्टेप मध्ये Driver (Male) हा पर्याय निवडलेला होता फक्त तोच पर्याय या ठिकाणी दिसेल तो पर्याय निवडा व त्यानंतर शैक्षणिक पात्रतेचा रकान्यात Yes करून त्या ठिकाणी पात्रतेनुसार शैक्षणिक तपशील भरावा जसे, उत्तीर्ण वर्ष, निकालाची तारीख, प्राप्त गुण, पैकी गुण, टक्केवारी. इत्यादी, त्यानंतर इतर अहर्ता च्या रकान्यात पदानुसार आवश्यक ती माहिती भरावी वाहन चालक च्या पदाकरिता अवजड वाहन चालक परवाना क्रमांक, परवाना निर्गमन कार्यालय, जिल्हा, राज्य, वाहन परवाना निर्गमन तारीख, वैधता तारीख ई.

 

  • त्यानंतर Certificates and Documents या पर्यायाखाली अर्जदाराने पासपोर्ट आकाराचा फोटो स्वाक्षरी व १० वी चे गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र स्कॅन करून अपलोड करावे, पासपोर्ट आकाराचा फोटो स्वाक्षरी हि JPEG फाईल प्रकारात असावी व साईज 50KB ते 100KB च्या आत असावी. त्याच प्रकारे १० वी चे गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र हे JPG किंवा PDF स्वरूपात असावे व साईज 100KB ते 500KB च्या आत असावी. वरीलप्रमाणे सर्व कागदपत्रे अपलोड करून झाल्यानंतर Save & Next या पर्यायावर क्लिक करावे.

 

  • त्यानंतर Review Application या पर्यायाखाली अर्जदाराने अर्जात नमूद केलेली सर्व माहिती बघावयास मिळेल, अर्जदाराने सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी काही माहिती चुकली असेल किंवा बदल करण्याची आवश्यकता असेल तर योग्य तो बदल करावा. त्यानंतर Date/Place या पर्यायाखाली आपण ज्या ठिकाणाहून अर्ज भरत आहात त्या गावाचे/ शहराचे नाव नमूद करावे. Centre Preferences या पर्यायातून उपलब्ध ३५ विक्ल्पातून आपणास योग्य वाटेल ते परीक्षा केंद्र निवडावे व Pay Now च्या पर्यायावर क्लिक करावे, त्यानंतर अर्जासाठी लागणारे शुल्काची भरणा करा व अर्जाची छापील प्रत आपल्या जवळ जपून ठेवा.

 

  • अश्या प्रकारे आपण CRPF तर्फे विविध पदांच्या 9195 जागांसाठीचा अर्ज दिनांक 19 मे 2026 पर्यंत सादर करू शकता.
  • केंद्रीय राखीव पोलीस दलातर्फे उमेदवारांना आर करण्या संदर्भात महत्वाच्या सुचना https://recruitment.crpf.gov.in/instructions ह्या लिंक वर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे.

 

अर्जदारांसाठी हेल्पलाईन क्रमांक 

  • जर आपल्यास ऑनलाईन अर्ज सादर करतांना काही अडचण येत असेल तर आपण 011-26160255 ह्या क्रमांकावर सकाळी १० ते सायंकाळी ६ या दरम्यान (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून) संपर्क साधू शकता

 

महत्वाच्या लिंक 

केंद्रीय राखीव पोलीस दल चे अधिकृत संकेतस्थळास ह्या लिंक चा वापर करून भेट देऊ शकता
अधिकृत जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी ह्या लिंक चा वापर करावा
ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी ह्या लिंक चा वापर करावा

 

निवड प्रक्रिया 

  • सर्वप्रथम अर्जदाराची  शारीरिक क्षमता चाचणी (Physical Efficiency Test -PET) घेण्यात येईल ज्यात अर्जदारास अधिकृत जाहिरातीतील मुद्दा क्रमांक १५ मध्ये नमूद केल्या प्रमाणे धावण्याची स्पर्धा पूर्ण करावी लागेल
  • त्यानंतर अर्जदारास शारीरिक मानक चाचणी (Physical Standard Test – PST) मध्ये आपली उंची, छाती व वजन हे जाहिरातीत नमून केलेल्या मर्यादेनुसार योग्य आहे हे दाखवावे लागेल
  • त्यानंतर अर्जदारास कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (Computer Based Test – CBT) मध्ये २ तासात १०० गुणांची परीक्षा द्यावी लागेल ज्यात नकारात्मक गुणदान पद्धत लागू असेल प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण वजा केले जातील.
  • त्यांनतर अर्जदारास कौशल्य चाचणी (Trade Test) ला सामोरे जावे लागेल ज्यात आपण अर्ज केलेल्या पदानुसार विविध कौशल्य  सदर करावे लागतील
  • त्यानंतर अर्जदारास कागदपत्रे पडताळणी (Document Verification) च्या प्रक्रियेस सामोरे जावे लागेल ज्यात अर्जदाराने अर्जात दाखल केल्यानुसार व पदाच्या पात्रतेनुसार अर्जदाराचे कागदपत्रे योग्य आहे कि नाही हे तपासून बघितले जाते.
  • वरील सर्व चाचण्या मधून उत्तीर्ण झाल्यानंतर वैद्यकीय चाचणी केली जाते. या भरती प्रक्रियेत कोणत्याही प्रकारच्या अपंगत्वास मान्यता नाही आहे त्यामुळे तात्पुरते किंवा नियमित अपंग असणाऱ्या अर्जदारास बाद केले जाईल. त्याच प्रमाणे अर्जदारास कोणत्याही प्रकारचा दृष्टीदोष चालणार नाही.
  • या सर्व चाचण्यांमधून योग्य उमेदवारांची अंतिम निवड करण्यात येईल.

ऑनलाईन अर्ज प्रक्रीयेदरम्यान आवश्यक कागदपत्रे व माहिती

 

  • अर्जदाराचा मोबाईल क्रमांक
  • अर्जदाराचा इमेल आयडी
  • अर्जदाराचे ओळख पत्र (आधार कार्ड, पासपोर्ट, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान कार्ड, सरकारी कर्मचारी असल्यास ओळखपत्र)
  • अधिवास प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • शैक्षणिक गुणपत्रक व प्रमाणपत्र
  • अर्जदाराचा स्कॅन केलेला पासपोर्ट आकाराचा फोटो
  • अर्जदाराची स्कॅन केलेली स्वाक्षरी
  • अर्जदाराचे स्कॅन केलेले शैक्षणिक कागदपत्रे

नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

  • पदासाठी आवश्यक असणारे शिक्षण पूर्ण नाही आहे किंवा त्या शिक्षणक्रमास प्रविष्ठ आहे तर मी अर्ज सादर करू शकतो का?
    • नाही, अधिकृत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे अर्जदाराने आवश्यक ती पात्रता जाहिरात प्रकटन च्या तारखेच्या आधी धारण केलेली असावी.
  • अर्ज सादर करतांना छायाचित्र अवक्षरी किंवा शैक्षणिक कागदपत्रे अपलोड होण्यास अडचण येत आहे.
    • अर्जदाराने छायाचित्र, स्वाक्षरी, व शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करतांना, पासपोर्ट आकाराचा फोटो व स्वाक्षरी हि JPEG फाईल प्रकारात आहे व साईज 50KB ते 100KB च्या आत आहे , त्याच प्रकारे १० वी चे गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र हे JPG किंवा PDF स्वरूपात आहे व साईज 100KB ते 500KB च्या आत आहे याची खात्री करून घ्यावी. JPEG फाईल हव्या त्या साईज मध्ये मिळविण्यासाठी https://imageresizer.com/resize-jpg ह्या संकेतस्थळावरील सुविधेचा वापर करावा व PDF फाईल ची साईज हव्या त्या साईज मध्ये मिळविण्यासाठी https://bigpdf.11zon.com/en/compress-pdf/ ह्या संकेतस्थळाचा वापर करावा.
  • महिला अर्जदाराच्या ओळख पत्रावरील नाव व शैक्षणिक कागदपत्रांवरील नावात बदल आहे, तर अर्ज करतांना कोणत्या नावाने अर्ज करावा.
    • अर्ज करतांना अर्जदाराने आपल्या 10वी च्या गुणपत्रिकेच्या नावाप्रमाणे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. नावात बदल असेल तर परीक्षेस जातांना नावात बदलाचे राजपत्र, किंवा लग्नामुळे नावात बदल झालेला असेल तर विवाह नोंदणी प्रमाणपत्र सोबत घेऊन जाऊ शकता जेणेकरून परीक्षा देण्यास कोणतीही अडचण येणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Index