महास्वयम रोजगार पोर्टल वर नोकरी साधक म्हणून नोंदणी कशी करावी ? | How to Register as Jobseeker on Mahaswayam Rojgar Portal

महास्वयम रोजगार पोर्टल म्हणजे काय?

महाराष्ट्र शासनातर्फे नोकरी प्रदान करणारे (Employers) उद्योजक / कंपन्या / संस्था व नोकरीच्या शोधात असणारे सुशिक्षित बेरोजगार (Jobseeker) ची ऑनलाईन नोंदणी करून, नोकरी देणे किंवा नोकरी मिळविण्याचे काम सोपे करण्यसाठी महास्वयम रोजगार पोर्टल ची निर्मिती करण्यात आलेली आहे.

या पोर्टल चा वापर करून उद्योजक, कंपन्या व संस्था एक नियोक्ता (Employer) म्हणून महास्वयम रोजगार पोर्टल वर नोंदणी करू शकतात व आपल्याला हवे असलेल्या मनुष्यबळाचा तपशील पोर्टल वर प्रसिद्ध करतात. नोकरीच्या शोधात असणारे सुशिक्षित बेरोजगार एक नोकरी साधक म्हणून स्वताची नोंदणी महास्वयम रोजगार पोर्टल वर करू शकतात व आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध नोकर भरती संधींसाठी अर्ज करू शकता.

 

महास्वयम रोजगार पोर्टल वर नोकरी साधक म्हणून नोंदणी चे फायदे

पोर्टल वर विविध सरकारी, निमसरकारी, अनुदानित संस्था व खाजगी क्षेत्रातील उपलब्ध नोकरीची माहिती उपलब्ध करून दिलेली असते. त्याचप्रकारे  पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावे द्वारे उपलब्ध होणाऱ्या स्थानिक नोकरी च्या संधी, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ तर्फे व्यवसाय / उद्योग करण्यासाठी उपलब्ध होणारे वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना व गट कर्ज व्याज परतावा योजना तसेच महाराष्ट्र शासनातर्फे सुशिक्षित बेरोजगारांसाठी आयोजित केले जाणारे कौशल्य विकास कार्यक्रमांसाठी महास्वयम रोजगार पोर्टल वर नोकरी साधक म्हणून नोंदणी करून मिळवलेले नोकरी साधक कार्ड (Job Seeker Card) किंवा एम्प्लॉयमेंट कार्ड (Employment Card) असणे गरजेचे आहे.

 

नोकरी साधक (Job Seeker) म्हणून ऑनलाईन नोंदणी कशी करावी ?

या सेक्शन मध्ये आपण नोकरी साधक (Job Seeker) म्हणून नोंदणी कशी करावी याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.

  • सर्वप्रथम आपल्या संगणकावर https://rojgar.mahaswayam.gov.in/ हे संकेतस्थळ उघडा. संकेतस्थळ उघडल्यानंतर स्क्रीन च्या उजव्या बाजूस “नोकरी साधक लॉगिन” असा पर्याय दिसेल त्याच खालोखाल नोंदणी असा पर्याय उपलब्ध आहे. जर यापूर्वी आपण नोंदणी केलेली असेल तर आपला आधार कार्ड क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक व पासवर्ड टाकून आपण लॉगइन करू शकता. आणि जर आपण नोंदणीकृत नसाल तर “नोंदणी” या पर्यायावर क्लिक करा.

 

  • पुढील पेज वर आपणास नवीन नोकरी साधक च्या नावाने एक नोंदणी अर्ज दिसेल ज्या पुढीलप्रमाणे माहिती नमून करावी
    • अर्जदाराने आपल्या आधार कार्ड नुसार पहिले नाव, मधले नाव व आडनाव ची माहिती नमूद करावी. जर अर्जदाराच्या आधार कार्ड वर मधले नाव किंवा आडनाव उपलब्ध असेल तर I have Last Name in Aadhaar Card व I have Middle Name in Aadhaar Card समोरील चेकबॉक्स वर टिक करून माहिती नमूद करावी, जर मधले नाव किंवा आडनाव उपलब्ध नसेल तर सदर माहिती नमूद करणे गरजेचे नाही.
    • जन्म तारीख : अर्जदाराने आपल्या आधार कार्ड प्रमाणे आपली जन्मतारीख नमूद करावी.
    • लिंग : अर्जदाराने आपले लिंग नमूद करावे.
    • आधार आयडी : अर्जदाराने आपले आधार आयडी म्हणजे आधार क्रमांक नमूद करावा.
    • भ्रमणध्वनी क्रमांक : अर्जदाराने आपला मोबाईल क्रमांक नमूद करावा.
    • Captcha कॅप्चा: अर्जदाराने नोंदणी प्रक्रियेच्या पुढील टप्प्यात जाण्यासाठी स्क्रीन वर दिसत असलेला कॅप्चा (CAPTCHA) कोड नमूद करावा व Next वर क्लिक करावे.
    • त्यानंतर आपल्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त OTP नमूद करावा व Next वर क्लिक करावे.

 

  • वैयक्तिक माहिती : यामध्ये अर्जदाराने आपला देश, राज्य, जिल्हा तालुका, शहर / गाव, भाषा, पत्ता, पिन कोड, राष्ट्रीयत्व, धर्म, वैवाहिक स्थिती, जातीचा प्रवर्ग, जात जमातीचे नाव, व स्वतः व्यवसाय किंवा स्वयंरोजगार करण्यास इच्छुक आहे का या पर्यायांसमोर योग्य ती माहिती भरावी, अर्जदार विवाहित असल्यास पतीचे किंवा पत्नीचे नाव नमूद करावे.

 

  • त्यानंर शैक्षणिक पत्रातेमध्ये अर्जदाराने धारण केलेली सर्वोच्च अहर्ता नमूद करावी.
    • शैक्षणिक अर्हता गट : याठिकाणी अर्जदाराने त्याने धारण केलेली सर्वोच्च अहर्ता निवडावी.
    • स्ट्रीम (प्रवाह) : या ठिकाणी अर्जदाराने अभ्यासक्रम शाखा निवडावी (उदा. Arts, Commerce, Science) पात्रता स्थीति मध्ये शिक्षण पूर्ण आहे कि प्रविष्ठ आहे ते नमूद करावे जर शिक्षण पूर्ण असेल तर उत्तीर्ण वर्ष व टक्केवारी नमूद करावी.
    • त्यानंतर अर्जदाराने आपली पदवी निवडावी, शिक्षणाचे मध्यम, ज्या महाविद्यालयातून किंवा शाळेतून शिक्षण पूर्ण केले आहे त्याचे नाव नमूद करावे व बोर्ड किंवा विद्यापीठ निवडावे.

 

  • संपर्काची माहिती : या ठिकाणी अर्जदाराने आपला इमेल आयडी नमूद करावा.
  • व आपल्यास लक्षात राहील असा पासवर्ड नमूद करून खाते तयार करा या पर्यायावर क्लिक करावे.

 

  • नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जदारास “नोकरी साधक लॉगिन” हा पर्याय दिसेल या ठिकाणी युजरनेम मध्ये आधार कार्ड क्रमांक व नोंदणी करतांना वापरलेला पासवर्ड नमूद करून लॉगीन या पर्यायावर क्लिक करावे
  • लॉगीन केल्यानंतर अर्जदारास माझे प्रोफाइल असे पेज दिसेल स्क्रीन च्या उजव्या बाजूस संपादित करा या पर्यायावर क्लिक करावे

 

  • संपादित करा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम Upload Profile Image या पर्यायावर क्लिक करून अर्जदाराने आपला स्कॅन केलेल्या पासपोर्ट आकाराचा फोटो उपलोड करावा व Upload Resume या पर्यायावर क्लिक करून आपल्या Resume ची PDF अपलोड करावी
  • त्यानंतर स्क्रीन वर आपणास वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती व कामाचा अनुभव इतर तपशील असे सेक्शन दिसतील
  • सर्वप्रथम वैयक्तिक माहिती या सेक्शन मधील माहिती कश्या पद्धतीने भरायची याबद्दल माहिती घेवूया
    • या ठिकाणी पहिले नाव, आडनाव, आडनाव, आधार कार्ड क्रमांक, आईचे नाव, पत्ता पिनकोड, जन्म तारीख, जातीचा प्रवर्ग पोट जात हि सर्व माहिती या आधीच्या स्टेप मध्ये आपण नमूद केलेली आहे त्यामुळे ती जशीच्या तशी या ठिकाणी बघावयास मिळते.
    • अर्जदाराकडे पासपोर्ट असेल तर पारपत्र क्रमांक च्या समोरील रकान्यात पासपोर्ट क्रमांक नमूद करावा
    • पॅन क्रमांक समोरील रकान्यात आपला पॅन क्रमांक नमूद करावा व सुधारणा या पर्यायावर क्लिक करून आपली वैयक्तिक माहिती सेव करून घ्यावी
  • त्यानंतर शैक्षणिक माहितीच्या सेक्शन वर क्लिक करून आपली शैक्षणिक माहिती बद्दल माहिती नमूद करावी
    • सर्वप्रथम शैक्षणिक अहर्ता गट समोरील रकान्यात आपल्या आवडीची अहर्ता निवडावी सर्वसाधारणपणे आधी SSC त्यानंतर HSC, डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तरपदवी अश्या चढत्या क्रमाने आपली शैक्षणिक अहर्ता नमूद करावी उत्तीर्ण वर्ष, प्राप्त टक्केवारी, बोर्ड किंवा विद्यापीठाचे नाव, संस्था किंवा महाविद्यालयाचे नाव अशी माहिती नमूद करून जोडा या पर्यायावर क्लिक करावे,
    • आपल्या अहर्ता प्रमाणे सर्व माहिती नमूद करून झाल्यानंतर Upload Educational Certificate समोरील फाईल अपलोड चा पर्यायाचा वापर करून आपले सगळे शैक्षणिक गुणपत्रक व प्रमाणपत्रे एका PDF फाईल मध्ये स्कॅन करून ती फाईल अपलोड करावी
    • त्याखाली Skill/Vocational Course Details,etc. या पर्यायासमोर फाईल अपलोड चा पर्यायाचा वापर करून आपले टायपिंग, MSCIT, संगणक साक्षरता व इतर कोर्स चे कागदपत्रे अपलोड एकाच PDF फाईल मध्ये स्कॅन करून अपलोड करावे.

 

  • Skill/Vocational Course Details च्या रकान्यात अनेक कोर्स उपलब्ध आहेत त्यात अर्जदाराकडून धारण केलेल्या पात्रतेनुसार एक एक कोर्स संबंधी माहिती नमूद करावी.
  • पात्रता चाचणी तपशील च्या रकान्यात अर्जदाराने धारण केलेल्या चाचणी परीक्षा म्हणजे GATE, NET, TET सारख्या परीक्षांची माहिती जतन करावी.
  • सर्व माहिती भरून झाल्यानंतर सुधारणा या पर्यायावर क्लिक करून आपली शैक्षणिक माहिती सेव करून घ्यावी

 

  • त्यानंतर कामाचा अनुभव या सेक्शन मध्ये अर्जदारास जर कामाचा अनुभव असेल तर त्या संबंधी जतन करावी
    • यामध्ये अनुभव असलेल्या पदाचे नाव ज्या संस्थेत कामाचा अनुभव आहे त्या संस्थेचे नाव, काम केल्याचा कालावधी, वेतन, कामाचे स्वरूप आधी माहिती नमूद करून आपला अनुभव जतन करावा

 

  • त्यानंतर इतर तपशील मध्ये खालीलप्रमाणे विविध स्वरुपाची माहिती नमूद करायची आहे
    • Preferred Job Location: अर्जदारास कोणत्या जिल्ह्यात काम करण्याची इच्छा आहे तो जिल्हा निवडावा.
    • ज्ञात भाषा : च्या रकान्यात अर्जदारास मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा कितपत अवगत आहे याची माहिती द्यावी प्रत्येक भाषेसामोरील वाचणे, लिहणे व बोलणे या चेक बॉक्स समोर योग्य टिक करावी व Proficiency मध्ये Fluent म्हजे उत्कृष्ठ, Moderate म्हणजे बऱ्यापैकी व poor म्हणे जेमतेम असे अर्जदाराने योग्य तो पर्याय निवडावा.
    • Are You Textile Mill Worker or Dependant? : या पर्यायासमोर जर अर्जदार किंवा अर्जदाराचे पालक मिल कामगार असतील तर Yes हा पर्याय निवडावा.
    • Do You Belong To Below Poverty Line?: अर्जदार दारिद्र रेषेखालील असेल तर Yes हा पर्याय निवडावा
    • Project Affected व Earthquake Affected: अर्जदाराच्या कुटुंबाची जर एखाद्या सरकारी प्रकल्पामुळे म्हणजे धरणाचे, रस्त्याचे, विमानतळाचे, रस्त्याचे, उद्योगाचा प्रकल्पामध्ये जमीन, घर किंवा उपजीविकेचे साधन सरकार द्वारे हस्तगत केली आहे तर Project Affected समोर Yes हा पर्याय निवडावा व जर भूकंपामुळे अर्जदाराच्या कुटुंबाचे आर्थिक, मालमत्तेचे किंवा मोठे नुकसान झाले असेल तर Earthquake Affected समोर Yes हा पर्याय निवडावा.

 

  • Are You Domiciled in Maharashtra? अर्जदार जर महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असेल तर या पर्यायासमोर Yes हा पर्याय निवडावा व पुराव्यासाठी आपले Domicile Certificate (अधिवास प्रमाणपत्र) किंवा जन्माचा दाखला किंवा माध्यमिक शालांत परीक्षेचे प्रमाणपत्र अपलोड करावे.
  • Physical Attributes: या पर्यायासमोर जर अर्जदार विकलांग असेल तर Yes हा पर्याय निवडून अपंगत्वाचे स्वरूप, अपंगत्वाचा प्रकार, अपंगत्वाची टक्केवारी अशी माहिती काळजीपूर्वक नमूद करावी.
  • Background Category: या पर्यायासमोर अर्जदार जर माझी सैनिक किंवा गुणवत्ताधारक खेळाडू असेल तर Yes हा पर्याय निवडून खेळाचे नाव, प्राप्त स्थान व स्पर्धेची पातळी नमूद करावी.

 

 

  • त्यानंतर अर्जदाराने Bank Detail समोरील रकान्यात आपल्या बँक खात्याची माहिती जसे बँकेचे नाव, आय एफ एस सी कोड, खाते क्रमांक, बँक शाखेचे नाव नमूद करावे व आपल्या बँक खात्याचे पासबुक किंवा रद्द केलेल्या चेक ची स्कॅन प्रत अपलोड करावी
  • वरीलप्रमाणे सर्व माहिती नमूद केल्यानंतर Update या पर्यायावर क्लिक करावे

 

  • अपडेट पर्यायावर क्लिक केल्यानंतर अर्जदारास स्क्रीन वर My Profile चे पेज दिसेल स्क्रीन च्या उजव्या बाजूस Generate Receipt या पर्यायावर क्लिक करून अर्जदाराने आपली Job Seeker ची नोंदणी स्लीप डाऊनलोड करून घ्यावी, लक्षात घ्या दर एक वर्षाने आपणास नोंदणी चे नुतनीकरण करणे गरजेचे आहे.
  • अश्या प्रकारे Job Seeker ची नोंदणी पूर्ण होते

 


मदत केंद्र 

ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेत काही अडचण आल्यास अर्जदार 18001208040 या क्रमांकावर संपर्क साधून आपली अडचण सोडवून घेऊ शकता


 

नेहमी विचारले जाणारे प्रश्न  (FAQ)

  • नोकरी साधक (Jobseeker) म्हणून नोंदणी करण्यासाठी वयोमर्यादा काय आहे?
    • नाही नोकरी साधक म्हणून नोंदणी करण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही आहे.
  • नोकरी साधक (Jobseeker) म्हणून नोंदणी करण्यसाठी नोंदणी शुल्क किती आहे?
    • नोकरी साधक म्हणून नोंदणी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही, हि सुविधा पूर्णपणे मोफत आहे, यासाठी कोणतेही चलन भरण्याची आवश्यकता नाही.
  • महास्वयम रोजगार पोर्टल वर नोंदणी करणे कोणासाठी गरजेचे आहे?
    • सरकारी किंवा खाजगी क्षेत्रात नोकरीच्या शोधात असेलेल्या प्रत्येक होतकरू शिक्षित तरुण तरुणीने हि नोदणी करावी जेणेकरून आपल्या जवळपास नोकरी मिळविणे सोपे जाईल.
  • महास्वयम रोजगार पोर्टल वर नोंदणी केल्यानंतर कागदपत्रे जमा करणे गरजेचे आहे का?
    • नाही नोंदणी केल्यानंतर कागदपत्रे जमा जमा करणे गरजेचे नाही, परंतु रोजगार पोर्टल द्वारे अयोजीय रोजगार मेळावे व इतर नोकरी संधी च्या कार्यक्रमांना उपस्थित असताना अर्जदाराने मुल कागदपत्रे जवळ बाळगणे गरजेचे आहे.
  • नोकरी साधक (Jobseeker) म्हणून नोंदणी केली आहे परंतु वापरकर्ता नाव (Username) विसरलो आहे?
    • नोंदणी केल्यानंतर अर्जदाराचा आधार कार्ड क्रमांक व Job Seeker नोंदणी स्लीप वरील नोंदणी क्रमांक यापैकी काहिती वापरकर्ता नाव (Username) म्हणून वापरता येते
  • नोकरी साधक (Jobseeker) म्हणून नोंदणी केली आहे परंतु पासवर्ड (Password) विसरलो आहे?
    • पासवर्ड विसरल्यास लॉगीन पर्यायाखालील Forget Password या पर्यायाचा वापर करून आपला आधार कार्ड क्रमांक नमूद करावा आपणास आपल्या मोबाईल वर पासवर्ड प्राप्त होईल.
  • नोकरी साधक (Jobseeker) नोंदणी ची वैधता (Validity) किती दिवस राहील?
    • नोंदणी केलेल्या दिनांकापासून १ वर्षापर्यंत नोंदणी ची वैधता असेल.
  • नोकरी साधक (Jobseeker) नोंदणी केल्यानंतर नोंदणी प्रमाणपत्र कसे मिळवायचे?
    • अर्जदार आपल्या खात्यात लॉगीन करून Generate Receipt या पर्यायावर क्लिक करून नोंदणी प्रमाणपत्र डाऊनलोड करू शकता.
  • नोकरी साधक (Jobseeker) प्रोफाईल मध्ये पूर्वी भरलेल्या माहितीमध्ये बदल करता येतो का?
    • हो अर्जदार आपल्या खात्यात लॉगीन करून कितीही वेळा माहितीमध्ये बदल करू शकतात.
  • पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावे म्हणजे काय ?
    • रोजगार विभागातर्फे खाजगी आस्थापनांमध्ये रिक्त पदांबद्दल तपशील मागवून त्या रिक्त जागा भरण्यासाठी सर्व आस्थापनांना व उमेदवारांना एकाच छताखाली बोलवून मुलाखतीचे आयोजन करते या प्रक्रियेस पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावे असे संबोधले जाते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Index