Home Question Paper Set MPSC Question Paper Set MPSC प्रश्नपत्रिका संच 34

MPSC प्रश्नपत्रिका संच 34

1. झारखंड विधानसभेची सभासद संख्या किती?

 1.  75
 2.  87
 3.  80
 4.  81

उत्तर : 81


2. महाराष्ट्रात सागरी मच्छीमारीसाठी योग्य असणारे क्षेत्र —– लाख चौ.कि.मी. आहे.

 1.  3.01
 2.  1.12
 3.  0.19
 4.  4.0

उत्तर : 1.12


3. भारताकडून चहा आयात करणारा प्रमुख देश कोणता?

 1.  ब्रिटन
 2.  अमेरिका
 3.  फ्रांस
 4.  जपान

उत्तर : ब्रिटन


4. सततच्या व वेगवान किंमतवाढीचा फायदा खालीलपैकी कोणास होईल?

 1.  धनको
 2.  नोकरदार
 3.  ऋणको
 4.  शेतकरी

उत्तर : ऋणको


5. गोपाळ हरी देशमुखांनी ‘लोकहितवादी’ या नावाने —– या साप्ताहिकातून लिखाण केले.

 1.  दर्पण
 2.  प्रभाकर
 3.  सुधारक
 4.  दिनमित्र

उत्तर : प्रभाकर


6. महाराष्ट्र सरकारने शेतकरी कर्जमाफी योजना कधी जाहीर केली?

 1.  वर्ष 2007
 2.  वर्ष 2008
 3.  वर्ष 2006
 4.  वर्ष 2009

उत्तर : वर्ष 2008


7. जर अमर एका तासाला 20 पाने लिहिता, तर त्यास 45 पाने लिहिण्यास किती वेळ लागेल?

 1.  1 तास 45 मि.
 2.  2 तास 30 मि.
 3.  2 तास 15 मि.
 4.  2 तास 35 मि.

उत्तर : 2 तास 15 मि.


8. मार्च महिन्याचे एकूण सेकंद किती?

 1.  2592000 सेकंद
 2.  2678400 सेकंद
 3.  3600000 सेकंद
 4.  6000000 सेकंद

उत्तर : 2678400 सेकंद


9. भारतातील —– अंशाचे रेखावृत्त हे प्रमाण रेखावृत्त आहे.

 1.  23°30′
 2.  68°45′
 3.  82°30′
 4.  97°45′

उत्तर : 82°30′


10. —– हे महाराष्ट्रातील जास्त पावसाचे ठिकाण आहे.

 1.  मुंबई
 2.  अंबोली
 3.  पंचगणी
 4.  कोल्हापूर

उत्तर : अंबोली


11. पहिल्या राष्ट्रीय नियोजन समितीचे अध्यक्ष कोण होते?

 1.  जवाहरलाल नेहरू
 2.  सुभाषचंद्र बोस
 3.  सरदार पटेल
 4.  महात्मा गांधी

उत्तर : जवाहरलाल नेहरू


12. बँकेमध्ये चालू खाते खालील घटक उघडतात.

 1.  व्यापारी
 2.  शेतकरी
 3.  पगारदार वर्ग
 4.  महिला

उत्तर : व्यापारी


13. खालीलपैकी कोणते लीप वर्ष आहे?

 1.  1991
 2.  2001
 3.  2010
 4.  2020

उत्तर : 2020


14. शेतकर्‍यांना गाई खरेदीसाठी कुठल्या प्रकारचे कर्ज दिले जाते?

 1.  अल्प मुदत
 2.  दीर्घ मुदत
 3.  मध्यम मुदत
 4.  वरील सर्व प्रकार

उत्तर : मध्यम मुदत


15. वर्षभराचा विचार करता महाराष्ट्रात —– या पिकाखालचे क्षेत्र सर्वाधिक आहे.

 1.  गहू
 2.  ज्वारी
 3.  भात
 4.  बाजरी

उत्तर : ज्वारी


16. महाराष्ट्रात —– चे बियाणे इतर कोणत्याही पिकापेक्षा मोठ्या प्रमाणात पुरविले जाते.

 1.  भुईमूग
 2.  सोयाबीन
 3.  मोहरी
 4.  एरंडी

उत्तर : सोयाबीन


17. महाराष्ट्रात वनाखालील क्षेत्र —– जिल्ह्यात सर्वाधिक आहे.

 1.  सातारा
 2.  रायगड
 3.  ठाणे
 4.  गडचिरोली

उत्तर : गडचिरोली


18. खालीलपैकी कोणता शब्द गटात बसत नाही?

पारा, सोने, लोखंड, गंधक

 1.  पारा
 2.  सोने
 3.  लोखंड
 4.  गंधक

उत्तर : गंधक


19. 13 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?

 1.  डॉ. विजय एल. केळकर
 2.  श्री.सी.रंगराजन
 3.  श्री.के.सी. पंत
 4.  श्री.वाय.बी. चव्हाण

उत्तर : डॉ. विजय एल. केळकर


20. द्रव इंधनाचे ज्वलन होताना —– ऊर्जेचे रूपांतर उष्णता उर्जेत होते.

 1.  विद्युत
 2.  ध्वनी
 3.  आण्विक
 4.  रासायनिक

उत्तर : रासायनिक


 

MPSC प्रश्पात्रिका संच ऑनलाईन सराव 

ऑनलाईन सोडवा

ऑनलाईन परीक्षेत भरघोस यश संपादन करण्यासाठी सराव हाच एक पर्याय आहे !!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!