MHT CET 2022 | महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा

Join Telegram Channel

सर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा !

Subscribe Whatsapp Updates

सर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट Whats App वर मिळवण्यासाठी जॉईन करा !

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांच्यामार्फत अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटी-२०२२ ऑनलाईन प्रवेश परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी अर्ज खालील नमूद वेळापत्रकाप्रमाणे सादर करावायचे आहेत.

संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि निश्चिती करणे गुरुवार, दिनांक १०/०२/२०२२ ते गुरुवार, ३१/०३/२०२२ (रात्री ११.५९ वा.)
विलंब शुल्क भरुन ऑनलाईज अर्ज नोंदणी आणि निश्चिती करणे (विलंब शुल्क रुपये ५००/- सर्व प्रवर्गाकरीता) शुक्रवार, दिनांक ०१/०४/२०२२ ते गुरुवार, ०७/०४/२०२२ (रात्री ११.५९ वा.)
शुल्क भरुन अर्ज निश्चित करणे गुरुवार, ०७/०४/२०२२ (रात्री ११.५९ वा.)

टिप : दिनांक १० फेब्रुवारी, २०२२ ते ३१ मार्च, २०२२ या कालावधीत प्रवेश निश्चिती आणि परीक्षा शुल्क भरलेले असतील त्यांना कोणतेही विलंब शुल्क आकारण्यात येणार नाही याची संबंधितानी नोंद घ्यावी.

सदर परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीचे वेळापत्रक व माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. याची सर्व संबंधीत विद्यार्थी/पालक/ संस्था यांनी कृपया नोंद घ्यावी.


MHT-CET-2022 Entrance Examination for Admission to Professional Courses in Engineering Technology, Pharmacy and Agricultural Education through State Common Entrance Test Cell, Mumbai for the academic year 2022-23 will be held at the various examination centers within and outside Maharashtra State.

As per schedule for the online application and submission of application by candidates in online mode is as follows.

Online registration & Confirmation of Application Form on website 10th February, 2022 (Thursday) to 31st March, 2022 (11:59 PM) (Thursday)
Online registration & Confirmation of Application Form on website (with additional Late Fee of Rs. 500/- for all categories) 19 April, 2022 (Friday) to 07th April, 2022 (11:59 PM) (Thursday)
Payment – Only through Online mode 07th April, 2022 (11:59 pm) (Thursday)

Note: Please note that no late fee will be charged for Application Confirmation and

Examination fees paid between February 10, 2022 to March 31, 2022.

The online application registration schedule and information brochure for this examination has been made available on the official website www.mahacet.org of the State Common Entrance Test Cell. This is for information all concern students/parents/ institutions/ State Holders.


एमएचटी सीईटी २०२२ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता महत्वाच्या सुचना

  1. एमएचटी सीईटी २०२२ साठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे.
  2. अर्ज करण्यापूर्वी एमएचटी सीईटी २०२२ साठी संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेचे सखोल वाचन करावे.
  3. उमेदवाराने इयत्ता १० वी किंवा इयत्ता १२ वी च्या गुणपत्रीकेवरील नाव अर्ज भरताना त्याचं क्रमाने नमूद करावे.
  4. उमेदवाराने स्वतःचा फोटो व सही योग्य पद्धतीने व योग्य Size मध्ये अपलोड करावे.
  5. उमेदवाराने जर राखीव प्रवार्गामधून परीक्षेला बसण्यासाठी अर्ज केला असेल, तर प्रवेश प्रक्रीयेपूर्वी खालील नमुद प्रमाणपत्रे तयार ठेवावीत
    • जात प्रमाणपत्र
    • जात वैधता प्रमाणपत्र
    • Non creamy layer certificate
  6. उमेदवाराने परीक्षा शुल्क अदा करण्यापूर्वी ऑनलाईन पद्धतीने भरलेल्या अर्जाची प्रिंट काढून भरलेली माहिती योग्य आहे याची खातरजमा करावी.
  7. भरलेल्या माहिती मध्ये बदल करण्यासाठी Edit सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
  8. उमेदवाराने परीक्षा शुल्क अदा केल्या नंतर भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात येणार नाही याची उमेदवाराने नोंद घ्यावी.
  9. उमेदवाराने परीक्षा केंद्रांची निवड काळजीपूर्वक करावी.
  10. कोणत्याही परिस्थितीत उमेदवारास परीक्षा केंद्र बदलून मिळणार नाही.
  11. उमेदवाराने अर्ज भरताना PCM किंवा PCB किंवा दोन्ही ग्रुपची नोंद काळजीपूर्वक करावी.
  12. उमेदवारास परीक्षा देण्याकरिता प्रश्न पत्रिका इंग्रजी/मराठी/उर्दू या भाषेत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. उमेदवाराने अर्ज भरताना प्रश्न पत्रिकेची योग्यती भाषा निवडावी.
  13. उमेदवाराने परीक्षा शुल्क अदा केल्यानंतर भरलेल्या अर्जाची प्रिंट व अदा केलेल्या शुल्काची पावती प्रिंट काढून स्वतः जवळ ठेवणे आवश्यक आहे.
  14. उमेदवाराने विहित वेळेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा.
  15. एमएचटी सीईटी २०२२ परीक्षेच्या अनुषंगाने या कार्यालयतर्फे वेळोवेळी देण्यात येणाऱ्या जाहीर सुचनाच्या माहितीसाठी उमेदवाराने या कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळाला नियमितपणे भेट द्यावी.
  16. उमेदवाराने कोणत्याही परिस्थितीत स्वतःचे Login Id व Password इतर व्यक्ती सोबत share करू नये.
  17. उमेदवाराने परीक्षाअर्ज भरताना स्वतःचा मोबाईल न. व ई-मेल आयडी द्वावा, जेणेकरून परीक्षेबाबतच्या सुचना संबंधित मोबाईल न. वर sms द्वारे पाठविण्यात येतील.
  18. उमेदवारास अर्ज भरताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी, संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या हेल्पलाईन न. वर संपर्क साधावा.
अधिकृत संकेतस्थळ / Official Website :
सविस्तर जाहिरात / Detailed Advertisement PDF :
ऑनलाईन अर्ज / Online Application :

ऑनलाइन अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांना शैक्षणिक पात्रता आणि इतर पात्रता निकषांच्या तपशीलांसाठी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी | Candidates are advised to carefully read the full advertisement for details of educational qualification and other eligibility criteria before submission of online application.


हेल्पलाईन माहिती / Helpline Details :

संपर्क क्रमांक / Helpline No : +91-8975857462, +91-8856860692, +91-8857834644, +91-8857954644, +91-9028625695

ई-मेल आयडी / E-Mail Id : mhtcet22.cetcell@gmail.com

संकेतस्थळ / Website : http://www.mahacet.org

Category :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join Telegram Channel

सर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा !

Subscribe Whatsapp Updates

सर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा !

Jobs by Department

Jobs by Qualification

How to whitelist website on AdBlocker?

How to whitelist website on AdBlocker?

  1. 1 Click on the AdBlock Plus icon on the top right corner of your browser
  2. 2 Click on "Enabled on this site" from the AdBlock Plus option
  3. 3 Refresh the page and start browsing the site