द्रव्याचे प्रकार

16

द्रव्याचे प्रकार आणि संपूर्ण माहिती

द्रव्याचे प्रकार
 1. द्रव्य
 2. मूलद्रव्य
 3. संयुगे
 4. मिश्रणे

द्रव्य :

द्रव्य तीन रूपात असतात.

  1.  स्थायू
  2. द्रव
  3. वायु

मूलद्रव्य :

  1. मूलद्रव्याचे प्रत्येक कण एकसारख्याच पदार्थाने बनलेले असतात.
  2. त्याचा प्रत्येक अविभाज्य कणांचे गुणधर्म सारखेच असतात.
  3. कोणत्याही भौतिक किंवा रासायनिक पद्धतीने मूलद्रव्याच्या कणांचे विभाजन करता येत नाही.
  4. सज्ञेचा वापर करून मूलद्रव्य दर्शविता येतात.
  5. एकूण 119 मूलद्रव्य ज्ञात आहेत,त्यापैकी 92 निसर्गात आढळतात.
 • मूलद्रव्याचे वर्गीकरण –
   1. धातू
   2. अधातू
   3. धातुसदृश
 • धातू
  • धातू हे काठीण्य, वर्धंनियता, तन्यता, चकाकी आणि उष्णता व वीज सुवाहकता ही धातूची वैशिष्ट आहेत. सर्वसाधारण धातू हे स्थायुरूप असतात.
 • अधातू
  • अधातू हे न चकाकणारे, ठिसुल, उष्णता आणि विजेचे दुर्वाहक असतात.
 • धातुसदृश
  • काही गुणधर्म धातूंप्रमाणे तर काही गुणधर्म अधातूप्रमाणे असतात.अर्सेनिक, सिलिकॉन, सेलनियम ही धातूसदृश आहेत,

संयुगे :

  1. दोन किंवा अधिक मूलद्रव्याच्या वजनी प्रमाणात आणि रासायनिक संयोगाने बनलेल्या पदार्थ म्हणजे संयुगे होय.
  2. व त्या रासायनिक प्रक्रियेत सध्या होणार्‍या घटकांत विभाजन करता येते.
  3. रेणूसूत्राच्या सहाय्याने संयुगे दर्शविता येतात.
  4. पाणी हे संयुग आहे.

मिश्रणे :

  1. दोन किंवा अधिक पदार्थ एकमेकांत कोणत्याही प्रमाणात मिसळणे त्याला मिश्रण म्हणतात.
  2. मिश्रणात मूल घटकांचे गुणधर्म कायम राहतात.
  3. मिश्रणातील मूळ घटक साध्या पद्धतीने वेगळे करता येतात.
  4. मिश्रणातील घटक ठराविक प्रमाणात नसतात.
  5. उदा. हाताने उचलणे, लोहचुंबक फिरवणे इ.
  6. दोन किंवा अधिक धातू किंवा धातू आणि अधातू यांच्या मिश्रणाने संमिश्र तयार होतात.
  7. हवा हे एक मिश्रण आहे.

मिश्रणाचे प्रकार –

  1. समांगी मिश्रण
   1. समांगी मिश्रणातील घटक संपूर्ण मिश्रणात एकसारखे मिसळतात.
   2. समांगी मिश्रणाचे गुणधर्म आणि संघटन संपूर्ण मिश्रणात समान असतात.
   3. पोटॅशिअम परमॅँगनेटचे द्रावण हे समांगी मिश्रण आहे.
   4. द्रावण – दोन किंवा अधिक पदार्थाच्या मिश्रणास द्रावण म्हणतात.
   5. उदा. सोडा वॉटर.
   6. स्थायूची द्रावणे (संमिश्रे) व वायूंची द्रावणे (हवा)
   7. द्रावनातील कण अतिशय लहान असतात. ते त्यातून जाणार्‍या प्रकाश शलाकेला विखातू देत नाही.
   8. द्रव्य विरघळतो त्यास द्रावण म्हणतात.
  2. विषमांगी मिश्रण
   1. विषमांगी मिश्रणातील घटक संपूर्ण मिश्रणात एकसारखे मिसळलेले नसतात.
   2. विषमांगी मिश्रणाचे गुणधर्म आणि संघटन संपूर्ण मिश्रणात एकसारखे नसतात.
   3. पाणी आणि तेलाचे मिश्रण विषमांगी आहे.
   4. निलंबन – हे विषमांगी मिश्रण आहे ज्यात द्राव्याचे कण न विरघळता निलंबित राहतात हे कण आपण नुसत्या डोळ्यांनी पाहू शकतो.
   5. कलिल – कण द्रावणात एकसारखे मिसळलेले असतात. कलिल कण हे निलंबन कणांपेक्षाही आकाराने लहान असतात.
   6. हे समांगी द्रवनाप्रमाणे दिसते पण हे विषमांगी द्रावण आहे.
   7. कलिल घटक अपस्करीत प्रावस्था व अपस्कारीत माध्यमात असतात.

इतर महत्वाची माहिती

द्रव्याचे प्रकार

द्रव्याचे प्रकार आणि संपूर्ण माहिती  

0 comments

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here