Common Entrance Test (CET) for coaching of Civil Services Examination (UPSC)
महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा संपूर्ण तयारी करिता दिल्ली येथील नामवंत खाजगी संस्थेमधून प्रशिक्षण देणे योजना
महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा संपूर्ण तयारी करिता दिल्ली येथील खाजगी संस्थेमधून प्रशिक्षण घेणेसाठी प्रशिक्षणार्थी निवड करण्यासाठी सामायिक प्रवेश परीक्षा (Common Entrance Test- CET) घेण्यात येणार आहे. या करिता इच्छुक व पात्र उमेदवारांकडून या योजनेच्या लाभासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवार दिनांक 01 सप्टेंबर 2022 ते 20 सप्टेंबर 2022 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सदर करू शकता
(ऑनलाइन अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता आणि इतरपात्रता निकषांच्या तपशीलांसाठी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी)
जाहिरात क्रमांक / Advertisement no. : –
अर्ज कसा कराल : Mode of Application : ऑनलाईन / Online
परीक्षेचे नाव / Exam Name : –
प्रशिक्षणार्थीची सर्व साधारण पात्रता
- उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा तसेच उपरोक्त परीक्षेची इतर अर्हता, शिक्षण, वय व इतरपात्रता व अटी पूर्ण केलेल्या असाव्यात.
- उमेदवार महाराष्ट्र राज्यातील कमीत कमी ५ वर्षे रहिवासी /अधिवासी असला पाहिजे.
- उमेदवाराची जमात ही महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या यादी मधील असणे आवश्यक
- प्रशिक्षणासाठी प्रवेश परीक्षा अर्ज करते वेळेस उमेदवाराकडे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र तसेचअनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.
- शासकीय सेवेत असणाऱ्या उमेदवारास ह्या प्रशिक्षण योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- उमेदवारास कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही कारणास्तव प्रशिक्षण सोडवायचे असल्यास त्या उमेदवारासप्रशिक्षण दरम्यान प्रशिक्षणाकरिता संस्थेने केलेला खर्च पुन्हा आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेसपरत द्यावा लागेल.
- उमेदवाराने खोटे कागदपत्रे सादर करून योजनेचा लाभ घेतला असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांचेकडून संपूर्ण प्रशिक्षणाचा खर्च वसूल करून कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
- उमेदवारास एकाच वर्षी सदर योजनेचा व आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्रमांक -प्रशिक्षण -२०२० / प्र.क्र. ७५ / का. -०९ दिनांक १३ नोव्हेंबर, २०२०अन्वये संघ लोकसेवा आयोग मुख्य परीक्षा व मुलाखत तयारी साठी देण्यात येणाऱ्या प्रोत्साहन आर्थिक मदत योजना या दोन्ही योजनेचा एकत्रित लाभघेता येणार नाही.
- प्रशिक्षण कालावधीमध्ये उमेदवाराने धुम्रपान करणे, अंमली पदार्थाचे सेवन करणे, मद्यपान करणे, उद्धट .वर्तन असे गैर प्रकार केल्यास सदर उमेदवाराची निवड रद्द करण्यात येऊन कायदेशीर/ दंडात्मक कारवाई करण्यात येईल
- PVTG जमातीच्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.
- नियमानुसार मुली व दिव्यांग, अनाथ यांच्यासाठी जागा आरक्षित ठेवल्या जातील. परंतु आरक्षित जागेवरमहिला व दिव्यांग, अनाथ पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर जागा अनुसूचित जमातीतीलगुणानुक्रमे पात्र असलेल्या उमेदवारास दिली जाईल.
- सदर प्रशिक्षण कार्यक्रमातील प्रशिक्षणास ७५ टक्के उपस्थिती आवश्यक (अनिवार्य) आहे परंतुप्रशिक्षणार्थी गंभीर आजारी पडणे, अपघात होणे, इतर स्पर्धा परीक्षांना उपस्थित राहणे (नैसर्गिक आपत्ती/ कौटुंबिक समस्या | वैद्यकीय कारण) या कारणामुळे कोचिंग क्लासेस ला अनुपस्थित असल्यास अपवादात्मक परिस्थिती मध्ये प्रशिक्षणार्थीना विद्यावेतन अदा करण्याबाबतचा अंतिम निर्णय मा. आयुक्त,आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांचा असेल.
- अनुसूचित जमातीच्या प्रशिक्षणार्थी व त्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. ८,००,०००/- (अक्षरातरुपये आठ लक्ष फक्त) या पेक्षा कमी असावी.
- ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांची निवड झाल्यानंतर तात्काळ दिल्ली येथील प्रशिक्षण संस्थेत रुजू होणे बंधनकारक असेल व ७ दिवसाच्या आत रुजू करण्याचे हमीपत्र या कार्यालयास जमा करून जे उमेदवार दिलेल्या तारखेपासून १५ दिवसाच्या आत रुजू होत नाहीत, अशा उमेदवारांची निवड रद्द करून प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवड करून त्यांना प्रशिक्षणासाठी दिल्ली येथे पाठविण्यात येईल. अपवाद – महारष्ट्र लोकसेवा आयोग किंवा इतर स्पर्धा परीक्षेच्या मुलाखत किंवा इतर बाबी संदर्भात समस्या उद्भवल्यास त्याची कारण मिमांसा करून योग्य निर्णय घेण्याचा अधिकार मा. आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांचा असेल.
- सदर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे या संस्थेने (Empanel) नामिका सूचीसाठी श्रीराम’स आय. ए. एस. नवी दिल्ली (Sriram’s IAS, New Delhi) या संस्थेचा समावेश केला आहे. सदर संस्थेस सामान्य अध्ययन या विषयाची पूर्व + मुख्य तसेच मुलाखत व वैकल्पिक विषय तयारी, व्याख्यातांचे मानधन, स्टडी मटेरियल, नोट्स (वाचन साहित्य) टेस्ट सेरीज, आवश्यक वर्तमानपत्र, मासिके, पुस्तके, स्टेशनरी इ. पुरविणे तसेच प्रशिक्षणाच्या इतर अनुषंगिक खर्च यासाठी फी अदा करण्यात येईल.
प्रशिक्षणार्थीना देण्यात येणाऱ्या सोई – सुविधा :
- नवी दिल्ली येथील श्रीराम’स आय. ए. एस. या प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रशिक्षण घेताना प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यास दर महिन्यास रुपये १२,०००/- इतके विद्यावेतन देण्यात येईल.
- सदर विद्यावेतनासाठी प्रशिक्षणार्थीची हजेरी किमान ७५ टक्के असणे बंधनकारक आहे. सबंधित प्रशिक्षण संस्थेकडून प्रत्येक महिन्याचे उपस्थिती पत्रक प्राप्त झाल्यावरच प्रशिक्षणार्थीच्या बँक खाती विद्यावेतनाची रक्कम DBT द्वारे वर्ग करण्यात येईल. कोणत्याही प्रशिक्षणार्थीने प्रशिक्षणास उपस्थित न राहता अथवा ७५ टक्के पेक्षा कमी हजेरी असल्यास विद्यावेतनासाठी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेवर दबाव आणल्यास सदर प्रशिक्षणार्थीस अपात्र ठरवण्यात येईल.
- पुस्तक खरेदी करीता प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यास एकदाच रुपये १४,००० /- देण्यात येईल.
- नवी दिल्ली येथील श्रीराम’स आय. ए. एस. या प्रशिक्षण केंद्रावर प्रशिक्षणाच्या सुरुवातीस जाण्याकरिता व प्रशिक्षण संपल्यानंतर परतीच्या प्रवासासाठी रु. २०००/- इतकी रक्कम प्रवास भत्ता व प्रवास खर्च म्हणून प्रशिक्षणार्थीच्या बँक खाती सदर रक्कम DBT द्वारे वर्ग करण्यात येईल.
- सदरचा प्रशिक्षण कार्यक्रम अनिवासी , नियमित स्वरूपाचा प्रशिक्षण कार्यक्रम आहे.
- या योजने बाबत अधिक माहितीसाठी कृपया आदिवासी विकास विभाग यांचा शासन निर्णय क्रमांक – प्रशिक्षण -२०२१/ प्र.क्र.३४/ का. -०९ दिनांक: २० एप्रिल, २०२१ वाचा. तसेच उमेदवारास आवेदन पत्र भरणे (Application Form) तसेच सबंधित इतर तांत्रिक अडचणी असल्यास अधिक माहितीसाठी वेबसाईट वर देण्यात आलेल्या हेल्पलाईन क्रमांक व ईमेल आय. डी. वरच संपर्क साधावा
सदर योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे
- अद्यावत फोटोग्राफ (Only JPG or JPEG; Size between 80 – 100 KB)
- अद्यावत स्वाक्षरी (Only JPG or JPEG; Size between 30-50 KB)
खाली नमूद सर्व आवश्यक कागदपत्रे हि फक्त PDF फॉरमॅट मध्ये Size between 200 – 300 KB मध्ये स्कॅन केलेली असावीत
- अनुसूचित जमातीचे मूळ प्रमाणपत्र स्कॅन प्रत
- अनुसूचित जमातीचे वैधता मूळ प्रमाणपत्र स्कॅन प्रत
- दहावी गण पत्र किंवा मळ प्रमाणपत्र स्कॅन प्रत
- बारावी गुण पत्र किंवा मूळ प्रमाणपत्र स्कॅन प्रत
- पदवी गुण पत्र किंवा मूळ प्रमाणपत्र स्कॅन प्रत
- डोमिसाईल मूळ प्रमाणपत्र स्कॅन प्रत
- आधारकार्ड मूळ छायांकित स्कॅन प्रत
- आधारकार्ड लिंक असलेले मूळ बँक तपशील – पास बुक स्कॅन प्रत
- तहसीलदार कार्यालयातून निर्गमित केलेला मूळ उत्त्पन्नाचा दाखला स्कॅन प्रत
- सिविल सर्जन यांनी निर्गमित केलेला मूळ अपंगाचा दाखला स्कॅन प्रत
- उपायुक्त, महिला व बाल विकास आयुक्तालय यांनी निर्गमित केलेला मूळ अनाथाचा दाखला स्कॅन प्रत
- वर नमूद सर्व कागदपत्रांसोबत सबंधित भरलेल्या मूळ अर्जाची प्रत, परीक्षा प्रवेश पत्र इ. बाबी डाऊनलोड करून ठेवावी. प्रवेश घेते वेळेस जर उमेदवारांनी उपरोक्त नमूद कागदपत्राची पूर्तता न केल्यास या योजनेचा लाभ . देता येणार नाही. उपरोक्त नमूद सबंधित भरलेला अर्जाची मूळ प्रत, परीक्षा प्रवेश पत्र, नमूद सर्व मूळ कागदपत्रांच्या पडताळणी करण्याच्या “अटी व शर्ती” च्या अधीन राहून गुणवत्ता यादी व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात येईल. मूळ अर्जासह सर्व कागदपत्राच्या छायांकित प्रती आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, २८, राणीचा बाग, जुने सर्किट हाउस जवळ, पुणे ४११००१ या कार्यालयात जमा करावे लागेल यांची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- प्रवेश परीक्षा, प्रवेश पत्र, गणवत्ता यादी / प्रतीक्षा यादी, कागदपत्रे तपासणी / पडताळणी, तसेच इतर प्रक्रिया बाबतची सर्व अद्यावत माहिती www.trti.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर प्रकाशित करण्यात येईल. याबाबतची कोणतीही माहिती कोणत्याही उमेदवारास वैयक्तिक स्वरुपात कळविण्यात येणार नाही.
Other Important Recruitment |
The Syllabus for COMMON ENTRANCE TEST (CET) for
Training of UPSC Civil Services Examination at New Delhi
Subject | No. of questions | Maximum Marks | Medium | Duration | Nature of Question Papers | Mode of Examination |
General Studies | 100 | 100 | English / Marathi | 2 Hrs. (120 Minutes) | Multiple objective type |
Online on (Computer) |
- The Questions will be Objective Multiple Choice Questions with Four Options.
- There is No Negative Marking. The time allotted is 2 Hours i.e. ( 120 Minutes)
- The Questions will be in English and Marathi.
- Mode of Examination – Online
The Quesion will be based on following Syllabus:
- Current events of national and international importance
- History of India and Indian National Movement
- Indian and World Geography-Physical, Social, Economic Geography of India and the World
- Indian Polity and Governance-Constitution, Political System, Panchayati Raj. Public Policy. Rights Issues, etc.
- Economic and Social Development-Sustainable Development, Poverty. Inclusion, Denmographics. Social Sector Initiatives. etc.
- General issues on Environmental ecology. Bio-diversity and Climate Change – that do not require subject Specialization.
- General Science
- Comprehension;
- Interpersonal skills including communication skills:
- Logical reasoning and analytical ability:
- Decision making and problem solving;
- General mental ability;
- Basic numeracy (numbers and their relations, orders of magnitude, etc.) (Class X level). Data
Interpretation (charts, graphs. tables, data suficiency etc. -Class X level);
परीक्षा शुल्क / Exam Fee : No Fee. / फी नाही
महत्वाच्या तारखा / Important Dates |
|
अर्ज सुरु होण्याची तारीख / Opening Date of Registration |
01 सप्टेंबर 2022 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख / Closing Date of Registration |
20 सप्टेंबर 2022 |
ऑनलाइन अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता आणि इतर पात्रता निकषांच्या तपशीलांसाठी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी | Candidates are advised to carefully read the full advertisement for details of educational qualification and other eligibility criteria before submission of online application.
हेल्पलाईन माहिती / Helpline Details :
संपर्क क्रमांक / Helpline No : 89568 94140 / 020 26360941 / 26362772 / 26330230
ई-मेल आयडी / E-Mail Id : contact@trtipune.in
भरती जाहिरात द्वारे नियमितपणे सरकारी नोकरी च्या नवनवीन संधी आपल्यापर्यंत पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असतो, भरती जाहिरात च्या संकेतस्थळाबद्दल आपल्याला काही सुचना किंवा जाहिरातीबद्दल आपले काही प्रश्न असतील तर खालील कमेंट बॉक्स मध्ये आपण विचारू शकता, व येथे प्रसीद्ध होणाऱ्या जाहिराती आपण आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, व इतर नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींबरोबर शेअर केल्यास आम्ही आपले ऋणी राहू! धन्यवाद !!!