महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २६१९ पदांसाठी मेगाभरती | MPSC Group C Mega Recruitment

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक २७ सप्टेंबर २०२६ पासून महाराष्ट्र गट क संयुक्त सेवा परीक्षा २०२६ चे आयोजन करण्यात आले असून, या भरती  प्रक्रियेद्वारे उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहायक, कर सहायक, सहायक मोटर वाहन निरीक्षक, गट क. लिपिक टंक लेखक पदांच्या एकूण २६१९ रिक्त जागांची भरती करण्यात येणार आहे. सदर भरती प्रक्रियेसाठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक २७ जून २०२६ ते १७ जुलै २०२६ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. दिनांक २२ जुलै २०२६ रोजी आयोगातर्फे नवीन शुद्धीपत्रक जाहीर करण्यात आलेली असून ग्राम विकास अधिकारी (तलाठी), व्वारिष्ठ अभिलेखापाल/वरिष्ठ लिपिक, सहायक अधीक्षक, सहाय्यक मत्सविकास अधिकारी, लिपिक टंकलेखक, अश्या एकूण ३०८८ नवीन पदांचा समावेश महाराष्ट्र गट क संयुक्त सेवा परीक्षा २०२६ अंतर्गत करण्यात आलेला आहे.

 

पदांचे तपशील

सदर भरती प्रक्रीयेत पुढील प्रमाणे विविध विभगातील रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे

अ. क्र. संवर्ग एकूण पदे
उद्योग निरीक्षक / Industry Inspector  ९ पदे
तांत्रिक सहायक / Technical Assistant  ३ पदे
कर सहायक / Tax Inspector  २८२ पदे
सहायक मोटर वाहन निरीक्षक, गट क. / Assistant Motor Vehicle Inspector, Group – C  ४६१ पदे
लिपिक टंक लेखक / Clerk Typist  १८६४ पदे
ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) / Village Revenue Officer (Talathi)  १५३९ पदे
वरिष्ठ अभिलेखापाल/वरिष्ठ लिपिक / Senior Archivist / Senior Clerk  ११ पदे
सहायक अधीक्षक / Assistant Superintendent  ११ पदे
सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी / Assistant Fisheries Development Officer  २५४ पदे
१० लिपिक-टंकलेखक / Clerk Typist  ९३४ पदे
११ लिपिक-टंकलेखक नोंदणी व मुद्रांक विभाग / Clerk-Typist, Registration and Stamp Department  ३३९ पदे
एकूण पदे  ५७०७ पदे

 

शैक्षणिक पात्रता

  • उद्योग निरीक्षक / Industry Inspector
    • स्थापत्य अभियांत्रिकी किंवा स्थापत्य अभियांत्रिकी विषयाशी संबंधित वास्तुविद्या, नगररचना विषयांमधील किंवा तंत्रज्ञानामधील पदविका

 

  • तांत्रिक सहायक / Technical Assistant
    • कोणत्याही क्षेत्रातील पदवी

 

  • कर सहायक / Tax Inspector
    • कोणत्याही क्षेत्रातील पदवी
    • मराठी टंकलेखन ३० शब्द प्रती मिनिट
    • इंग्रजी टंकलेखन ४० शब्द प्रती मिनिट

 

  • सहायक मोटर वाहन निरीक्षक, गट क. / Assistant Motor Vehicle Inspector, Group – C
    • १० वी उत्तीर्ण
    • ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग किंवा मेकॅनिकल इंजिनीअरिंग

 

  • लिपिक टंक लेखक / Clerk Typist
    • कोणत्याही क्षेत्रातील पदवी
    • मराठी टंकलेखन ३० शब्द प्रती मिनिट
    • इंग्रजी टंकलेखन ४० शब्द प्रती मिनिट

 

  • ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) / Village Revenue Officer (Talathi)
    • कोणत्याही क्षेत्रातील पदवी

 

  • वरिष्ठ अभिलेखापाल/वरिष्ठ लिपिक / Senior Archivist / Senior Clerk
    • कोणत्याही क्षेत्रातील पदवी

 

  • सहायक अधीक्षक / Assistant Superintendent
    • कोणत्याही क्षेत्रातील पदवी

 

  • सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी / Assistant Fisheries Development Officer
    • मत्स्यविज्ञान विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी (B.F.Sc.)

 

  • लिपिक-टंकलेखक / Clerk Typist
    • कोणत्याही क्षेत्रातील पदवी
    • मराठी टंकलेखन ३० शब्द प्रती मिनिट
    • इंग्रजी टंकलेखन ४० शब्द प्रती मिनिट

 

  • लिपिक-टंकलेखक नोंदणी व मुद्रांक विभाग / Clerk-Typist, Registration and Stamp Department
    • कोणत्याही क्षेत्रातील पदवी
    • मराठी टंकलेखन ३० शब्द प्रती मिनिट
    • इंग्रजी टंकलेखन ४० शब्द प्रती मिनिट

 

वेतनश्रेणी 

  • उद्योग निरीक्षक : ३५,४००/- रु. – १,१२,४००/- रु.
  • तांत्रिक सहायक :  २९,२००/- रु. – ९२,३००/- रु.
  • कर सहायक : २५,५००/- रु. – ८१,१००/- रु.
  • सहायक मोटर वाहन निरीक्षक, गट क. : ३८,६००/- रु. – १,२२,८००/- रु.
  • लिपिक टंक लेखक : १९,९००/- रु. ते ६३,२००/- रु.

 

परीक्षा अभ्यासक्रम 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर सर्व परीक्षांसाठीचे अभ्यासक्रम PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आलेले असून ह्या लिंक वर क्लिक करून अर्जदार अभ्यासक्रम डाऊनलोड केऊ शकता

 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे 

  • आधार कार्ड | AADHAR CARD
  • अधिवास प्रमाणपत्र | DOMICILE CERTIFICATE
  • जात प्रमाणपत्र | CAST CERTIFICATE
  • जात पडताळणी प्रमाणपत्र | CAST VAIDITY
  • नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र | NON CREAMYLAYER CERTIFICATE
  • १० वी गुणपत्रक / प्रमाणपत्र | SSC MARKSHEET / CERTIFICATE
  • १२ वी गुणपत्रक / प्रमाणपत्र | HSC MARKSHEET / CERTIFICATE
  • पदविका गुणपत्रिका / प्रमाणपत्र | DIPLOMA MARKSHEET / CERTIFICATE
  • पदवी गुणपत्रिका / प्रमाणपत्र | GRADUATION MARKSHEET / CERTIFICATE
  • पदव्युत्तर पदवी गुणपत्रिका / प्रमाणपत्र | POST GRADUATION MARKSHEET / CERTIFICATE
  • एम.एस. सी. आय. टी प्रमाणपत्र | MSCIT CERTIFICATE
  • टंकलेखन प्रमाणपत्र | TYPING CERTIFICATE
  • अनुभव प्रमाणपत्र / EXPERIENCE CERTIFICATE
  • लहान कुटुंब प्रमाणपत्र / SMALL FAMILY DECLARATION

 

वयोमर्यादा 

  • उद्योग निरीक्षक : १९ ते ३८ वर्षे
  • तांत्रिक सहायक :  १८ ते ३८ वर्षे
  • कर सहायक : १८ ते ३८ वर्षे
  • सहायक मोटर वाहन निरीक्षक, गट क. : १८ ते ३८ वर्षे
  • लिपिक टंक लेखक : १८ ते ३८ वर्षे
    • वयोमर्यादा गणक दिनांक : दिनांक ०१ ऑक्टोबर २०२६

 

  • वयोमर्यादा आरक्षण
    • मागासवर्गीय / अनाथ / आर्थिक दृष्ट्या दुर्गम घटक १९ ते ४३ वर्षे
    • माझी सैनिक : १९ ते ४३ वर्षे + सेवा कालावधी + ३ वर्षे

 

शारीरिक पात्रता 

  • सहायक मोटर वाहन निरीक्षक, गट क
    • पुरुष उमेदवार
      • उंची : किमान १६३ सेमी
      • छाती : ७९ सेमी (किमान ५ सेमी प्रसरण)
    • महिला उमेदवार
      • उंची : किमान १५५ सेमी
      • वजन : किमान ४५ कि. ग्र.

 

परीक्षा शुल्क

  • संयुक्त पूर्व परीक्षा
    • खुला प्रवर्ग : ३९४/-
    • मागासवर्गीय : २९४/-
    • माझी सैनिक : ४४/-
  • मुख्य परीक्षा
    • खुला प्रवर्ग : ५४४/-
    • मागासवर्गीय : ३४४/-
    • माझी सैनिक : ४४/-

 

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

महाराष्ट्र गट क संयुक्त सेवा परीक्षा २०२६ साठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अर्जदाराने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेच्या https://mpsconline.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी व अर्जदाराने यापूर्वी नोंदणी केलेली असल्यास लॉगीन या पर्यायाचा वापर करून आपल्या आयडी पासवर्ड चा वापर करून लॉगीन करावे, जर नोंदणी केलेली नसेल तर आमच्या संकेतस्थळावरील “महाराष्ट्र लोकसेवा आयोग नोंदणी कशी करावी” या पोस्त्द्वारे नोंदणी कशी करावी याबद्दल सविस्तर माहिती वाचावी.

ज्या उमेदवारांनी यापूर्वीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली आहे त्यांनी पुढीलप्रमाणे महाराष्ट्र गट क संयुक्त सेवा परीक्षा २०२६ साठी अर्ज  करावा

  • सर्वप्रथम अर्जदाराने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेच्या https://mpsconline.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी व लॉगीन या पर्यायाचा वापर करून आपला युजरनेम व पासवर्ड चा वापर करून लॉगीन करावे

 

  • लॉगीन केल्यानंतर अर्जदारास Home, Profile Creation, Online Application, My Account, Correspondence, Logout असे वेगवेगळे पर्याय उपलब्ध दिसती, सर्वप्रथम अर्जदाराने My Account या पर्यायावर क्लिक करून View Profile या पर्यायावर क्लिक करावे व आपण नोंदणी करतांना जी महती सादर केलेली आहे ती पुन्हा तपासून घेणे.

  • अर्जदारास आपल्या शारीरिक पात्रतेत, शैक्षणिक पात्रतेत किंवा इतर काही तपशिलात बदल करावयाचा असल्यास योग्य तो बदल करून घेणे, नॉन क्रिमी लेअर अंतर्गत येणाऱ्या उमेदवारांनी आपल्या नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्राची वैधता तपासून घेणे व गरजेचे असल्यास अपडेट करून घेणे
  • सर्व योग्य ते बदल करून झाल्यानंतर अर्जदाराने Online Application या पर्यायावर क्लिक करावे, या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे सध्या सुरु असलेले सर्व स्पर्धा परीक्षा या ठिकाणी बघावयास मिळतील, अर्जदाराने जाहिरात क्रमांक 017 / 2026 Maharashtra Group-C Services Combined Preliminary Examination-2026 या परीक्षेसामोरील “View” या पर्यायावर क्लिक करावे.

  • View पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर महाराष्ट्र गट क संयुक्त सेवा परीक्षा २०२६ चा अर्ज उपलब्ध होईल सर्वप्रथम अर्जदाराने “Check Eligibility” या पर्यायावर क्लिक करून आपण कोणत्या पदासाठी पात्र आहे याबद्दल पडताळणी करून घ्यावी. अर्जदाराने अर्ज करण्यापूर्वी आपल्या प्रोफाईल च्या शैक्षणिक पात्रतेच्या रकान्यात अर्जदाराच्या पात्रतेनुसार सर्व माहिती नमूद केल्याची खात्री करून घ्या. “Check Eligibility” या पर्यायावर क्लिक केल्यानंतर ज्या पदासाठी अर्जदार पात्र असेल त्या पदासमोर You are eligible and can apply for this post व ज्या पदासाठी अपात्र असेल त्या पदासमोर You are not eligible for this post अश्या प्रकारे संदेश दिसेल, अर्जदाराने आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पुन्हा एकदा खात्री करून घ्यावी व स्क्रीन च्या उजव्या बाजूस असलेल्या Apply या अर्यायाव्र क्लिक करावे

 

 

  • Apply पर्यायावर क्लिक केल्यानंतर अर्जदाराने परीक्षा शुल्काचा भरणा करावा, परीक्षा शुल्क भरण्यासाठी इंटरनेट बँकिंग, UPI, डेबिट कार्ड, व क्रेडीट कार्ड या पर्यायांचा वापर करू शकता.
  • ऑनलाईन अर्ज केल्यानंतर अर्जदाराने अर्जाची छापील प्रत जपून ठेवावी.

 

ऑनलाईन अर्ज कालावधी 

  • अर्ज सादर करण्याचा कालावधी : २८ जून २०२६ ते १७ जुलै २०२६
  • ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी : २८ जून २०२६ ते १७ जुलै २०२६
  • ऑफलाईन चलन प्रिंट करण्याचा कालावधी : २८ जून २०२६ ते  १९ जून २०२६
  • चलनाद्वारे परीक्षा शुल्क बँकेत भरण्याचा कालावधी : २८ जून २०२६ ते  २० जून २०२६

 

प्रवेशपत्र डाउनलोड 

अर्जदारांना परीक्षेच्या ७ दिवस आधी प्रवेशपत्र https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतील

 

मदतीसाठी संपर्क

  • संपर्क क्रमांक
    • 7303821822 / 02269123914
  • इमेल आयडी
    • support-online@mpsc.gov.in
  • संपर्काची वेळ
    • Monday to Friday 9:00 AM. to 8:00 PM.
      Saturday & Sunday : 9:30 AM. to 6:30 PM.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Index