महाराष्ट्रात दर वर्षी लाखो विद्यार्थी आपले पदवी चे शिक्षण पूर्ण करून सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु करतात, सरकारी नोकरी मिळविण्याचे स्वप्न बघणाऱ्या प्रत्येकासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या परीक्षा अत्यंत महत्वाच्या आहे. जर आपणही MPSC परीक्षा देण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. ह्या पोस्ट द्वारे हि नोंदणी कशी करावी यावद्दल माहिती जाणून घेऊ या.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे काय ?
महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांमध्ये वर्ग १, वर्ग २ व वर्ग ३ पदांच्या नोकर भरती साठी परीक्षा आयोजित करणे, इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविणे, प्राप्त अर्जदारांची परीक्षा घेणे, व परीक्षेचा निकाल लाऊन शासनाच्या नोकर भरती प्रक्रियेस पूर्ण करणे हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे काम आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे सर्वात महत्वाची राज्यसेवा परीक्षेचे आयोजन करते दर वर्षी लाखो विद्यार्थी हि परीक्षा देत असतात, त्याच प्रकारे वन सेवा परीक्षा, कृषी सेवा परीक्षा, अभियांत्रिकी सेवा परीक्षा व परीक्षांचे आयोजन की जाते.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगावर महाराष्ट्र शासनातील मुख्य पदांसाठी परीक्षेच्या माध्यमातून योग्य उमेदवाराची क्षमता व गुणवत्तेच्या आधारावर निवड करणे हि जबाबदारी असते.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा पात्रता
आयोगातर्फे अनेक वेगवेगळ्या पदांसाठी भरती परीक्षा आयोजित केली जाते प्रत्येक पदानुसार शैक्षणिक, शारीरिक व इतर पात्रता वेगवेगळी असते. पदानुसार शैक्षणिक पात्रता व इतर पात्रतेसंबंधी भविष्यात दुसऱ्या पोस्ट द्वारे विस्तृत माहिती उप्देत केली जाईल, ह्या पोस्ट द्वारे आपण MPSC नोंदणी कशी करावी याबद्द जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्वसाधारणपणे महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा देण्यासाठी उमेदवार हा पदवीधर असावा, उमेदवाराचे वय १८ ते ३८ वर्षे असावे व उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा नागरिक असावा.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे आयोजित सर्व स्पर्धा परीक्षांचे अर्ज हे फक्त ऑनलाईन स्वरुपात स्वीकारले जातात. त्यासाठी इच्छुक उमेदवारांना आयोगाच्या संकेतस्थळावर आपली नोंदणी करणे अनिवार्य आहे. नोंदणी कशी करावी हे आपण पुढील स्टेप्स द्वारे समजून घेऊ
- सर्वप्रथम अर्जदाराने आपल्या संगणकाचा वापर करून महाराष्ट लोकसेवा आयोगाचे ऑनलाईन अर्ज प्रक्रियेचे https://mpsconline.gov.in हे संकेतस्थळ उघडावे. या पेज वर आपणास लॉगइन चा पर्याय दिसेल व त्या खालोखाल “Create a new account” चा पर्याय दिसेल, जर याआधी खाते तयार केलेले असेल तर युजरनेम च्या जागी आपला मोबाईल क्रमांक किंवा ईमेल आयडी टाकावा व पासवर्ड टाकून आपल्या खात्यात प्रवेश करावा व जर अर्जदाराने या आधी लोकसेवा आयोगाचे खाते तयार केले नसेल तर “Create a new account” या पर्यायावर क्लिक करावे व

- “Create a new account” वर क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम अर्जदाराने आपला अचूक ईमेल आयडी नमूद करावा व Get OTP या पर्यायावर क्लिक करावा, अर्जदाराच आपल्या ईमेल वर ६ अंकी OTP प्राप्त होईल खाली OTP च्या बॉक्स मध्ये OTP नमूद करून Verify OTP वर क्लिक करावे
- जर उमेदवारास आपल्या इमेल वर OTP प्राप्त झाला नाही तर ईमेल च्या Spam फोल्डर मध्ये ईमेल आलेला असेल तो तपासून बघावा
- त्यानंतर अर्जदाराने आपला अचूक मोबाईल क्रमांक नमूद करावा व Get OTP या पर्यायावर क्लिक करावा, अर्जदाराच आपल्या मोबाईल क्रमांकावर वर ६ अंकी OTP प्राप्त होईल खाली OTP च्या बॉक्स मध्ये OTP नमूद करून Verify OTP वर क्लिक करावे
- त्यानंतर अर्जदाराने New Password व Confirm Password च्या बॉक्स मध्ये लक्षात राहील असा पासवर्ड टाकावा. पासवर्ड ची अक्षर मर्यादा हि ८-१५ ठेवावी व पासवर्ड मध्ये एक कॅपिटल वर्ण, एक लहान वर्ण, एक संख्या आणि एक विशेष वर्ण असणे देखील गरजेचे आहे (उदा. Pass@1234 / Yourname@BirthDate)
- त्यानंतर अर्जदाराने आपली जन्मतारीख DD/MM/YYYY स्वरुपात नमूद करावी

- त्यानंतर अर्जदारास काही प्रश्नांची उत्तरे नमूद करावी लागतात ज्याचा वापर आपण भविष्यात जर पासवर्ड विसरला तर तो रिकव्हर करण्यासाठी होऊ शकतो
- सदर प्रश्नांमध्ये अर्जदारास आपले लहानपणीचे टोपण नाव, लहानपणीचा मित्र / मैत्रीण चे नाव, अर्जदाराचा रक्तगट, अर्जदाराचे १२ वी उत्तीर्ण वर्ष, शाळेतील आवडत्या शिक्षकाचे नाव, व आवडता खेळाडू अश्या प्रकारचे सोपे प्रश्न विचारले आहे, अर्जदाराने काळजीपूर्वक व लक्षात राहतील असे उत्तरे नमूद करावे
- वरीलप्रकारे सर्व माहिती भरून झाल्यानंतर कॅप्चा (CAPTCHA) कोड टाकावा व Register या पर्यायावर क्लिक करावे.
- Register ह्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपली नोंदणी ची प्रक्रिया पूर्ण होते.

- नोंदणी पक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जदाराने आपल्या संगणकावर https://mpsconline.gov.in/candidate/login हे संकेतस्थळ उघडावे. ह्या संकेतस्थळावर आपणास Registered Email Id or Mobile Number व पासवर्ड असे दोन पर्याय दिसतील, अर्जदाराने नोंदणी करतांना वापरलेला Email Id किंवा Mobile Number नमूद करून Login या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर कॅप्चा (CAPTCHA) कोड टाकावा व Proceed या पर्यायावर क्लिक करावे. अश्या प्रकारे आपण आपल्या MPSC च्या खात्यात लॉग इन करता.

- लॉग इन ची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जदारास ६ पर्याय दिसतात. Home (मुख्यपृष्ठ), Profile Creation (प्रोफाईल तयार करणे), Online Application (ऑनलाइन अर्ज), My Account (माझे खाते), Correspondence (पत्रव्यवहार), Logout (लॉग आउट). यामध्ये सर्वप्रथम अर्जदाराने Profile Creation या पर्यायावर क्लिक करावे.
- Profile Creation या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपणास MPSC च्या खात्या मध्ये आपली माहिती नमूद करण्यास सुरवात करतो, माहिती कश्या प्रकारे भरायची हे आपण पुढील स्टेप्स द्वारे समजू घेऊ.
- सर्वप्रथम Aadhar Details ह्या सेक्शन मध्ये आपल्याकडे आधार कार्ड आहे का याची विचारणा केली जाते जर अज्दाराकडे आधार कार्ड असेल तर Yes हा पर्याय निवडावा जर आधार कार्ड नसेल तर No हा पर्याय निवडावा. जर आपल्याकडे आधार कार्ड उपलब्ध असेल तर Yes हा पर्याय निवडणे बंधनकारक आहे. No हा पर्याय निवडल्यास अर्जदारास MPSC कार्यालय मुंबई येथे समक्ष उपस्थित राहून आपले KYC व्हेरिफिकेशन करावे लागेल. Yes हा पर्याय निवडल्यानंतर अर्जदाराने आपला आधार कार्ड क्रमांक व आधार कार्ड वरील नावाप्रमाणे नाव नमूद करावे.
- Personal Details: वैयक्तिक माहिती मध्ये अर्जदाराने आपले नाव आडनाव, नाव व मधले नाव या क्रमानुसार सादर करावे त्यानंतर संपूर्ण नाव आपल्या उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या गुणपत्रिकेनुसार आधी इंग्लिश मध्ये व नंतर मराठी मध्ये नमूद करावे, मराठी मध्ये नाव नमूद करण्यासाठी अजर्दाराने नाव इंग्लिश मध्येच टाईप करावे ते मराठी मध्ये रुपांतरीत होईल.
- Mother’s Name: त्यानंतर अर्जदाराने आपल्या आईचे नाव नमूद करावे
- Date Of Birth / Mobile Number / Email ID: अर्जदाराने नोंदणी करतांना आपली जन्मतारीख मोबाईल क्रमांक व इमेल आयडी आधीच नमूद केलेली आहे तीच इथे कायम दिसेल त्यात कोणताही बदल करता येणार नाही.
- Gender: त्यानंतर अर्जदाराने आपले लिंग निवडावे.
- Marital Status: अर्जदाराने आपल्या वैवाहिक स्थिती बद्दल योग्य तो पर्याय निवडावा.
- Nationality: अर्जदाराने आपले राष्ट्रीयत्व निवडावे
- Mother Tongue: त्यानंतर अर्जदाराने आपली मातृभाषा निवडावी
- Whether your name is changed/updated after 10th or equivalent qualification or after marriage: अर्जदाराने लग्नानंतर किंवा १० वी नंतर आपल्या नावात बदल केला असल्यास Yes हा पर्याय निवडावा व कोणताही बदल नसल्यास No हा पर्याय निवडावा. जर आपल्या नावात बदल असेल तर Yes हा पर्याय निवडल्यानंतर Full Name in English only असा नवीन पर्याय उपलब्ध होईल त्या रकान्यात अर्जदाराने आपले नवीन नाव फक्त इंग्लिश मध्ये नमूद करावे.
- त्यानंतर Can you read, write and speak Marathi? असा प्रश दिसेल त्या ठिकाणी अर्जदाराने Yes किंवा No मध्ये आपले उत्तर नोंदवावे.

- Physical Measurement : या ठिकाणी अर्जदाराने आपल्या शारीरिक मोजमाप संबंधी माहिती नमूद करायची आहे, जसे अर्जदाराची उंची सेंटीमीटर मध्ये व अर्जदाराचे वजन किलोग्रॅम मध्ये.
- Caste / Category Details: या ठिकाणी अर्जदाराने आपली कॅटेगरी निवडावी.
- जर उमेदवार खुउल्या प्रवर्गातील असेल तर त्यास कोणतीही अधिकची माहिती देण्याची गरज नाही.
- जर उमेदवार राखीव प्रवर्गातील असेल तर तर त्यास
- Caste Certificate No: येथे अर्जदाराने आपल्या जातीच्या दाखल्याप्रमाने जात प्रमाणपत्र क्रमांक नमूद करावा.
- Issuing District: या ठिकाणी अर्जदाराने आपले जात प्रमाणपत्र कोणत्या जिल्ह्यातून मिळवले आहे ते नमूद करावे.
- Issuing Date: या ठिकाणी अर्जदाराने आपले जात प्रमाणपत्र कोणत्या तारखेस निर्गमित केले आहे ती तारीख नमूद करावी.
- Do you have Caste Validity Certificate?: या ठिकाणी जर अर्जदाराने आपल्या जात प्रमाणपत्राची पडताळणी पूर्ण केली असेल तर Yes हा पर्याय निवडावा व आपल्या जात पडताळणीचा प्रमाणपत्र क्रमांक व जात पडताळणी प्रमाणपत्र निर्गमित केल्याचा दिनांक नमूद करावा जर पडताळणी नसेल केली तर No हा पर्याय निवडावा.
- Persons with Benchmark Disabilities Details: अर्जदार जर दिव्यांग / अपंग असेल तर Yes हा पर्याय निवडून आपल्या दिव्यांग प्रमाणपत्रा नुसार माहिती अचूकपणे नमूद करावी.
- Sports Details: अर्जदार जर गुणवत्ता धारक खेळाडू असेल तर Yes हा पर्याय निवडून आपल्या गुणवत्ता प्रमाणपत्रानुसार माहिती अचूकपणे नमूद करावी.
- Ex-serviceman: अर्जदार जर माझी खेळाडू असेल असेल तर Yes हा पर्याय निवडून आपल्या सेवेनंतर प्राप्त प्रमाणपत्रानुसार माहिती अचूकपणे नमूद करावी.

- Government of Maharashtra Employee Details: जर उमेदवार सध्या महाराष्ट्र शासन, बृहन्मुंबई महानगरपालिका किंवा बेस्ट मध्ये कार्यरत असेल तर Yes हा पर्याय निवडावा व योग्य ती माहिती नमूद करावी.
- Domicile Details: या ठिकाणी अर्जदाराकडे महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणार Domicile Certificate (अधिवास प्रमाणपत्र) असेल तर Yes हा पर्याय निवडावा व प्रमाणपत्रा संबंधी सर्व माहिती अचूक नमूद करावी, जर अर्जदाराकडे अधिवास प्रमाणपत्र) उपलब्ध नसेल तर अर्जदारास खुल्या वर्गातील अर्जदार मानले जाईल, अर्जदारास आपल्या जातीचा आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही.
- Additional Reservation: अर्जदार जर प्रकल्प ग्रस्थ, भूकंप ग्रस्थ, किंवा अंशकालीन उमेदवार असेल तर Is Additional Reservation? या प्रश्नासमोर Yes हा पर्याय निवडावा व आपल्या अतिरिक्त आरक्षणासंबंधी योग्य ती माहिती नमूद करावी
- Orphan Details: जर अर्जदार अनाथ असेल व अनाथ आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छित असेल तर Do you want to take advantage for Orphan reservation? या प्रश्नासमोर Yes हा पर्याय निवडावा व योग्य ती माहिती नमूद करावी

- अश्या प्रकारे सर्व माहितिनी नमूद करून झाल्यानंतर Save या पर्यायावर क्लिक करावे व Step 2 Address Information या पुढील सेक्शन मधील माहिती भरण्यास सुरवात करावी
- Permanent Address: या ठिकाणी अर्जदाराने आपला मुल पत्ता नमूद करावा व अर्जदारास मूळ पत्ता हाच पत्रव्यवहाराचा पत्ता म्हणून पाहिजे असेल तर Same as Above या पर्यायावर क्लिक करावे व Save या पर्यायावर क्लिक करावे व Step 3 Other Information या पुढील सेक्शन मधील माहिती भरण्यास सुरवात करावी

- या सेक्शन मध्ये अर्जदारावर पोलीस स्टेशन मध्ये काही गुन्हा दाखल आहे का? कोर्टाद्वारे किंवा शासनाद्वारे अर्जदारावर काही दंडात्मक कार्यवाही करण्यात आलेली आहे का? अर्जदारावर न्यायालयात काही खटला अनिर्णयीत आहे का? या पूर्वी अर्जदारावर MPSC किंवा इतर आयोगातर्फे काही कार्यवाही करण्यात आलेली आहे का या संबंधी प्रश्न विचारण्यात आलेले आहे. अर्जदाराने योग्य ती महिती नमूद करावी
- त्यानंतर Particulars of Prizes, Medals, Scholarships etc. या ठिकाणी अर्जदारास खेळ, NCC, साहसी खेळ, शालेय किंवा महाविद्यालयीन स्तरावरील स्पर्धा किंवा इतर काही उपक्रमांमध्ये मेडल, बक्षीस, शिष्यवृत्ती किबा बक्षीस मिळाले असल्यास नमूद करावे.
- Save या पर्यायावर क्लिक करावे व Step 4 Qualification Information या पुढील सेक्शन मधील माहिती भरण्यास सुरवात करावी.

- Qualification Information या सेक्शन मधील माहिती काळजीपूर्वक भरणे आवश्यक आहे, शैक्षणिक तपशील मध्ये अर्जदारास Below SSC/10th, SSC, HSC, Diploma, Graduate, PG Diploma, Post Graduation, M.Phil., NET/SLET/SET, Publications, Fellowship, Certifications, YCMOU, NIOS, Associate, Member, Ph.D. Guide, Other, Membership अश्या विविध प्रकारचे शैक्षणिक तपशील नमूद करता येतात. लक्षात घ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अनेक पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाते. प्रत्येक पदाची शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असू शकते त्यामुळे अर्जदाराने आपली सर्व शैक्षणिक पात्रता नमूद करून ठेवावी.
- सर्वप्रथम अर्जदाराने SSC म्हणजे माध्यमिक शालांत परीक्षेचे तपशील नमूद करावे यामध्ये
- Qualification Type: यामध्ये अर्जदाराने SSC अस सिलेक्ट करावे.
- Name of Qualification: या ठिकाणी अर्जदाराने परत SSC सिलेक्ट करावे.
- Subject / Stream / Branch: SSC ला हा पर्याय लागू होत नाही.
- State: या ठिकाणी अर्जदाराने आपण ज्या राज्यातून SSC ची परीक्षा उत्तीर्ण केली आहे ते राज्य निवडावे.
- Board / University: या ठिकाणी अर्जदाराने आपला SSC परीक्षेचा बोर्ड निवडावा.
- Qualification Status: या ठिकाणी अर्जदाराने SSC परीक्षा उत्तीर्ण आहे किंवा निकाल बाकी आहे ते निवडावे.
- Date of qualification completion: या ठिकाणी अर्जदाराने आपल्या SSC च्या प्रमाणपत्रानुसार निकालाची तारीख नमूद करावी.
- Attempts: या ठिकाणी अर्जदाराने SSC परीक्षा किती प्रयत्नात उत्तीर्ण केली आहे, त्या प्रयत्नांची संख्या नमूद करावी.
- Percentage / CGPA : या ठिकाणी अर्जदाराने आपल्याला SSC परीक्षेत प्राप्त टक्केवारी नमूद करावी
- Number of academic months : या ठिकाणी अर्जदाराने SSC कोर्स किती कालावधीचा चा होते ते महिन्यांमध्ये नमूद करावे.
- Class / Grade: या ठिकाणी अर्जदाराने आपल्याला SSC परीक्षेत प्राप्त ग्रेड किंवा क्लास नमूद करावा
- Mode: या ठिकाणी अर्जदाराने आपले SSC चे शिक्षण नियमितपणे पूर्ण केले आहे कि मुक्त विद्यापीठ तर्फे पूर्ण केले आहे ते नमूद करावे.
- अश्याच प्रकारे अर्जदाराने जे जे शिक्षण पूर्ण केले आहे ते सर्व नमूद करावे

- Experience Information : या सेक्शन मध्ये अर्जदाराने आपल्या अनुभवाची माहिती नमूद करावी, ज्या पदांसाठी अनुभवाची पात्रता निकडीची आहे अश्या पदांसाठी या सेक्शन मध्ये माहिती नमूद करणे गरजेचे आहे.
- Upload Photo / Signature : या सेक्शन मध्ये अर्जदाराने आपला अलीकडच्या काळातील पासपोर्ट आकाराचा फोटो व स्वाक्षरी स्कॅन करून उपलोड करावी.
- अश्या प्रकारे आपले MPSC ची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होते.
हेल्पलाईन नं व संपर्क क्रमांक
- संपर्क क्रमांक
- 7303821822 / 02269123914
- इमेल आयडी
- support-online@mpsc.gov.in
- संपर्काची वेळ
- Monday to Friday 9:00 AM to 8:00 PM ,
Saturday & Sunday : 9:30 AM to 6:30 PM
- Monday to Friday 9:00 AM to 8:00 PM ,
नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
- महाराष्ट्र लोकसेवा (MPSC) मार्फत परीक्षांचे आयोजन कधी केले जाते ?
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दरवर्षी आयोजित होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://mpsc.gov.in) वर प्रसिद्ध केले जाते. अर्जदाराने वेळापत्रक बघण्यासाठी अधिकृत संकेतस्थळास भेट देऊन CANDIDATE INFORMATION या लिंक वर क्लिक करून SCHEDULE मध्ये Tentative Schedule of Competitive Examinations वर क्लिक करून बघू शकता. या ठिकाणी आपणास परीक्षेचे नाव परीक्षेचा दिनांक व निकालाचा अंदाजित महिना या स्वरुपात माहिती बघावयास मिळते.
- अर्जदार पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षात प्रविष्ठ आहे तर तो आयोगाच्या परीक्षेस पात्र ठरतो का?
- हो, पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षात प्रविष्ठ असलेले विद्यार्थी आयोगाच्या पूर्व परीक्षा देण्यास पात्र ठरतात, परंतु मुख्य परीक्षेचा अर्ज सादर करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत अर्जदाराने अंतिम वर्षाचा निकाल उत्तीर्ण असणे गरजेचे आहे
- MPSC चा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक किंवा इमेल आयडी बदलता येतो का ?
- हो. अर्जदारास जर आपल्या मोबाईल क्रमांक किंवा इमेल आयडी मध्ये बदल करायचा असल्यास https://mpsconline.gov.in/candidate या संकेत्स्थालास भेट देऊ Forgot/Reset Email-ID and Mobile Number या पर्यायावर क्लिक करावे, त्यानंतर आपणास मोबाईल क्रमांक किंवा इमेल आयडी यापैकी जो बदल करायचा आहे ते सिलेक्ट करावे, त्यानंतर इमेल आयडी बदल करावयाचा असल्यास जुना इमेल आयडी व मोबाईल क्रमांकात बदल करायचा असल्यास जुना मोबाईल क्रमांक नमूद करावा, त्यानंतर अर्जदाराचे प्रथम नाव, मधले नाव व जन्म तारीख नमूद करावी व Verify या पर्यायावर क्लिक करावे त्यानंतर प्राप्त ६ अंकी OTP नमूद करून Submit या पर्यायावर क्लिक करावे आपल्यास हव्या त्या बदलाची प्रक्रिया पूर्ण होईल.
- महाराष्ट्र लोकसेवा (MPSC) मार्फत परीक्षांचे निकाल कधी जाहीर होतात?
- सर्वसाधारणपणे परीक्षा झाल्यानंतर ३ ते ४ महिन्यांच्या कालावधीत निकाल जाहीर होतात,