नवीन मतदार नोंदणी कशी करावी | New Voter Registration Process

जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताकडे बघितले जाते आणि भारतासारख्या लोकशाही प्रधान देशात निवडणूक हा एक सण / उत्सव मानला जातो ज्यात भारतातील नागरिक आपल्या मतदानाचा अधिकार वापरून निवडणूक प्रक्रियेद्वारे सरकार ची नेमणूक करते, परंतु या सण / उत्सवात सहभागी होण्यासाठी आपण फक्त १८ वर्षीय भारतीय नागरिक असणे पुरेसे नाही. तर त्यासाठी लागते ओळख भारताचा मतदार असल्याची ओळख आणि हि ओळख मिळविण्यासाठी आपण निवडणूक आयोगाच्या मतदार यादीत एक मतदार म्हणून नोंदणी करणे गरजेचे आहे, हि नोंदणी केल्यानंतर आपणास मतदार ओळख पत्र मिळते जे आपणास एक मतदार असल्याचा दाखला मिळवून देतो. ह्या पोस्टद्वारे आपण  नवीन मतदार नोंदणी कशी करावी याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

मतदार नोंदणी म्हणजे काय ?

भारत हा लोकशाही प्रधान देश आहे म्हणजे भारतात सरकार हे लोकांच्या मतदानामुळे बनते. आपल्या प्रभागाच्या, प्रदेशाचा, जिल्ह्याचा, राज्याचा व देशाच्या विकासाठी योग्य उमेदवार निवडणे हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा हक्क आहे. मतदान करण्यासाठी फक्त भारतीय नागरिक असणे किंवा वयाची १८ वर्षे पूर्ण असणे गरजेचे नाही आहे. तर नागरिकाचे नाव हे मतदार यादीमध्ये समाविष्ठ असले पाहिजे व त्याकडे मतदान ओळखपत्र असणे देखील गरजेचे आहे. मतदार नोंदणी म्हणजे भारतीय निवडणूक आयोगाला सांगणे कि आपले वयाचे १८ वर्षे  पूर्ण झाली असून आपण ज्या भागात वास्तव्यास आहात त्या मतदार  संघात आपल्याला एक मतदार म्हणून अधिकार मिळवून द्यावा व मतदार संघातील मतदार यादीमध्ये आले नाव समाविष्ठ करून घेण्यात यावे.

मतदार नोंदणी करण्यासाठी पात्रता

मतदार नोंदणी करण्यासाठी पात्र पुढीलप्रमाणे आहे

  1. व्यक्ती भारतीय नागरिक असावा.
  2. व्यक्तीचे वय १८ वर्षे पूर्ण असावे.
  3. व्यक्ती ज्या मतदान मतदारसंघात मतदार नोंदणी करण्यास इच्छुक आहे तो त्या मतदारसंघाचा रहिवासी असला पाहिजे.

मतदार नोंदणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे.

  • जन्म तारखेचा पुरावा
    • जन्माचा दाखला (Birth Certificate) : स्थानिक स्वराज्य संस्था (नगरपालिका/महानगरपालिका/ग्रामपंचायत) किंवा जन्म-मृत्यू निबंधक यांनी दिलेला जन्माचा दाखला.
    • आधार कार्ड (UIDAI)
    • पॅन कार्ड (PAN Card)
    • चालक परवाना / ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License)
    • सीबीएससी (CBSE), आयसीएसई (ICSE) किंवा राज्य शिक्षण मंडळाने दिलेले १० वी किंवा १२ वीचे प्रमाणपत्र (ज्यामध्ये जन्मतारखेचा उल्लेख असेल) (Class X or Class XII Certificates)
    • भारतीय पासपोर्ट (Indian Passport)
  • पत्याचा पुरावा
    • पाणी, वीज किंवा गॅस कनेक्शनचे बिल (किमान १ वर्ष जुने) (Water/Electricity/Gas connection Bill)
    • आधार कार्ड (Aadhaar Card)
    • राष्ट्रीयीकृत/शेड्युल्ड बँक किंवा पोस्ट ऑफिसचे चालू पासबुक. (Current passbook of Nationalized/Scheduled Bank/Past Office)
    • भारतीय पासपोर्ट (Indian Passport)
    • महसूल विभागाचा जमिनीचा मालकी हक्काचा दाखला (Revenue Departments Land Owning records)
    • जर तुम्ही भाडेकरू असाल, तर नोंदणीकृत भाडेकरार किंवा लीज डीड (Registered Rent Lease Deed (ln case of tenant))
    • जर तुमचे स्वतःचे घर असेल, तर नोंदणीकृत खरेदीखत (Registered Sale Deed (ln case of own house))
  • दिव्यांगत्व प्रमाणपत्र (अर्जदारदिव्यांग असल्यास)
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

मतदार ओळखपत्राचे फायदे.

मतदार ओळखपत्राचा मुख्य उद्देश मतदाराची ओळख पटवून त्यास मतदानाचा अधिकार देणे हा जरी असला तरी मतदार ओळखपत्राचे इतर अनेक ठिकाणी उपयोग होतो,

मतदार ओळख पत्रावर मतदाराचा फोटो, नाव, पत्ता, व जन्मतारीख अशी माहिती असल्यामुळे इतर कागदपत्रांसाठी अर्ज करतांना एक ओळख पत्र म्हणून मतदार ओळखपत्राचा उपयोग होतो.

उदा.

  • चालक परवाना / ड्रायव्हिंग लायसन्स काढतांना.
  • नवीन आधार कार्ड किंवा आधार वरील दुरुस्ती साठी.
  • बँक खाते उघडण्यासाठी.
  • नोकर भरतीचे अर्ज करतांना ओळख पुरावा म्हणून.
  • पासपोर्ट साठी अर्ज करतांना.
  • नवीन पॅन कार्ड काढतांना जन्म तारखेचा पुरावा म्हणून. ई.

 

ऑनलाईन मतदार नोंदणी प्रक्रिया.

नवीन मतदार नोंदणी करण्यासाठी भारत सरकार च्या निवडणूक आयोगातर्फे नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन उपलब्ध करून दिलेली आहे या सेक्शन मध्ये आपण नवीन मतदार नोंदणी कशी करायची या संबंधी माहिती घेऊ

  • सर्वप्रथम अर्जदाराने आपल्या संगणकावर https://voters.eci.gov.in/ हे संकेतस्थळ उघडावे. संकेतस्थळावर उजव्या बाजूस Sign Up ह्या पर्यायावर क्लिक करावे.

  • Sign Up ह्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर संकेतस्थळावर खाते तयार करण्यासाठी मोबाईल क्रमांक व इ-मेल आयडी नमूद करावा लागेल, दिलेल्या जागी आपला मोबाईल क्रमांक व इ-मेल आयडी अचूकपणे नमूद करावा त्याच प्रमाणे कॅप्चा (CAPTCHA) कोड टाकावा व Continue या पर्यायावर क्लिक करावे.

  • पुढील पेज वर अर्जदारास आपले नाव व आडनाव अचूकपणे टाकून Send OTP या पर्यायावर क्लिक करावे. अर्जदारास त्याच्या मोबाईल क्रमांकावर ६ अंकी OTP प्राप्त होईल, अचूक OTP नमूद केल्यानंतर Verify या पर्यायावर क्लिक करावे. अर्जदाराचा मोबाईल क्रमांक व्हेरीफाय झाल्यानंतर संकेतस्थळावर खाते बनविण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.

  • त्यानंतर अर्जदाराने आपल्या संगणकावर https://voters.eci.gov.in/ हे संकेतस्थळ उघडावे. व Login या पर्यायावर क्लिक करून अर्जदाराने आपला मोबाईल क्रमांक आणि कॅप्चा (CAPTCHA) कोड नमूद करावा व Request OTP या पर्यायावर क्लिक करावे. अर्जदारास मोबाईल क्रमांकावर ६ अंकी OTP प्राप्त होईल, अचूक OTP नमूद करून Login ची प्रक्रिया पूर्ण करून घेणे.

  • Login ची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर डाव्या बाजूस गुलाबी रंगाच्या चौकटी मध्ये New Voter Registration (Form No 6) हा पर्याय दिसेल, नवीन मतदार नोंदणी करण्यासाठी Fill Form No 6 या पर्यायावर क्लिक करावे.

  • Fill Form No 6 या पर्यायावर क्लिक केल्यानंतर नवीन मतदार नोंदणी अर्ज दिसेल, नोंदणी अर्ज पूर्ण करण्यासाठी पुढील १२ पायऱ्या (स्टेप्स) पूर्ण करणे गरजेचे आहे.
    • राज्य, जिल्हा आणि मतदारसंघ निवडा (Select State, District & AC)
      • सर्वप्रथम अर्जदाराने आपले राज्य निवडावे
      • त्यानंतर अर्जदाराने आपला जिल्हा निवडावा
      • त्यानंतर अर्जदारास ज्या मतदार संघातून मतदानाचा हक्क पाहिजे आहे ते मतदार संघ निवडावे
      • वरील प्रकारे सर्व माहिती नमूद केल्यानंतर Next या पर्यायावर क्लिक करावे

  • वैयक्तिक तपशील (Personal Details)
    • First Name followed by Middle Name : या ठिकाणी अर्जदाराने आपल्या आधार कार्ड नुसार आपले पहिले नाव व मधले नाव नमूद करावे (उदा. जर आपल्या आधार कार्ड वर नाव आत्माराम तुकाराम भिडे असे असेल तर या रकान्यात आत्माराम तुकाराम एवढे नमूद करावे)
    • Surname (if any) : या ठिकाणी अर्जदाराने आपल्या आधार कार्ड नुसार आडनाव  नमूद करावे (उदा. जर आपल्या आधार कार्ड वर नाव आत्माराम तुकाराम भिडे असे असेल तर या रकान्यात भिडे एवढे नमूद करावे)
    • Upload Photograph : या ठिकाणी अर्जदाराने आपला नजीकच्या काळात काढलेला स्पष्ट व स्कॅन केलेला पासपोर्ट आकाराचा फोटो उपलोड करावा. लक्षात घ्या कि फोटोचा आकार 2MB पेक्षा जास्त नको.

  • नातेवाईकांचा तपशील (Relatives Details)
    • नातेवाईकांचा तपशील मध्ये आपण वडील, आई, पती, पत्नी किंवा कायदेशीर पालक यांची माहिती नमूद करू शकतो .
    • Name : या ठिकाणी आपल्या नातेवाईकाचे प्रथम नाव नमूद करावे.
    • Surname : या ठिकाणी अर्जदाराने आपले आडनाव नमूद करावे.

  • संपर्क तपशील (Contact Details)
    • Mobile Number : अर्जदाराने आपला मोबाईल क्रमांक नमूद करावा. भविष्यात आपले मतदान कार्ड दिगीतल स्वरुपात डाऊनलोड करतांना ह्याच मोबाईलवर OTP प्राप्त होईल त्यामुळे अर्जदाराने आपला कायमस्वरूपी मोबाईल क्रमांक देणे अपेक्षित आहे.
    • Email Id : अर्जदाराने आपला कायमस्वरूपी इ-मेल आयडी नमूद करावा.

  • आधार तपशील (Aadhaar Details)
    • या ठिकाणी अर्जदाराने आपला आधार कार्ड क्रमांक नमूद करणे गरजेचे आहे.
    • या ठिकाणी आधार कार्ड नाही आहे त्यामुळे नमूद करू शकत नाही असा देखील पर्याय उपलब्ध आहे अश्या परिस्थितीत आपण आधार कार्ड बनवून घ्यावे व नंतरच मतदान कार्ड साठी अर्ज करावा असे आम्ही सुचवितो.

  • लिंग (Gender)
    • अर्जदाराने आपले लिंग काळजीपूर्वक नमूद करावे

  • जन्मतारखेचा तपशील (Date of Birth details)
    • Date of Birth: अर्जदाराने आपली जन्मतारीख अचूक नमूद करावी
    • Self-attested copy of document supporting age proof attached: या ठिकाणी जन्मतारखेचा पुरावा म्हणून अर्जदार कोणते कागदपत्रे सादर करणार आहे ते निवडावे व आपण निवडलेल्या कागदपत्राची स्पष्ठ स्कॅन केलेली प्रत अपलोड करावी

  • सध्याच्या पत्त्याचा तपशील (Present Address Details)
    • Present Ordinary Residence : या ठिकाणी अर्जदाराने आपला पूर्ण पत्ता नमूद करावा, आपण नमूद केलेला पत्ता हा आपण पत्त्याच्या पुराव्याशी जुळतो आहे कि नाही याची खात्री करून घ्यावी.
    • Document for Proof of Residence : या ठिकाणी अर्जदाराने पत्त्याच्या पुराव्यासाठी आपण जे कागदपत्र अपलोड करणार आहात ते लिस्ट मधून सिलेक्ट करून घ्यावे व आपण निवडलेल्या कागदपत्राची स्पष्ठ स्कॅन केलेली प्रत अपलोड करावी

  • अपंगत्वाचा तपशील (Disability Details)
    • अर्जदार दिव्यांग / अपंग असल्यास त्या संदर्भात अचूक माहिती नमूद करून अपंगत्वाचा दाखला अपलोड करावा
  • कुटुंबातील सदस्याचा तपशील (Family member Details)
    • या ठिकाणी अर्जदार ज्या पत्त्यावर राहत आहे त्याच पत्त्यावर अर्जदाराच्या नातेवाईकाची आधीच मतदार म्हणून नोंदणी झालेली असेल तर त्या नातेवाईकाचे नाव, नातेसंबंध व नातेवाईकाचा मतदान कार्ड क्रमांक नमूद करावा

  • घोषणापत्र (Declaration)
    • घोषणापत्र मध्ये अर्जदाराने आपल्या गावाचे / शहराचे नाव, राज्य व जिल्हा नमूद करावा,
    • अर्जदार अर्जात नमूद केलेल्या पत्त्यावर कधीपासून राहत आहे ती तारीख नमूद करावी
    • अर्जदार अर्ज करीत असलेल्या गावाचे / शहराचे नाव नमूद करावे
  • कॅप्चा (Captcha)
    • संपूर्ण अर्ज भरून झाल्यानंतर कॅप्चा (CAPTCHA) कोड नमूद करावा व Send OTP या पर्यायावर क्लिक करावे. अर्जदारास त्याच्या मोबाईल क्रमांकावर ६ अंकी OTP प्राप्त होईल, अचूक OTP नमूद केल्यानंतर Preview and Submit ह्या पर्यायावर क्लिक करावे

  • Preview and Submit ह्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपणास आपण भरलेल्या अर्जाची प्रत दिसेल आपण भरलेली सर्व माहिती बरोबर आहे कि नाही याची खात्री करून घ्या व e-Sign & Submit वर क्लिक करा
  • व e-Sign & Submit वर क्लिक केल्यानंतर आपला अर्ज आधार व्हेरिफिकेशन साठी आधार कार्ड च्या सर्वर ला कनेक्ट होईल आपल्या आधार ला लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर ६ अंकी OTP प्राप्त होईल. आधार चे व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर आपणास Reference Number प्राप्त होईल तो आपण सांभाळून ठेवा
  • अश्या प्रकारे आपली मतदार नोंदणी ची प्रकिया पूर्ण झाली.

 

अर्ज स्थिती जाणून घेणे

नवीन मतदार नोंदणीसाठी अर्ज केल्यानंतर अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी आपल्या संगणकावर https://voters.eci.gov.in/home/track हि लिंक उघडा व आपला Reference Number नमूद करून सबमिट करा आपला अर्ज मंजूर झाला आहे किंवा सध्या अर्जाची स्थिती काय आहे हे आपणास कळू शकते. व जर आपले मतदार कार्ड तयार झाले असेल तर आपला मतदार कार्ड क्रमांक आपणास दिसेल

 

ई-मतदार कार्ड डाऊनलोड करणे

जर आपले मतदार कार्ड तयार झाले आहे व आपल्याकडे आपला मतदार कार्ड क्रमांक आहे तर आपण आपल्या कार्ड ची डिजिटल प्रत डाउनलोड करू शकता त्यासाठी आपल्या संगणकावर https://voters.eci.gov.in/home/e-epic-download हि लिंक उघडा या ठिकाणी आपण आपला मतदार कार्ड क्रमांक किंवा अर्जाचा Reference Number टाकून व आपले राज्य नमूद करून आपले डिजिटल मतदान कार्ड डाऊनलोड करू शकता.

 

मतदार यादीमध्ये नाव शोधणे

मतदार यादी मध्ये आपले नाव शोधण्यासाठी आपल्या संगणकावर https://electoralsearch.eci.gov.in/uesfmempmlkypo हे संकेतस्थळ उघडावे या ठिकाणी आपण आपल्या मतदार कार्ड क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक टाकून आपले नाव मतदार यादी मध्ये शोधू शकता जर आपला मोबाईल क्रमांक आपल्या मतदार कार्ड ला लिंक नसेल व आपल्याकडे आपला मतदार कार्ड क्रमांक देखील नसेल तर आपण Search by Details या पर्यायाचा वापर करून आपले नाव, जन्मतारीख, लिंग, जिल्हा, Constituency नमूद करून आपले नाव मतदार यादीमध्ये शोधू शकता

नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

  • मतदार यादीमध्ये नाव प्रविष्ठ करण्यासाठी वयाची मर्यादा किती?
    • मतदार यादी मध्ये नाव प्रविष्ठ करण्यासाठी कमीत कमी वयोमर्यादा १८ वर्षे आहे.
  • मतदान ओळख वरील माहिती चुकीची आहे ?
    • आपल्या मतदान ओळख पत्रावरील चुकीची माहिती आपण ऑनलाईन अर्जाद्वारे दुरुस्त करू शकता.
  • माझे मतदान ओळखपत्र हरवले आहे. नवीन ओळख पत्र कसे मिळवावे?
    • आपले मतदान पत्र हरवले असल्यास आपण आपल्या मतदान ओळख पत्रावरील माहितीत कोणताही बदल न करता ऑनलाईन अर्जाद्वारे मोफत पोस्टाद्वारे घरपोहोच मागवू शकता.
  • मतदान पत्रावरील कोणकोणत्या माहितीत आपण बदल करू शकता?
    • नावात बदल करणे
    • लिंगात बदल करणे
    • जन्मतारखेत बदल करणे
    • मतदान पत्रावरील नातेवाईकांच्या तपशिलात बदल करणे (वडिलांच्या नवेइवजि पतीचे नाव लावणे)
    • पत्त्यात बदल करणे
    • मोबाईल क्रमांक लिंक करणे किंवा अपडेट करणे
    • ई-मेल आयडी लिंक करणे किंवा अपडेट करणे
    • मतदान पत्रावरील छायाचित्र बदलणे
    • मतदान कार्ड – आधार कार्ड लिंक करणे
  • आपले नाव मतदार यादीत आहे कि नाही के कसे तपासावे?
    • निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर आपण आली माहिती नमूद करून तसेच निवडणूक आयोगाच्या अधिकृत ECINet App ह्या मोबाईल अँप द्वारे देखील आपण आपले  नाव मतदान यादी मध्ये तपासू शकता.
  • मतदान यादी मध्ये एकापेक्षा जास्त वेळेस नाव दिसत असल्यास काय करावे?
    • आपले नाव मतदार याधी एका पेक्षा जास्त वेळेस दिसत आहे किंवा आपल्या मतदार संघा व्यतिरिक्त अजून दुसऱ्या मतदार संघात आपले नाव आहे तर आपल्याला जे नाव नको आहे त्याच्या तपशिलासह Form 7 हा अर्ज करून आपण ते नाव कमी करून घेऊ शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Index