अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी | Schedule Tribe Caste Validity

Table of Content

महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागातर्फे महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांच्या विकासासाठी अनेक योजना राबविल्या जातात. अलीकडच्या काळात आदिवासी विकास विभागातर्फे नागरिकांच्या सोईसाठी व पारदर्शकतेसाठी अनेक योजनांचे डिजिटल रुपांतर केले असून त्यातील एक अत्यंत महत्वाची सुविधा म्हणजे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी (Schedule Tribe Caste Validity)

अनुसूचित जमाती म्हणजे काय ?

महाराष्ट्र राज्यातील नागरिकांचे त्यांच्या पूर्वपार चालत आलेय रूढी परंपरेनुसार वेगवेगळ्या जाती जमातीमध्ये विभाजन करण्यात आलेले आहे. त्यापैकी जे आदी काळापासून ह्या भूमीवर वास्तव्यास आहे, ज्यांची संस्कृती, रूढी, परंपरा, सन-उत्सव हे मूळ प्रवाहापासून वेगळे किंवा पुरातन आहे अश्या लोकांना आदिवासी म्हणून संबोधले जाते. व भारतीय घटनेनुसार आदिवासींची गणना हि अनुसूचित जमाती (Schedule Tribe) मध्ये करण्यात येते.

अनुसूचित जमाती प्रमाणपत्र म्हणजे काय ?

महाराष्ट्र राज्यातील नागरिकांचे भारतीय कायद्यानुसार अनेक वेगवेगळ्या जाती जमातीमध्ये विभागणी केलेली दिसते (उदा. खुला प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास वर्ग, आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्ग. व जाती जमातीनुसार महाराष्ट्र शासनाने शासकीय विभाग तयार केले असून जे त्या त्या संबंधित विभागांतर्गत येणाऱ्या जाती जमातींच्या विकासासाठी विविध योजना राबवून कार्य करत असतात.

महाराष्ट्रातील अनुसूचित जमाती (Schedule Tribe) या जमातीच्या विकासकामांची जबाबदारी हि महाराष्ट्र सरकारच्या आदिवासी विकास विभागाकडे आहे. महाराष्ट्रातील अनुसूचित जमाती कुटुंबात जन्म घेणाऱ्या व्यक्तीस आदिवासी म्हणून ओळखले जाते व त्याची हि ओळख सिद्ध करण्यासाठी कुटुंबातील वडिलधाऱ्या व्यक्तींच्या जातीच्या दाखल्याच्या पुराव्यांनुसार सदर व्यक्तीस आदिवासी विकास विभागातर्फे तहसीलदार (Tehsildar) / उपविभागीय अधिकारी (Sub Divisional Officer / Sub Divisional Magistrate) पदाच्या त्याच्या समतुल्य अधिकार असलेला अधिकाऱ्यातर्फे जातीचा दाखला देण्यात येतो, सदर जातीच्या दाखल्यास अनुसूचित जमाती प्रमाणपत्र म्हणून ओळखले जाते.

अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी म्हणजे काय ?

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमाती (Schedule Tribe) अंतर्गत येणाऱ्या नागरिकांना भारतीय कायद्यानुसार शिक्षण, सरकारी नोकरी, निवडणूक, सरकारी योजना यामध्ये काही प्रमाणात आरक्षण दिलेले आहे. सदर आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी व्यक्तीस तो अनुसूचित जमाती मध्ये मोडतो हे सिद्ध करून देणे आवश्यक असते, त्यासाठी अनुसूचित जमाती प्रमाणपत्र हे मुख्य कागदपत्र मानले जाते. परंतु अनेक समाजकंटकांद्वारे अनुसूचित जमाती अंतर्गत शासनातर्फे मिळणारे लाभ मिळवून घेण्याच्या उद्देशाने खोटी अनुसूचित जमाती प्रमाणपत्र सादर केली जातात. अश्या प्रकारांना आळा घालण्यासाठी शासनातर्फे जात प्रमाणपत्र छाननी समिती ची स्थापना करण्यात आलेली असून, या समितीद्वारे अनुसूचित जमाती अंतर्गत येणाऱ्या नागरिकांच्या प्राप्त अर्जानुसार त्यांच्या अनुसूचित जमाती प्रमाणपत्राची कसून चौकशी केली जाते, ज्या अंतर्गत अर्जदाराच्या वडलांचे, आजोबांचे, पणजोबांचे जुने कागदपत्र व सरकारी नोंदवहीतील रेकॉर्ड्स ची तपासणी केली जाते जसे कि च्या रक्तातील नातेवाईकांचे जातीचे दाखले, जात पडताळणी प्रमाणपत्रे, शाळा सोडायचे दाखले, जन्म मृत्यू नोंद, गाव नमुना १४, आदिवासी जमीन धारक असल्यास जुने ७/१२ चे दाखले व फेरफार व इतर कागदपत्रे. अश्या प्रकारे खऱ्या अनुसूचित जमाती प्रमाणपत्र धारकाची ओळख पटल्यानंतर त्यास जात वैधता प्रमाणपत्र देण्यात येते. अश्या प्रकारे खरे आदिवासी शोधून त्यांच्या  अनुसूचित जमाती प्रमाणपत्राची चौकशी करून जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध करून देणे या प्रक्रियेस अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी असे म्हणतात 

महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागातर्फे प्रामुख्याने शिक्षण, सरकारी नोकरी व निवडणूक ह्या गोष्टीसाठी जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रकरणे विचारत घेतली जातात. आपले अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी प्रकरण कसे करावे, लागणारी कागदपत्रे, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया या संबंधित सविस्तर माहिती या पोस्ट द्वारे आपण जाणून घेणार आहोत

अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी करण्यापूर्वीची पूर्व-तयारी

  1. आपल्याकडे असलेले अनुसूचित जमाती प्रमाणपत्र हे FORM C स्वरूपाचे आहे याची खात्री करून घ्या.
  2. आपल्याकडे असलेले अनुसूचित जमाती प्रमाणपत्र हे तहसीलदार (Tehsildar) / उपविभागीय अधिकारी (Sub Divisional Officer / Sub Divisional Magistrate) यांच्या कार्यालयामार्फत अधिग्रहित केलेले आहे कि नाही याची खात्री करून घ्या.
  3. आपल्याकडे असलेले अनुसूचित जमाती प्रमाणपत्रावर Outward No / MRC No, बारकोड क्रमांक, जातीच्या दाखला प्रदान केल्याचा पूर्ण दिनांक (DD/MM/YYYY), सक्षम अधिकाऱ्याची डिजिटल स्वाक्षरी, प्रमाणपत्र निर्गमित करणाऱ्या अधिकाऱ्याचा हुद्दा नमूद आहे कि नाही हे तपासून घ्या 
  4. आपल्याकडे असलेले अनुसूचित जमाती प्रमाणपत्रावर आपले नाव हे आधार कार्ड, इयत्ता १० वी गुणपत्रक, अधिवास प्रमाणपत्र व इतर महत्वाच्या कागदपत्रांनुसार बरोबर आहे कि नाही याची खात्री करून घ्या यदा कदाचित जर आपल्या जातीच्या दाखल्यात बदल असेल तर आपण नवीन जातीच्या दाखला काढून त्यानंतर ज्जात पडताळणीसाठी अर्ज करावा, जेणेकरून भविष्यात नावात बदल असल्यामुळे महाविद्यालयीन प्रवेश, सरकारी नोकरी किंवा निवडणूक सारख्या महत्वाच्या गोष्टीना मुकावे लागणार नाही.
  5. आपल्याकडे असलेले अनुसूचित जमाती प्रमाणपत्रावर आपल्या जमातीचे नाव बरोबर असल्याची खात्री करून घ्या (उदा. कोळी महादेव जमातीचा उल्लेख महादेव कोळी असा असल्यास, KOKNA जमातीचे स्पेलिंग KOKANA असे असल्यास) (जमातींच्या नावाच्या यादी साठी येथे क्लिक करा)
  6. ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवाराकडे शिफारस पत्र असणे गरजेचे आहे
  7. ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवाराकडे १०० रुपये किमतीच्या बॉंड वर वंशावळ व प्रतिज्ञापत्र
  8. उमेदवाराकडे अलीकडच्या काळात काढलेला पासपोर्ट आकाराचा फोटो असणे गरजेचा आहे, ऑनलाईन अर्ज सादर करतांना उपलोड केलेला फोटो हा जात पडताळणी प्रमाणपत्रावर छापील स्वरुपात येतो

अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे 

इनपुट 

अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी साठी लागणारी आवश्यक कागदपत्रांच्या लिस्ट ची PDF  डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी संकेतस्थळ 

 

अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 

 

विभागानुसार जात प्रमाणपत्र छाननी समिती कार्यालये व संपर्क तपशील 

अं. क्र.कार्यक्षेत्र कार्यालय पत्ता
1मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हेअनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, ठाणे

कार्यालयाचा पत्ता : ठाणे समिती
पत्ता- ६ वा मजला, एमटीएनएल टेलिफोन एक्सचेंज बिल्डिंग, मावळी मंडळ शाळेजवळ, चरई, ठाणे - ४००६०१

2पालघर जिल्हाअनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, पालघर

कार्यालयाचा पत्ता : सहआयुक्त, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती,
पालघर, २०२, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती,
पालघर, प्रशासकीय इमारत अ, जिल्हाधिकारी मुख्यालय संकुल,
नवनगर, कोळगाव, पालघर प, पालघर- ४०१४०४

3नाशिक जिल्ह्यातील नाशिक, बागलाण, सरगाणा, कळवण, पेठ, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुके.अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, नाशिक १

कार्यालयाचा पत्ता : २ रा मजला, आदिवासी विकास भवन, जुना आग्रा रोड, रमाबाई आंबेडकर शाळेजवळ, नाशिक - ४२२००२

4नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, देवळा, चांदवड, नांदगाव, निफाड, येवला आणि सिन्नर तालुके आणि अहिल्यानगर जिल्हा.अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, नाशिक २

कार्यालयाचा पत्ता : २ रा मजला, डॉक्टर हाऊस, ठक्कर बाजार समोर, त्र्यंबक रोड, नाशिक - ४२२००२

Location : Click here for directions
5धुळे, जळगाव जिल्हेअनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, धुळे

कार्यालयाचा पत्ता : सहआयुक्त, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी तपासणी धुळे, सिंधूमाणिक बिल्डिंग, रेल क्र. ५३, एकविरा देवी हायस्कूल जवळ, शारदा नगर, देवपूर, धुळे - ४२४००५

Location : Click here for directions
6नंदुरबार जिल्हाअनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, नंदुरबार

कार्यालयाचा पत्ता : सहआयुक्त, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, नंदुरबार, आरटीओ (RTO) जवळ, साक्री रोड, नंदुरबार - ४२५४१२
7पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर जिल्हेअनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, पुणे

कार्यालयाचा पत्ता : जात पडताळणी समिती (CVC) पुणे, पुणे विभाग, ५ वा मजला, सी विंग, कपिल टॉवर्स, आरटीओ (RTO) कार्यालयाजवळ, पुणे - ४११ ००१.
8छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्हेअनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, छत्रपती संभाजीनगर १

कार्यालयाचा पत्ता : प्लॉट क्र. ८३५ एन-५, पाण्याच्या टाकीसमोर, सिडको, छत्रपती संभाजीनगर - ४३१००३
9परभणी, बीड, धाराशिव जिल्हेअनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, छत्रपती संभाजीनगर २

कार्यालयाचा पत्ता : १ ला मजला, मंगेश गॅस सर्व्हिसच्या वर, बजरंग चौक, एन-८, सिडको, छत्रपती संभाजीनगर - ४३१००३.
10नांदेड जिल्हाअनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, किनवट १

कार्यालयाचा पत्ता : अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, किनवट मुख्यालय छत्रपती संभाजीनगर, प्लॉट क्र. २६५, अभिराम बिल्डिंग, एन-१ सेक्टर सी, टाऊन सेंटर, काला गणपती मंदिराजवळ, सिडको, छत्रपती संभाजीनगर
11हिंगोली, लातूर जिल्हेअनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, किनवट २

कार्यालयाचा पत्ता : ए ४०१, तिसरा मजला, निशा बाफना प्लाझा, जालना रोड, आकाशवाणी चौक, चिंचन भवन समोर, छत्रपती संभाजीनगर
12अमरावती, अकोला, बुलढाणा जिल्हेअनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, अमरावती

कार्यालयाचा पत्ता : सना बिल्डिंग, राज्य माहिती आयोग कार्यालयासमोर, चपरासीपुरा, अमरावती - ४४४६०२
13यवतमाळ, वाशिम जिल्हेअनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, यवतमाळ

कार्यालयाचा पत्ता : सहआयुक्त आणि उपाध्यक्ष, अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, साई उत्तम व्हिला, बंगला क्र. ३, रांगोळी मैदानाजवळ, शास्त्री नगर, यवतमाळ - ४४५००१
14नागपूर, वर्धा जिल्हेअनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, नागपूर

कार्यालयाचा पत्ता : आदिवासी विकास भवन, गिरी पेठ, नागपूर - ४४० ०१०
15चंद्रपूर जिल्हाअनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती गोंदिया

कार्यालयाचा पत्ता : अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, डॉ. पिल्ले आयटीआय (ITI) इमारत, २ रा मजला, विद्याविहार शाळेजवळ, एस.टी. वर्कशॉप चौक, छत्रपती नगर, ताडोबा रोड, तुकुम, चंद्रपूर - ४४२४०१
16गोंदिया, भंडारा जिल्हेअनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, गडचिरोली

कार्यालयाचा पत्ता : अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, २ रा मजला, रूम क्र. २१४, आमगाव रोड, फुलचूर टोला, गोंदिया - ४४१६०१
17गडचिरोली जिल्हाअनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, चंद्रपूर

कार्यालयाचा पत्ता : अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, झेड. पी. कॉलनी कॉम्प्लेक्स परिसर, गडचिरोली - ४४२६०५.

तांत्रिक अडचणी संदर्भात हेल्पलाईन 

इमेल आयडी : helpdesk[at]trti[dash]maha[dot]in

संपर्क क्रमांक : +919529152114

संपर्क करण्याची वेळ : सोमवार ते शुक्रवार सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजे पर्यंत

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *