Home Study Material सिदो. कान्हू.

सिदो. कान्हू.

कंपनी सरकारला बंगाल, बिहार, ओरिसा प्रांतांचे दिवाणीचे हक्क बादशहा शाहआलमकडून मिळाल्यानंतर कंपनीच्या एजंटांनी या प्रांतातील शेतकऱ्यांकडून मोगलांनी ठरवून दिलेल्या साऱ्याच्या दुप्पट सारा वसूल करण्यास आरंभ केला. या जबरदस्त साऱ्यामुळे शेतकरी वर्ग त्यातल्या त्यात आदिवासी शेतकरी फार हवालदिल झाले. बिहार प्रांताच्या दक्षिण भागात संथाल या आदिवासी लोकांची दाट वस्ती


होती. सारा वसुली करणारे ठेकेदार त्यांच्यावर अत्याचार करू लागले. या भागात काही इंग्रजांनी जमिनी ताब्यात घेऊन त्या जमिनीत ते संथाल शेतकऱ्यांमार्फत निळीचे पीक घेऊ लागले. पीक तयार झाल्यावर फारच कमी किंमत ते संथाल शेतकऱ्यांना देत असत व निळीशिवाय दुसरे पीक घेऊ नये अशी सख्त ताकीद त्यांनी या गरीब शेतकऱ्यांना दिली होती. त्यामुळे या शेतकऱ्यांना उदरनिर्वाह करणेही अशक्य होऊन बसले. त्या काळात या भागातून रेल्वेमार्ग तयार करण्याचे काम सुरू झाले. त्या कामावर जाणाऱ्या संथाल स्त्री-पुरुषांचे धर्मांतर ख्रिस्ती पादरी त्यांच्यावर दबाव आणून करीत असत. त्यामुळे संथाल जातीचे स्त्री-पुरुष धर्मभ्रष्ट होऊ लागले. या तिन्ही कारणांनी संथाल जमातीत इंग्रज सरकारविरूद्ध मोठ्या प्रमाणात असंतोष फैलावला होता. त्यातूनच जून १८५६ मध्ये संथाल लोक इंग्रज सरकारविरुद्ध लढा देण्यास उद्यक्त झाले.

बिहारमधील राजमहल जिल्ह्यातील भगनाडीह या गावी ‘चुलू’ नावाचा संथाल राहात होता. त्याचे चार पुत्र होते. १. सिदो. २. कान्हू ३. चांद ४. भैरो. या चौघांनी संथाल लोकांत असा प्रचार सुरु केला की, आपल्या कुलदेवतेने आम्हांला स्वातंत्र्य प्राप्तीसाठी साऱ्या संथाल जातीचे नेतृत्व करण्याचा आदेश दिला आहे व भगवान शंकरांनीही तसा साक्षात्कार आम्हाला घडविला आहे. इंग्रज सरकारशी लढा देऊन सर्व संथालांनी स्वातंत्र्यप्राप्ती करुन घ्यावी. त्यासाठी सर्व संथाल स्त्री पुरुषांची एकजूट होणे जरूरीचे आहे. संथाल जाती निरक्षर व देवभोळी. त्या जातीच्या लोकांचा या चारही भावांवर आदरपूर्ण विश्वास बसला व या चौघा भावांनी संथालांचे मोठे सैन्य उभारले. प्रत्येक संथालाजवळ धनुष्यबाण, तलवार, भाला व परशु (कुन्हाड) ही परंपरागत हत्यारे होती. ती हत्यारे चालविण्यात, नेमबाजी करण्यात ते तरबेज होते.
___ ३० जून १८५६ रोजी दहा हजार संथाल वीर भगनाडीह या सिदोकान्हूच्या गावी एकत्र जमले. त्यांनी सिदोला आपला नेता, राजा म्हणून घोषित करून कान्हूला आपला सेनापती म्हणून निवडले. सिदोने जाहीर केले की, “आता आपले संथाल राज्य स्थापनझाले आहे. दुसऱ्या कोणत्याही राजाचा वा सरकारचा आमच्यावर हक्क नाही. सर्व प्रजेकडून जास्तीत जास्त चार आणे कर दरवर्षी घेतला जाईल आणि व्याजाचा दर रुपयाला एक पैसा दरवर्षी द्याला लागेल” या घोषणेने जमलेल्या संथाल लोकांत आनंदी आनंद पसरला. त्याच वेळी अशी एक घटना घडली की, तीमधून संथालांचा संघर्ष सुरू झाला.

दीघी येथील इंग्रज सरकारच्या फौजदाराने आणि आमडापाडा येथल्या मोठ्या महाजनांना दोन संथालांना पकडून भागलपूरला चालविले, अशी बातमी एका संथालाने धावत पळत येऊन सिदो कान्हू यांना सांगितली. तेथे जमलेला संथाल जन-समूह खवळला. सिदो व कान्हू लगेच आपल्या अनेक संथालांसह त्या दोन्ही संथालांना सोडवून आणण्यासाठी धावले. तेथे गेल्यावर सिदोने त्या फौजदाराला सांगितले की, ‘आमच्या या दोन्ही संथाल बांधवांना सोडून द्या’ तेव्हा फौजदाराने आपल्या कडक आवाजात उत्तर दिले, “तुम्ही सारे येथून निघून जा. सिदो व कान्हू यांना कैद करा.” हे ऐकताच संथालांचा तो जमाव खवळलालगेच तो जमाव त्या फौजदारावर, महाजनावर व त्यांच्या सोबत असलेल्या शिपायांवर तुटून पडला. त्यात

तो फौजदार, महाजन व काही शिपाई ठार झाले. त्यांनी पकडलेल्या दोन्ही संथाल बांधवासह ते सारे परत फिरले.

संथाल सेनेने कंपनी सरकारला आपल्या देशातून हाकून लावण्याची प्रतिज्ञा घेतली. जेथे तेथे इंग्रजांनी वस्ती होती, तीवर संथालांनी हल्ले सुरू केले. इंग्रजांना सळो की पळो करुन सोडले. त्यांचा नारा होता, ‘जमीनदार, महाजन (सावकार), पोलिस व सरकारच्या कर्मचाऱ्यांचा नाश हो.’ संथाल सेनेच्या अनेक तुकड्या होत्या. प्रत्येक तुकडीच्या सैनिकांजवळ धनुष्यबाणादि परंपरागत हत्यारे होती. नेमबाजीत प्रत्येक संथाल तरबेज होता. प्रत्येक तुकडीचा एक मुखिया ठरवून दिलेला होता.

एक तुकडी पुलकीपूर गावी गेली. तेथे निळीचे गोरे कारखानदार राहत होते. त्या तुकडीने त्यांच्यावर हल्ला करुन त्यांना ठार केले. दूसरी तुकडी साहबगंजकडे निघाली. तेथल्या गोऱ्यांना त्याची बातमी समजली व तो नावांत बसून गंगेतून जीव घेऊन पळून गेले. भागलपूरचा कलेक्टर राजमहल येथे राहायचा. एक तुकडी राजमहलला त्याला मारुन टाकण्यासाठी गेली. पण तो आपल्या मित्राच्या घरी लपून बसला, म्हणून वाचला.
पैलापूरला निळीचे बरेच इंग्रज कारखानदार राहात होते. संथाल सैन्याने त्यांच्यावर हल्ला केला. सरकारने ताबडतोब भागलपूरहून ५०० शिपायांची एक पलटन पाठविली. तुंबल युद्ध झाले. सरकारी शिपायांचा धीर सुटला. संथालांचा विजय झाला.पण सरकारी शिपायांच्या गोळीबारात अनेक संथाल वीर मारले गेले. सेनापती कान्हूही त्यात मरण पावला. या युद्धानंतर कहलगावपासून राजमहलपर्यंत व सैंथिया तसेच राणीगंज पर्यंतचा प्रदेश १५ दिवस संथालच्या ताब्यात होता. त्यामुळे संथालांचा उत्साह वाढला. त्यांचे सैन्य पकौड, महेशपूरकडे निघाले. कदमसरच्या निळीच्या कारखान्यावर हल्ला केला. पकौडहून ते सैन्य वीरभूम जिल्ह्यातील पलसा, महेशपूर ला आले. तेथे इंग्रज शिपायांशी त्यांचे घनघोर युद्ध झाले. त्यात २०० संथाल वीर मारले गेले. अनेक जखमी झाले. रघुनाथपूर व संग्रामपूर येथेही त्यांनी इंग्रज सैन्याशी सामना दिला. सिदो आपले सैन्य घेऊन बडहैतला आला. बडहैतच्या लढाईत अनेक संथाल वीर मारले गेले. तेथेच एका विश्वासघात्याने सिदोला पकडून दिले. त्याच्याबरोबर अनेक संथाल पकडले गेले. २४ जुलै रोजी बडहैत इंग्रज सैन्याने जिंकले.

[irp]

संथालचे दमन करण्यासाठी दामिन, इ. कोह जिल्ह्यात ब्रिगेडियर जनरल लॉयड व कर्नल बर्ड खास मोठ्या सैन्यासह आले. या जिल्ह्याच्या उत्तर भागातून दक्षिण भागात आले. सप्टेंबर १८५६ मध्ये ते दुप्पट उत्साहाने या भागात लढू लागले. संथालांच्या या सैन्याने या जिल्ह्याचा देवघरपासून नैऋत्येकडील सीमेपर्यंतचा दक्षिण भाग संथालच्या ताब्यात आला. त्या भागात महामारी सुरु झाल्याने अनेक संथालवीर त्या रोगाला बळी पडले. बिहारच्या दक्षिण भागात सरकारने मार्शल लॉ जारी करुन सर्वत्र १४ हजार सैन्य विखरुन ठेवले. त्यामुळे संथालांना माघार घ्यावी लागली. तरीही ३० हजार संथाल वीर त्या भागात होते. ते लहानसहान हल्ले करीतच राहिले. त्यांनी आपल्या प्राणांची पर्वा केली नाही. आतापर्यंत १० हजार संथालांनी प्राणार्पण केले होते.

[irp]

सिदो आणि त्याच्याबरोबर पकडले गेलेल्या सर्व संथालांना इंग्रज सेनाधिकाऱ्यांनी अपार जनसूमहासमक्ष फासावर लटकावले. त्यानंतर सरकारने संथालांना काही सवलती दिल्या. हा जंगल तराईचा सर्व भाग कंपनी सरकारच्या ताब्यात आला. ख्रिस्ती मिशनरी त्या भागात गावोगाव गेले. गावागावात त्यांनी सरकारच्या मदतीने चर्च उभारले व ते मोठ्या प्रमाणात संस्थालांचे ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करु लागले. त्या भागाला कंपनी सरकारने ‘संथाल परगणा हे नाव दिले.

स्वातंत्र्य -प्रिय संथाल आदिवासींनी सिदो व कान्हू यांच्या नेतृत्वाखाली संघठित होऊन कंपनी सरकारशी जबरदस्त लढा दिला. आपल्या स्वातंत्र्यासाठी आणि प्रतिष्ठेसाठी हजारो संथाल वीरांनी या स्वातंत्र्य युद्धात बलिदान केले. ते या वीर जमातीला भूषणावह ठरले.

[irp]

संदर्भ :

महान भारतीय क्रांतिकारक

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!