Home Study Material सआदत खाँ

सआदत खाँ

नानासाहेब पेशव्यांचे दूत त्यांची पत्रे व निरोप उत्तरेकडे पंजाबपासून दक्षिणेकडे कर्नाटकापर्यंत गुप्तरीत्या पोचवीत होते. इंग्रजांच्या जुलमी राजवटीमुळे भारतातील राजा-महाराजांपासून सर्व जनतेला असह्य झाली होती. साऱ्या देशात त्यांची गुंडगिरी चालू होती. राव-रंकांचे शोषण ते जबरदस्तीने करीत होते. देशात इंग्रजांविरुद्ध सर्वत्र एकाच वेळी इंग्रजांविरुद्ध उठाव करण्याचे निश्चित झाले होते. पण तो उठाव एकाच दिवशी न होता, वेगवेगळ्या दिवशी भारतभर सुरू झाला.

मध्य भारतातील इंदूरच्या तुकोजीराव (दुसरे) होळकरांनाही नानासाहेबांचे गुप्त पत्र या संबंधात मिळाले होते. तुकोजीरावांनासुद्धा इंग्रजांची अरेरावी असह्य झाली होती. पण इग्रजांच्यापेक्षा आपली ताकद कमी असल्याने ते स्वतः प्रत्यक्ष उठाव करू शकत नव्हते. तरीही त्यांचा प्रमुख गोलंदाज सआदत खाँ याने १८५७ मध्ये इंग्रजांविरूद्ध उठाव केलाच. त्या आधी ६ जून १८५७ रोजी इंदूरजवळच्या नीमच छावणीतील देशी सैन्याने उठाव केला. त्यामुळेइंदूरमध्ये राहणाऱ्या इंग्रजांना धडकी भरली. त्यांनीयथाशक्ती आपल्या संरक्षणाचे उपाय योजले. तेवढ्यात महितपूर छावणीतील माळवा पलटणीने १० जून १८५७ रोजी विद्रोह केला. १४ जून १८५७ रोजी झाशी येथील सैन्याने उठाव केला. १८ जून १८५७ रोजी इंदूरमध्ये इंग्रज रेसिडेंटच्या निवासस्थाना जवळील अफूच्या गोदामाजवळील तीन तोफा विद्रोही सैनिकांनी छावणीजवळच्या चौकात आणून ठेवल्या. तेथून त्या तोफा दूर करू दिल्या नाहीत.

सआदत खाँराजस्थानातील मेवात गावचे रहिवासी होते. दिसायला सुंदर पण बलवान तरूण होते. ते इंदूरला येऊन तुकोजीराव होळकरांच्या सेवेत दाखल झाले. आपल्या पराक्रमाने त्यांनी महाराजांचा विश्वास संपादन केला. महाराजांनी त्यांची नेमणूक आपल्या सैन्याचा प्रमुख गोलंदाज म्हणून केली.इंदूरमध्ये भोपाळचा एक नबाब वारिस मुहम्मद खाँ हा राहत होता. त्याने सहादत खाँची भेट घेऊन विद्रोह करायचे ठरविले. होळकरांच्या सेवेतील मौलवी अब्दुल समद, कमांडर रहमतुल्ला, जमादार शेर खाँ, हवालदार दुर्गाप्रसाद व जमादार मुहम्मद अली हे त्यांचे साथीदार होते.

[irp]

इंदूर रेसिडेन्सीच्या संरक्षणासाठी होळकरांच्या सैन्यातील ३०० घोडेस्वार सैनिक खान नदीच्या किनारी तैनात होते. सआदत खाँने त्यांना तेथून ३० जून रोजी परत बोलावून घेतले. त्यांच्याऐवजी दुसरे सैनिक तेथे पाठविले नाहीत. म्हणून रेसिडेंट ड्यूरेण्ड याने तेथला खजिना महूच्या छावणीत पाठवायचे ठरविले. सैनिकांनी तो आदेशमानला नाही. होळकर महाराजांचा आतून पाठिंबा या विद्रोही नेत्यांना होता. एवढेच नव्हे, तर त्यांनी त्यांना गुप्तपणे साहाय्य देण्याचे कबूल केले होते.

___ सआदत खाँ सात-आठ घोडेस्वरांसह लष्करी पोशाखात रेसिडेन्सीमध्ये आले व त्यांनी तेथल्या सैनिकांना आवाहन केले. ‘सज्ज व्हा. इंग्रजांना मारून टाका.’ तेथे उपस्थित असलेले सर्व सैनिक व नागरिक इंदूर रेसिडेन्सीतील रेसिडेंट कर्नल ड्युरेण्ड यांच्या बंगल्यासमोर आले. सर्वात पुढे सआदत खाँ होता. त्याचे व ड्युरेण्डचे संभाषण चालू असतांना ड्यूरेण्ड ने त्याला शिवी दिली. त्यामुळे सआदत खाँ ने आपल्या बंदुकीतून त्याच्या रोखाने गोळी झाडली. थोडक्यात चुकले व ती गोळी ड्यूरेण्डचा गाल व कान छेदून गेली. घायाळ अवस्थेत तो आपले सारे कुटुंब घेऊन सिहोरला निघून गेला. १ जुलै १८५७ रोजी इंदूरच्या सदर बाजारात विद्रोह भडकला. इंदूरच्या सदर बाजारात विद्रोह भडकला. सारे इंदूर शहर हादरून गेले. सआदत खाँने आपल्या तोफखान्याला गोळीबार करण्याचा आदेश दिला. त्यात २९ इंग्रज मारले गेले. कर्नल ट्रॅवर्सने आपल्या सैनिक तुकडीला विद्रोही सैनिकांवर गोळीबार करण्याचा आदेश दिला. पण त्या सैनिकांनी त्याला धुडकावून लावले. विद्रोही सैनिकांच्या गोळीबारात पोस्टातले व तार घरातले अनेक इंग्रज अधिकारी मारले गेले. त्यांनी रेसिडेन्सीला इंग्रजांच्या ताब्यातील खजिना लुटला आणि सगळ्या इंग्रजांचे बंगले जाळून टाकले.

सआदत खाँने आपला एक साथीदार भगीरथ बारगीर याला एक पत्र देऊन दिल्लीला बहादुरशाह जफरकडे पाठविले. बहादुरशाहने त्याच्याजवळ तुकोजीराव होळकरांना एक परवाना दिला. तो परत येत असता हातोदजवळ देपालपूरच्या तहसीलदाराने त्याला पकडले व देपालपूरला नेऊन भगीरथ बारगीरला फाशी दिली.

[irp]

इंग्रजांना मोठी कुमक मिळाली. तेव्हा ड्यूरेण्डने तुकोजीराव होळकरांना पत्र देऊन कळविले की, ‘तुमही जर विद्रोही सैनिकांना शासन करीत नसाल, तर ते काम आम्हांला करावे लागेल.’ तेव्हा सआदत खाँ आणि सर्व साथीदार इंदूरमधून पसार झाले परंतु त्याचा राग इंग्रजांनी इतर सैनिकांवर व नागरिकांवर काढला. त्यांनी ११ विद्रोही सैनिकांना बंदुकीच्या गोळ्यांनी ठार केले. २१ सैनिकांना व नागरिकांना जन्मठेपेच्या शिक्षा दिल्या. ३१ लोकांना नोकरीतून काढून टाकले आणि ६१ सैनिकांना व नागरिकांना कमीजास्त वर्षांच्या सक्त मजुरीच्या शिक्षा दिल्या.

सआदत खाँ भूमिगत होऊन गरीबीत दिवस काढू लागले. लुटलेल्या खजिन्यातील एका पैशालाही त्यांनी हात लावला नाही. ते झालवाडमध्ये नोकरी करीत होते. त्यांना इतका कमी पगार मिळत होता की, जेमतेम तो पोट भरण्या इतकाच होता. त्यांनापकडण्यासाठी इंग्रज सरकारने मोठे बक्षीस जाहीर केले होते. त्या बक्षीसाच्या लोभाने त्यांच्याच एका नातेवाईकाने त्यांना पकडून दिले. त्यांना इंदूरला आणून त्यांच्यावर राजद्रोहाचा व विद्रोहाचा आरोप ठेवून खटला दाखल करण्यात आला. सुनावणीत त्यांनी न्यायालयात बाणेदारपणे सांगितले, ‘खुदा के बाद मैं केवल महाराजा होळकर के प्रति वफादार हूँ। उनका नमक मैंने खाया है।’ शेवटी या क्रांतिकारकाला देहदंड देण्यात आला आणि त्यांना फाशी देण्यात आले. हा इमानदार, स्वातंत्र्य प्रिय देशभक्त आपल्या मातृभूमीच्या मातीत मिसळून गेला.

[irp]

संदर्भ :

महान भारतीय क्रांतिकारक

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!