Home Study Material विश्वनाथ शाहदेव

विश्वनाथ शाहदेव

१८५७ च्या स्वातंत्र्य युद्धात छोटा नागपूरची जनता, त्या भागातील सामंत आणि त्यांचे सैनिक यांचा महत्त्वपूर्ण भाग होता. डोंगरदऱ्या, पठारे, नद्या व जंगलांनी व्यापलेल्या या प्रदेशात त्यांनी इंग्रज सरकारचा पायाच हादरवून सोडला होता. रांची, लोहरदगा आणि हजारीबाग यामधील प्रदेश यांची समरभूमी होती. सध्याच्या रांची जिल्ह्यातील बडकागडचा राजा विश्वनाथ शाहदेव याने त्या भागातील युद्धाचे नेतृत्व केले होते.

सन १८३४ मध्येच विश्वनाथ शाहदेवाच्या परिवाराचा इंग्रज अधिकाऱ्यांशी संघर्ष सुरू झाला होता. रांची जिल्ह्यातील अधिकांश जमीन या परिवाराच्या मालकीची होती. इंग्रजांची प्रसारवादी नीती आणि कारभारातील त्यांचा हस्तक्षेप यामुळे विश्वनाथ शाहदेव इंग्रजांचे विरोधक बनले व त्यांनी १८५३ मध्येच इंग्रज सरकार विरूद्ध बंड उभारले होते.

१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध सुरू झाल्याच्या बातम्या छोटा नागपूर भागात येऊ लागल्या. डोरंडा येथील इंग्रजांच्या छावणीतील देशी पलटणीचा जमादार माधवसिंह याने अपल्या सैन्यासह हजारीबागला जातांना मेजर ग्राहमविरूद्ध छोटा नागपूरच्या पठारावर युद्धसुरू केले. २ ऑगस्ट १८५७ रोजी विश्वनाथ शाहदेवच्या नेतृत्त्वाखाली चुलुपाटी घाटीचा राजा उमरासिंह व शेख भिखारी यांच्यासह रांचीवर तोफा डागून ते शहर ताब्यात घेतले. छोटा नागपूरच्या प्रदेशातून इंग्रजांना हाकून लावून छोटा नागपूरचा प्रदेश स्वतंत्र केला. त्या सर्वांनी विश्वनाथ शाहदेवला छोटा नागपूरचा सुभेदार बनविले. त्या प्रदेशाचा कमिशनर डाल्टन, रांचीचा कलेक्टर डेव्हीस, न्यायाधीश ओक्स व पोलिस प्रमुख बर्च आपला जीव वाचविण्यासाटी बगोदर येथे पळून गेले. पिठौरियाचा राजा जगतपालसिंह कमिशनर डाल्टन याला मदत करीत होता. विश्वनाथ शाहदेव व त्याच्या साथीदारांच्या हालचाली डॉल्टनला कळवीत होता. विश्वनाथ शाहदेव व त्याच्या साथीदारांनी पिठौरियावर हल्ला करून जगतपाल सिंहाचा राजवाडा लुटून जमीनदोस्त केला. चुलुपाटी घाटीचा रस्ता उध्वस्त करून पिठौरिया घाटीत तोफा ठेवून जगतपाल सिंहाला इंग्रजांशी संबंध ठेवण्याचा मार्ग बंद केला.

राजा विश्वनाथ शाहदेव डोरंडाच्या देशी बंडखोर सैन्याच्या साह्याने छोटा नागपूरचा कारभार पाहू लागला. जगदीशपूरहून बाबू कुँवरसिंहाने एक पत्र पाठवून डोरंडाच्या सैन्याला जगदीशपूरला येण्याचे आमंत्रण दिले. माधवसिंह, जयमंगल पांडे व नादीर अली यांना वाटत होते की, आपण सैन्यासह कुँवरसिंहाच्या मदतील जावे.पोठियाचा विद्रोही नेता गणपत राय याला सुद्धा कुँवरसिंहाला सैन्यासह मदत करावी आणि रोहतासगड मार्गे दिल्लीला बहादुर शाहच्या मदतीला जावे असे वाटत होते. परंतु विश्वनाथ शाहदेवचे मत असे होते की, डोरंडचे सैन्य आपल्या भागातून तिकडे नेणे घातक ठरेल. छोटा नागपूरचे रक्षण आपण सर्वांनी एकजुटीने करावे, इंग्रजांना आपल्या प्रदेशात पुन्हा परत येऊ देऊ नये आणि आपल्या विरुद्ध असणाऱ्या ईसाई व शंभूनाथ सिंह यांचे दमन करावे, यासाठी हे सैन्य येथे राहणे आवश्यक आहे, असे विश्वनाथ शाहदेवने त्यांना सांगितले. पण त्यांनी ऐकले नाही. त्यांनी गणपत रायला डोरंडा सेनेचा प्रमुख म्हणून नियुक्त केले. विश्वनाथ शाहदेवचा विचार योग्य होता. पण त्या नेत्यांना न पटल्याने त्यांच्यात फूट पडली. जयमंगल पांडे याने मध्यस्थी करून सर्वांनी एकत्र बसून विचार करावा असा प्रस्ताव त्यांच्यापुढे ठेवला. त्याप्रमाणे सर्वांची बैठक झाली. तीत विश्वनाथ शाहदेवाने त्यांना सांगितले, ‘मी दिल्लीला जाण्याच्या विरोधात नाही. पण ही वेळ त्यासाठी योग्य नाही. पावसाळा संपू द्या. विजया दशमीनंतर आपण दिल्लीकडे कुँवरसिंहासह प्रस्थान करू.’ परंतु मतभेद मिटले नाहीत. तेव्हा जयमंगल पांडे याने सैनिकांना आदेश दिला की, ‘विश्वनाथ शाहदेव, गोपाल शाह, खुदा शाह, जगन्नाथ शाह, गणपत राय आदी सहा राजांना गिरफ्तार करा.’

सर्व राजांना गिरफ्तार करून डोरंडाचे सैन्य ११ सप्टेंबर १८५७ रोजी दिल्लीकडे निघाले. त्यात २०० घोडेस्वार, ६०० सैनिक, ४ तोफा आणि रसदीच्या ४६ गाड्या होत्या. हे सैन्य बरियातू वस्तीत पडाव टाकून राहिले असतांना जयमंगल पांडे याने विश्वनाथ शाहदेवसह ४ राजांना मुक्त केले. नंतर पुढे जाताना गणपत राय यालाही सोडून दिले. या सैन्याला इंग्रज सैन्याला इंग्रज सैन्याने चतरा येथे गाठले. तेथे अटीतटीचे युद्ध होऊन विद्रोही सैन्याचा त्यात पराभव झाला. विश्वनाथ शाहदेव आणि गणपत राय मागे फिरले. त्यांनी ऑक्टोबर १८५७ ते मार्च १८५८ पर्यंत छोटा नागपूर भागात स्वातंत्र्याची लढाई चालूच ठेवली. या दोन्ही नेत्यांनी पलामूचा खडवार नेते पीतांबर शाह व नीलांबर शाह. संबळपूरचा सुरेंद्र शाह, सिंहभूमचा राजा अर्जुन सिंह आदी अनेक नेत्यांना आपल्या लढाईत सामील करून घेतले. पालकोट, पलामू, गुमला व नवागड राज्यात या स्वातंत्र्यप्रेमी नेत्यांनी गनिमी काव्याने इंग्रजांना बेजार करून सोडले.

[irp]

इंग्रजांनी बोलावलेली मद्रास येथील मोठी सेना या प्रदेशात आल्यावर त्यांनी २३ सप्टेंबर १८५७ रोजी रांची शहर ताब्यात घेतले. पिठौरियाचा राजा जगतपाल सिंह याची मदत घेऊन इंग्रजांनी नवागडाकडे आपला मोर्चा वळविला. करसारजवळ विश्वनाथ शाहदेवाने त्यांच्याशी जबरदस्त टक्कर दिली. परंतु दुर्दैवाने विश्वनाथ शाहदेवइंग्रजांच्या हाती लागला. गणपत रायसुद्धा पकडला गेला. त्यांना १८ दिवस रांचीच्या तुरुंगात ठेवले. ओक्सच्या न्यायालयात विश्वानाथ शाहदेववर राजद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला. पिठौरियाचा राजा जगतपाल सिंह याने विश्वानथ शाहदेव याच्याविरूद्ध साक्षीदार न्यायालयात हजर केले. न्यायाचे नाटक संपले आणि विश्वनाथ शाहदेव याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. विश्वानाथ शाहदेव याने क्रुद्ध नजरेने जगतपाल सिंहाकडे पाहत भविष्यवाणी केली, ‘तुझ्या वंशाचे नावनिशाण सुद्धा राहणार नाही.’ आणि खरोखरच पुढच्या काळात जगतपाल सिंहाचे घराणे निर्वंश झाले.

__ ओक्स याने विश्वनाथ शाहदेवाच्या राज्यातील सर्व ११३ गावे, त्याची स्वतःची शेकडो एकर जमीन, त्याच्या खजिन्याली रोख रक्कम, जडजवाहिर वगैरे सारे काही जप्त केले. त्याच्या बडकागड किल्ल्यावर मद्रासी सैन्याकडून तोफा डागून तो किल्ला जमीनदोस्त करून टाकला. १६ एप्रिल १८५८ रोजी विश्वनाथ शाहदेव या स्वातंत्र्य योद्ध्याला सध्याच्या रांची येथील जिल्हा स्कूल गेटवर फाशी देण्यात आले.

[irp]

संदर्भ :

महान भारतीय क्रांतिकारक

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

MPSC GK Online Test 26

0

MPSC GK Online Test 30

1

MPSC Online Test 21

0

MPSC Online Test 5

0

Mahavitran Exam Question Set 3

0

MPSC GK Online Test 86

0

Hindi GK Quiz 7

0

MPSC Online Test 17

0

MPSC Online Test 29

0

MPSC GK Online Test 73

0

MPSC Current Affairs Quiz 1

0
error: Content is protected !!