Home Study Material राजा बख्तावर सिंह व राजा रघुनाथ सिंह

राजा बख्तावर सिंह व राजा रघुनाथ सिंह

माळव्यातील अमझेरा संस्थानचे राजा बख्तावर सिंह आणि त्यांचे पुत्र राजा रघुनाथ सिंह यांनी १८५७ च्या स्वातंत्र्य-युद्धात इंग्रजांच्या अनेक छावण्यांवर हल्ले करून इंग्रजांना पराभूत केले होते. या स्वातंत्र्ययुद्धाचे महान नेते तात्या टोपे जेव्हा अमझेरा येथे आले, तेव्हा बख्तावर सिंहांनी स्वातंत्र्य-युद्धा संबंधी त्यांच्याशी विचार-विनिमय केला आणि स्वातंत्र्य-युद्धात उडी घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांनी विंध्य पर्वताच्या डोंगर-दऱ्यांत वस्ती करून राहिलेल्या भिल्ल, राजपूत आणि मुसलमान वीरांना संघटित केले. त्यांना गनिमी काव्याचे प्रशिक्षण दिले.

बख्तावरसिंहांनी आपल्या सैन्यासह २ जुलै १८५७ रोजी इंग्रजांच्या भोपावर येथील छावणीवर आक्रमण केले. तेव्हा त्यांच्या सैन्यात १,५०० सैनिक होते. या सैनिकांनी छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यांची कत्तल करून त्या छावणीला आग लावून दिली. तेथे केशरी ध्वज फडकावला. छावणीचा कॅप्टन एचिनसन छावणी सोडून पळून गेला. बख्तावरसिंहच्या सैन्याला भरपूर शस्त्रे मिळाली. नंतर १० ऑक्टोबर रोजी पुन्हा त्या भोपावर छावणीवरबख्तावरसिंहांनी हल्ला केला, तेव्हाही त्यांना भरपूर शस्त्रे व तोफा मिळाल्या. त्या तोफा ते अमझेरा येथे घेऊन गेले. नंतर ११ ऑक्टोबर १८५७ रोजी माळव्यातील सरदारपूर छावणीवरचहुबाजूंनी त्यांनी आक्रमण केले. त्यामुळे इंग्रजांच्या छावणीतील सैन्य इकडेतिकडे पळाले व इंग्रजांच्या सेवेतील भिल्ल पलटणीने बख्तावर सिंहासमोर आत्मसमर्पण केले. या सफल आक्रमणांनी उत्साहित होऊन त्यांनी इंग्रजांच्यामानपूर गूजरी छावणीवर १६ ऑक्टोबर १८५७ रोजी हल्ला केला. ती छावणी ताब्यात घेतली. तिचे प्रमुख कॅप्टन केंटीज व जनरल क्लार्क पळून गेले. छावणी मधील शस्त्रे व तोफा बख्तावरसिंहाने ताब्यात घेतल्या .

माळव्यातील इंदूरपलीकडचा सगळा डोंगराळ व जंगलांचा नैर्ऋत्येचा विस्तृत प्रदेश बख्तावर सिंहांच्या ताब्यात आला. त्यानंतर त्यांनीकाही राज्यांच्या संस्थानिकांशी व त्यांच्या दिवाणांशी चर्चा करून संपूर्ण माळवा प्रदेश इंग्रजांच्या तावडीतून मुक्त करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तयारी सुरू केली. परंतु या भागात इंग्रजांनी मोठी सेना आणल्यामुळे त्यांचा दबदबा वाढू लागला. दुर्भाग्य असे की, एका भारतीय व्यक्तीनेच इंग्रजांची मर्जी संपादन करण्यासाठी १३ नोव्हेंबर १८५७ रोजी ते स्नान करीत असतांना अचानक धोका देऊन पकडून दिले. त्यांच्यावर राजद्रोहाच्या व विद्रोहाच्या आरोपाखाली खटला भरला. त्यात २१ डिसेंबर १८५७ रोजी त्यांना फाशीची सजा सुनावण्यात आली व १० फेब्रुवारी १८५८ रोजी त्यांना फाशी देण्यात आली.

[irp]

__जुलै १८५७ पासून बख्तारवर सिंहांचे पुत्र राज रघुनाथ सिंह आपल्या पित्याबरोबर प्रत्येक युद्धात पराक्रम गाजवीत होते. बख्तावर सिंहानंतर अमझेऱ्याच्या गादीवर राज्याभिषेक करून घेऊन ते बसले. त्यांनीही इंग्रजांविरूद्ध युद्धाची तयारी मोठ्या प्रमाणात सुरू केली. त्यामुळे इंग्रजांची चिंता वाढली. त्यांनी ग्वाल्हेरच्या शिंद्यांशी चर्चा केली. शिंद्यांच्या ताब्यात असलेला गुजराथमधील पंचमहाल जिल्हा आपल्या ताब्यात घेऊन त्यांना रघुनाथसिंहाचे अमझेरा राज्य दिले.

अमझेयाचा विद्रोह दडपून टाकण्याचा आदेश ग्वाल्हेरच्या पोलिटिकल एजंटने माळव्याच्या कमिशनरला दिला. त्याच्या आदेशाने इंग्रजांच्या सैन्याने व ग्वाल्हेरच्या शिंद्यांच्या सैन्याने एकत्र येऊन अमझेऱ्यावर आक्रमण केले. क्रांतिवीर रघुनाथ सिंहाने आपल्या सैनिकांच्या व जनतेच्या साह्याने त्यांचा प्रतिकार केला. पण शत्रूचे सैन्यबळ व युद्धसाहित्य मोठे असल्याने त्यांना माघार घ्यावी लागली. त्यानंतर पुन्हा इंग्रजांनी व शिद्यांनी लालगडवर आक्रमण केले. परंतु इंग्रजांचे सैन्य विध्य पर्वताच्या डोंगरदऱ्यात भटकले गेले. रघुनाथ सिंहांच्या भिल्ल व स्थानिक सैन्याने शत्रू सैन्यावर जबरदस्त आक्रमण केले. त्यांनी शत्रू पक्षाचे कित्येक सैनिक ठार झाले. इंग्रजांचा पराभव झालेला पाहून शिंद्यांनी इंग्रजांच्यावतीने रघुनाथ सिंहांशी तहाची बोलणी केली. इंग्रज सरकार अमझेरा मुक्त करील. रघुनाथ सिंहांनी इंग्रज छावण्यावर आक्रमण करू नये, असे ठरले.

[irp]

रघुनाथसिंहांनी मात्र सावधगिरीने लालगड किल्ला मजबूत केला. किल्ल्यात पुरेसे सैन्य तैनात केले. आसपासच्या डोंगरावर भिल्ल सैनिकांच्या तुकड्या ठेवल्या. त्यांनी वेळप्रसंगी अचानक हल्ले करायचे, अशा सूचना त्यांना देऊन ठेवल्या रघुनाथ सिंह धार्मिक वृत्तीचे होते, तरी त्यांच्या सैन्यात हिंदूबरोबर मुसलमान व भिल्ल सैनिकांची संख्या मोठी होती. त्यांची ते सतत काळजी घेत. त्यांना सोयी-सवलती उपलब्ध करून देत असते. जनतेतही ते लोकप्रिय होते.

__ तहात ठरल्याप्रमाणे इंग्रजांनी अमझेरा रघुनाथ सिंहांना सुपूर्द करायला हवा होता. पण रघुनाथ सिंहांनी त्यांच्याकडे अनेक वेळा मागणी करूनही इंग्रजांनी अमझेरा त्यांच्या ताब्यात दिला नाही शिंद्यांनी इंग्रजांना त्यासाठी तयार करायला हवे होते. पण ग्वाल्हेरचे शिंदे हे इंग्रजांपुढे लाचार बनले होते. इंग्रजांच्या मनाविरूद्ध कोणतीही गोष्ट करायची हिंमत त्यांच्यात नव्हती; मग ती न्याय्य असो वा अन्याय्य असो. इंग्रज तर लुटारूच होते. भारतातून जे काही हडपता येईल, ते हडपण्याची संधी ते चुकवत नसत. रघुनाथ सिंहांसारख्या राजाला ते काय दाद देणार? त्यांनी रघुनाथ सिंहांचा राजमहालसुद्धा त्यांना दिला नाही. इंग्रजांनी आपल्या पित्याला नाहक फाशी दिली हे शल्य ते विसरूच शकत नव्हते.

रघुनाथ सिंहांनी इंग्रजांच्या भोपावर, छावणीवर हल्ला करण्याची तयार केली. ते इंग्रजांना कळले. त्यांनी आपल्या व शिंद्यांच्या सैन्यासह लालगडवर चढाई केली. तुंबळ युद्ध झाले. इंग्रज सैन्याने किल्ल्यात प्रवेश केला. त्या युद्धात रघुनाथ सिंह हा स्वातंत्र्यप्रेमी व स्वाभिमानी राजा कामास आला. त्यानेही तोफा डागून लालगड जमीनदोस्त केला. रघुनाथ सिंहांच्या कुवर किसनसिंह यांच्यासह सर्व लहान राजपुत्रांचीही निष्ठूरपणे हत्या केली. राणीला अखेरचे जीवन वृंदावनला हरिभजनात घालवावे लागले.

[irp]

संदर्भ :

महान भारतीय क्रांतिकारक

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!