Home Study Material राजा नाहर सिंह

राजा नाहर सिंह

हरियाणा राज्यातील वल्लभ गडचा राजा शेवटचा मोगल बादशाह बहादूरशाह जफर याचा आदरपात्र होता. तो वीर, पराक्रमी आणि बुद्धिमानही होता. हिंदू व मुस्लिम धर्मियांत तो मुळीच भेदभाव करीत नसे. त्याने आपल्या किल्ल्यात मुसलमानासाठी संगमरवरी पाषाणांची मशीद बांधली व आपल्या बागेजवळच्या मैदानात सुदर ईदगाह सुद्धा बांधला होता. तोधर्मनिष्ठ असून धर्मनिरपेक्षवृत्तीने प्रजेशी वागत असे.

___ १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धात हरियाणामधील रोहतक, गुडगाँव, हिसार, सिरसा, पानीपत, स्थानेश्वर, अंबाला या जिल्ह्यांतील जनतेने, राजांनी व नबाबांनी मोठ्या उत्साहाने व धाडसाने भाग घेतला होता. हरियाणामध्ये कित्येक ठिकाणी तेथील राजे, नबाब यांनी आपल्या सैन्याच्या व जनतेच्या सह्याने इंग्रज सैन्याचा पराभव करून त्याला पिटाळून लावले होते. तसेच या स्वातंत्र्ययुद्धासाठी बादशाह बहादूरशाह जफर याला भरपूर आर्थिक मदतही केली होती. रसद पुरविली होती. या कार्यात वल्लभगडचा राजा नाहरसिंह याचा सिंहाचा वाटा होता. त्यांनी सुमारे पाच महिने हरियाणाचा हा प्रदेश इंग्रजांपासून मुक्त ठेवला होता.

मेरठच्या छावणीतील देशी सैन्याने इंग्रजांविरूद्ध हत्यार उपसले. तेथल्या इंग्रज अधिकाऱ्यांना ठार करून व तुरूंगातील कैद्यांना सोडवून ते ११ मे १८५७ रोजी दिल्लीला आले व त्यांनी बहादूरशाहजफरला दिल्लीच्या तख्तावर बसवून त्याला हिंदुस्थानचा बादशाह घोषित केले. तेव्हा दिल्लीच्या रक्षणाची व्यवस्था करताना बहादूरशाहने दिल्लीच्या पूर्वेकडील मोर्चावर राजा नाहरसिंहाची नेमणूक केली. नाहरसिंह यांनी दिल्लीच्या पूर्वेकडील भागात अनेक ठिकाणी भक्कम मोर्चेबंदी करून ठेवल्याने त्या बाजूने दिल्लीवर हल्ला करण्याची हिंमत इंग्रजांना अखेरपर्यंत झाली नाही. बरेलीहून पंधरा हजार फौजेसह दिल्लीत आलेला मोहम्मद बख्त खाँ याने दिल्लीचे सेनापती पद सांभाळले व तो इंग्रज सैन्याशी अखेरपर्यंत टक्कर देत राहिला. नाहरसिंहांनी आपली गुप्तहेर यंत्रणा भक्कम केली होती.

[irp]

___ दिल्ली साडेचार महिने बहादूरशाहच्या आधिपत्याखाली स्वतंत्र राहिली. इंग्रजांना पतियाळा, नाभा व जिंदच्यासंस्थानिकांनी सैन्याची, धनाची व रसदेजी मोठ्या प्रमाणात मदत केली. त्यांनी आणखी इंग्रज सैन्य आणले. त्यामुळे त्यांचे पारडे जड झाले. १३ सप्टेंबर १८५७ रोजी इंग्रजांनी काश्मिरी गेटमधून दिल्लीत प्रवेश केला; तेव्हा नाहरसिंहाने बहादूरशाहला त्याच्या जनान्यासह वल्लभगडला चलण्याची विनंती केली,पण बहादूरशाहचा व्याही इलाही बक्श हा इंग्रजांना फितुर झाला होता. त्याने बादशाहाला नाहर सिंहाबरोबर वल्लभगडला जाऊ दिले नाही. दिल्लीत क्रांतिकारी सैन्याचा इंग्रजांनी पराभव केला व २० सप्टेंबर १८५७ रोजी दिल्ली शहर ताब्यात घेतले. तेव्हा सेनापती मोहम्मद बख्त खाँ यानेही बहादूरशाहला आपल्याबरोबर लखनौला येण्याचा आग्रह केला. पण इलाहीबक्शने तेव्हा सुद्धा बादशाहाला त्याच्या बरोबर जाऊ दिले नाही. त्यानेच बहादूरशाहला हुमायूनच्या मकबऱ्यात जाण्यासाठी तयार केले. बहादूरशाह हुमायूनच्या मकबऱ्यात सहकुटुंब राहण्यास गेल्यावर इलाही बक्शने मेजर हडसन याला ती बातमी दिली. हडसनने त्या मकबऱ्यात जाऊन बादशाहाला व त्याच्या मुलं-नातवांना कैद केले. बादशाहाच्या मुलां-नातवांना त्याने खुनी गेटजवळ बंदुकेने ठार केले व त्यांचे रक्त तो प्याला आणि त्यांची मुंडकी कापून बादशाहकडे पाठवून दिली.

राजा नाहरसिंह यांनी स्वातंत्र्य युद्धात खंड पडू नये म्हणून दृढ निश्चय केला. नव्याने मोर्चेदी केली. आग्ऱ्याहून दिल्लीकडे जाणाऱ्या इंग्रजांच्या सैन्यात व नाहर सिंहाच्या सैन्यात घनघोर युद्ध झाले. त्या युद्धात नाहरसिंहांनी इंग्रजांच्या सैन्याची धूळधाण उडवून दिली. इंग्रजांचे बहुसंख्य सैनिक मारले गेले. शेकडो गोऱ्या सैनिकांना नाहसिंहांच्या सैन्याने कैद केले. इंग्रजांच्या लक्षात आले की, आपण नाहरसिंहाला युद्धात पराभूत करू शकत नाही. तेव्हा त्यांनी त्या युद्धात वेगळाच डाव टाकून पांढरे निशाण फडकविले युद्ध थांबले. इंग्रज सैन्याचे दोन प्रमुख नाहरसिंहांना वल्लभगडच्या किल्ल्यात भेटायला आले. त्यांनी नाहरसिंहांना सांगितले की, ‘इंग्रज व बहादूरशाह यांच्यात संधीची बोलणी चालू आहेत. त्यासाठी बादशाहांनी तुम्हांला दिल्लीला बोलाविले आहे. म्हणूनच आम्ही पांढरे निशान फडकवले आहे.’ कसेही असो, नाहरसिंह विजयाच्या आनंदात हे विसरून गेला की, बादशाहाचा दूत इंग्रजांकडे येण्याऐवजी माझ्याकडेच यायला पाहिजे होता. इंग्रजांचा डाव ते ओळखू शकले नाहीत. ते दिल्लीकडे निघून गेले. दिल्ली तर आता इंग्रजांच्या ताब्यात होती. नाहरसिंहांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यात प्रवेश केला, तेव्हा आत लपून बसलेले गोरे सैन्य त्यांच्यावर तुटून पडले. नाहरसिंह जखमी झाले. त्या अवस्थेतच त्यांना गोऱ्या सैनिकांनी अटक केली.

इंग्रजांनी दुसऱ्याच दिवशी वल्लभगडावर जबरदस्त आक्रमण केले. नाहरसिंहाचे सेनापती गुलाबसिंह यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या सैन्याने तीन दिवसापर्यंत घनघोर युद्ध केले. त्यात इंग्रजांचा विजय झाला. वल्लभगड इंग्रजांनी ताब्यात घेतला.

नाहरसिंहावर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला. सुनावणीचे नाटक संपले. तेव्हा बहादूरशाहला अटक करून त्यांच्या मुलांचा शिरच्छेद करून त्यांचे रक्त पिणारे मेजरहडसन पुढे येऊन नाहरसिंहांना म्हणाला, “फांशीच्या शिक्षेतून तुला सुटायचे असेल, तर तू स्वतः हून आत्मसमर्पण कर.” नाहरसिंह समजून चुकले होते की, इंग्रज लोक विश्वास घातकी व धोकेबाज आहेत. तेव्हा त्यांनी त्या नरपशूला बाणेदारपणे उत्तर दिले. ‘नाहरसिंह शत्रूसमोर शरणागती पत्करणारा राजा नाही, हे लक्षात ठेव. इंग्रज आमचे शत्रू आहेत. मी त्यांची क्षमा मागूच शकत नाही. एक नाहर नाही राहिला, तर उद्या त्याच्या सारखे लाखो नाहर आमच्या देशात जन्म घेतील.’ ते ऐकताच तो नीच हडसन संतापाने लालबुंद झाला. आणि त्याने जाणूनबुजून नाहरसिंहांना दिल्लीच्या चांदणी चौकात त्यांच्या जन्मदिनीच फाशी देण्याचे न्यायाधिशाकडून वदवून घेतले.

[irp]

९ जानेवारी १८५८ हा दिवस नाहरसिंहांचा वाढदिवस होता. त्या दिवशी त्यांनी ३५ वे वर्ष ओलांडले होते. त्यांना फांशी देण्याआधी विचारण्यात आले, ‘तुमची शेवटची इच्छा काय आहे?’ त्यावर नाहरसिंहांनी ताठ मानेने उत्तर दिले, ‘की तुम्हाला आणि इंग्रज सरकारला काही मागून माझा स्वाभिमान सोडू इच्छित नाही. मी तर माझ्यासामोर उभ्या असलेल्या माझ्या देशबांधवांना हेच सांगतो की, क्रांतिची ही भडकलेली आग मुळीच विझू देऊ नका.’

त्यानंतर चांदणी चौकातील कोतवालीजवळ नाहरसिंहांना फाशी देण्यात आली. त्यांच्या बरोबरच त्यांचे सेनापती गुलाबसिंह, खुशालसिंह आणि भुरेसिंह या तिघांनाही तेथेच फासावर चढविण्यात आले. तेथे जमलेलल्या जनतेची अंतःकरणे दुःखाने चूर चूर होऊन गेली. भारतमातेच्या या सुपुत्रांनी तिच्या स्वातंत्र्यासाठी तिच्या पुढील बलिवेदीवर आपल्या प्राणांचे बलिदान केले. हरियाणाची जनता अजूनही या वीरांचे गुणगान परंपरागत गीतांमधून करते आहे. वल्लभगडात नाहर सिंहांची भव्य छत्री तेथल्या जनतेने उभारली असून वल्लभगडमध्ये त्यांच्या नावाने एक पार्क तयार केला आहे. अन्य हुतात्म्यांसाठी एक हुतात्मा स्मारक सुद्धा उभारले आहे.

[irp]

संदर्भ :

महान भारतीय क्रांतिकारक

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!