Home Study Material गंगानारायण

गंगानारायण

कंपनी सरकारने बादशहा शाहआलमकडून बंगाल, बिहार व ओरिसा प्रांताचे दीवाणी हक्क प्राप्त केल्यानंतर या राज्यामधून सारावसुली मोठ्या प्रमाणात सुरु केली. या राज्यांत ज्या जमिनींची सारा पूर्वीच्या सत्ताधीरांनी माफ केला होता, त्या जमिनी जप्त करण्याची मोहीम कंपनी सरकारने उघडली. बिहारच्या दक्षिण भागातील अशा कर विहीन जमिनी मानभूम व बराभूम भागात होत्या. त्या भागातील जमीनदारांची जमीनी जे शेतकरी कसत होते, त्या शेतकऱ्यांना सर्व कर माफ होते. अशा शेतकऱ्यांना भूमिज म्हणत असत. भूमिज म्हणजे वंशपरंपरेने आपल्या ताब्यातील जमीन कसणारे. करमाफीच्या बदल्यात ते जमीनदारांच्या आवश्यकतेनुसार त्यांच्याकडे सैनिक म्हणून काम करायचे. त्यांना पाईक’ असे म्हणत असत व त्यांची जमीन ‘पाईकान जमीन’ म्हणून ओळखली जायची. या पाईकान जमिनीही कंपनी सरकारने जप्त केल्यामुळे हजारो भूमिज शेतकऱ्यांत कंपनी सरकार विरुद्ध असंतोष माजला होता. त्यामुळे सन १७६९ पासून हे भूमिज शेतकरी सरकार विरुद्ध लहान मोठे उठाव करीत होते. त्या उठावांचा बंदोबस्त १८१६ साल पर्यंत कंपनी सरकारने करुन टाकला होता. तरी भूमिज शेतकऱ्यांच्या मनात असंतोषाचा अग्नी धुमसतच होता. हे सारे आदिवासी लोक होते.
बराभूमचा राजा रघुनाथ नारायण १७९८ साली मरण पावला. त्याच्या दोन राण्या होत्या. मोठ्या राणीचा पुत्र माधवसिंह आणि धाकट्या राणीचा पुत्र गंगागोविंद यांच्यात उत्तराधिकावरुन वाद सुरु झाला. तेव्हा कंपनी सरकारने गंगागोविंदची बाजू घेऊन त्याच्याकडे राजपद सोपविले. माधवसिंहाने त्याच्या विरुद्ध उठाव सुर केला. तेव्हा कंपनी सरकारने माधव सिंहाला कैद करण्याची धमकी दिली. त्यानंतर समझोता होऊन माधवसिंहाला बराभूमचे दीवाणपद देण्यात आले.

दीवाणपदी आल्यानंतर माधवसिंहाची मनमानी सुरु झाली. गंगागोविंदला साथ देणाऱ्या त्याच्या चुलत भावाची – गंगानारायणची सरदारी त्याने रद्द करुन टाकली. इतर सरदारांवरही जबरदस्त कर लादले. प्रजेवरही गृहकर लागू केला. तो राज्याचा पैसा हडप करुन सावकारीही करायचा व कर्जदारांकडून जबरदस्त व्याज घ्यायचा. कर्जदाराने व्याज न दिले, तर त्याची मालमत्ता जप्त करायचा. त्यामुळे सारे सरदार व भूमिज शेतकरी एकत्र झाले. गंगानारायणने त्यांची एक सेना संगठित केली व अन्य सरदारांना हाताशी धरुन माधवसिंहाला ठार केले.
१ मे १८३२ रोजी गंगानारायणने कंपनी सरकारच्या अधिकाऱ्यांकडे आपला मोर्चा वळवला आणि आपल्या सैन्यासह बडाबाजारमधील इंग्रजांच्या मुन्सफाची कचेरी नष्ट करुन तेथला बाजारही लुटला. तेथले ठाणे ही जाळून टाकले. तेव्हा कंपनी सरकार चिडले. बांकुडाचा कलेक्टर रसेल आपल्या सैन्यासह गंगानारायणला दडपून टाकण्यासाठी धावून आला. गंगानारायणने आपल्या तीन हजार भूमिज सैनिकांसह रसेलला चहुबाजूंनी घेरले तेव्हा घाबरुन जाऊन तो बांकुडा येथे पळून गेला. बराभूमच्या पूर्वेकडील भागातील अनेक मोठमोठ्या गांवावर गंगानारायणने आपल्या भूमिज सैन्यासह हल्ले केले व तेथल्या इंग्रज कर्मचाऱ्यांना हाकून लावले. त्या भागातले व मेदिनीपूर जिल्ह्यातले भूमिज सैनिकही गंगानारायणला येऊन मिळाले. आता गंगानारायणजवळ मोठे सैन्य जमले. बराभूमचा बहुतेक भाग इंग्रजांच्या नियंत्रणातून मुक्त झाला. गंगानारायणच्या पाठीशी बराभूमचे सरदार, जमीनदार व भूमिज शेतकरी खंबीरपणे उभे होते.

[irp]

अखेर कंपनी सरकारने कलकत्त्याजवळील बराकपूर छावणीतील सैन्य बराभूममध्ये पाठविले. ले. ज. कूपरने गंगानारायणच्या सैन्यावर अनेक हल्ले केले. पण तो अयशस्वी झाला. तेव्हा बर्दवानचा कमिशनर बॅडन आणि छोटा नागपूरचा कमिशनर डेंट यांना त्यांच्याकडील सैन्यासह या मोहिमेवर कंपनी सरकारने पाठविले. ऑगस्ट १८३२ पासून फेब्रुवारी १८३३ पर्यंत इंग्रजांच्या सर्व सैनिकांनी बराभूम भागांतील आदिवासीवर खूप अत्याचार केले. त्यांची गावे जाळण्यात आली. त्यांच्या जमिनीतली पीके नष्ट केली गेली. त्यांच्या खळ्यांतले धान्य जाळले गेले. पेरणीसाठी बी सुद्धा राहू दिले नाही. प्रत्येक गावातील गुरेढेरे पकडून त्यांचे लिलाव करण्यात आले. हाती लागलेली संपत्ती सैनिकांना वाटून दिली. तरीही इग्रज सैन्याला गंगानारायणचे हे आंदोलन दडपून टाकता आले नाही.

[irp]

सन १८३३ मध्ये गंगानारायण आपल्या सैन्यासह जवळच्या सिंहभूम जिल्ह्यात गेले. तेथल्या आदिवासी लढवय्यांसह त्यांनी खरसवानचे ठाकूर चेतनसिंहांच्या हिंदू शहर ठाण्यावर त्यांनी हल्ला केला. त्या हल्ल्या ठाकूरांच्या शिपायांनी त्यांना ठार केले. इंग्रजांच्या नव्हे, तर भारतीय ठाकूरांच्या शिपायांकडून त्यांना मरण आले. आपल्याच देशबांधवांच्या परस्पर वैमनस्यांतून व परधार्जिण्या वृत्तीतून तसेच फितुरीने असे कित्येक क्रांतिकारक मारले गेले आहेत, हे आपल्या देशाचे फार मोठे दुर्दैव होय.

[irp]

संदर्भ :

महान भारतीय क्रांतिकारक

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

General Knowledge Test Paper 2

0

भीमाबाई

0

MPSC GK Online Test 75

0

MPSC GK Online Test 50

0

MPSC GK Online Test 12

0

Hindi GK Quiz 17

0

MPSC Online Test 4

0

MPSC GK Online Test 32

0

MPSC Online Test 16

0
error: Content is protected !!