Home Study Material अहमदअलीखान

अहमदअलीखान

फर्रुखनगर हे हरियाणा राज्यातले दक्षिणेकडील एक नगर असून ते दिल्ली पासून २० मैल अंतरावर आहे. अठराव्या – एकोणवीसाव्या शतकात तेथे एक लहानसे राज्य होते. बलोच नबाबाच्या वंशजांचे ते राज्य होते. सन १८५७ ते स्वातंत्रयुद्ध सुरू झाले, त्यावेळी त्या राज्यावर नबाब अहमद अलीखान राज्य करीत होता. दिल्लीवर स्वातंत्र्य सैनिकांनी ताबा मिळवून बादशाह बहादुरशाह जफर याला ‘भारताचा बादशहा’ म्हणून घोषित केले. त्यानंतर बादशहाने भारतातील अनेक राजांना या युद्धात सामील होण्यासाठी पत्रे लिहिली. त्यांचा आशय असा होता

___“हे हिन्द के सपूतों, यदि हम संकल्प करें, तो शत्रु को क्षणभरमें नष्ट कर सकते हैं। हम शत्रुओंका नाश कर अपनी जान से प्यारे दीन और स्वदेश को पूरी तरह भयमुक्त कर लेने में कामयाबी हासिल कर लेंगे।”
बहादुरशाहच्या अशा पत्रांनी लहान लहान राज्यांचे मालक युद्धासाठी प्रवृत्त झाले होते. अशा राज्यांच्या राजांवर, विश्वासघात, वचनभंग, अत्याचार, अकार्यक्षम असे वाटेल ते आरोप ठेवून ती राज्ये आपल्या घशात घालण्यासाठी इंग्रज सदैव टपलेले असत, मग ते आरोप खरे असोत की खोटे असोत. त्यांची चौकशी न्याय्यरित्या करणे तर दूरच. वरील आशयाचे बादशहाचे पत्र मिळाल्यावर फर्रूखनगरच्या अहमद अली खान या राजाच्या मनातही स्वातंत्र्य संग्रामात उडी घेण्याची ऊर्मी जागृत झाली. नबाब अहमद अली खानने आपले इंग्रजांशी असलेले संबंध तोडून टाकले व बाहशाह व क्रांतिकारी सैन्याला साथ देण्याचे जाहीर केले.

स्वातंत्र्य-संग्रामात अहमद अली खान सतत बादशाहशी संपर्क ठेवीत होता. बादशहाला जेव्हा जेव्हा आवश्यकता भासली, तेव्हा तेव्हा रोख रक्कम, हत्यारे, रसद अहमद अलीखानने बादशहाला पुरविली. त्याने २ सप्टेंबर १८५७ रोजी बादशाहला एक पत्र लिहिले.

“जहाँपनाह का हुक्म मिलने के बाद इस गुलाम ने बंदुको की रसद पूरी कर दी है।… जादा तादाद में बंदुकें उपलब्ध नहीं हो सकीं। लेकिन जितनी भी जादा-से-जादा बंदुकें मैं इकठ्ठी कर सका हूँ, इब्राहिम अलीखान के हाथों भिजवा रहा हूँ।… लुहारों से जैसे ही बंदुकें तैयार होती जाएँ, फौरन शाही फौज को रवाना कर दी जाएगी।”
__इंग्रज पलटणीनी पश्चिमेकडून पंजाब मधून दिल्लीत प्रवेश केला होता, परंतु फर्सखनगर, वल्लभगड, गाजियाबादच्या प्रदेशांतून मात्र इंग्रजांच्या फौजा दिल्लीकडे जाऊ शकल्या नाहीत. जेव्हा दिल्लीच्या सैनिकांना पराभव पत्करावा लागला, बहादुरशाहला इंग्रजांनी कैद केले, त्याला सजा दिली, तेव्हा कोठे सहा महिन्यानंतर इंग्रज पलटणी फर्रूखनगरकडे आल्या. अहमदअलीखानाच्या सैन्याने तीन दिवस इंग्रजी पलटणीवर तोफगोळ्यांचा भडीमार केला. सैनिकांनी ही आपल्या बंदुकांतून सतत गोळीबार चालू ठेवला. परंतु इंग्रजांच्या मोठ्या सैन्यापुढे त्यांना माघार घ्यावी लागली. त्या लढाईत कितीतरी निरपराध, निर्दोष लोकांचे नाहक बळी गेले. अखेर महलसरा भागात इंग्रजांनी नबाब अहमद अली खान याला कैद केले. त्याच्या हातात हातकड्या घालून फर्रूखनगरच्या प्रमुख रस्त्यावरून त्याला दिल्लीला आणले. दिल्लीतच अहमद अली खानावर खटला दाखल करण्यात आला. १२ जानेवारी १८५८ रोजी खटल्याची सुनावणी सुरू झाली. इंग्रजांनी त्याच्यावर खालील आरोप ठेवले

“हिंदुस्थानात इंग्रज सरकारचा प्रजानन असूनही १० मे १८५७ पासून डिसेंबर १८५७ पर्यंत फर्रूखनगरात, आसपासच्या क्षेत्रांत आणि इतर ठिकाणीही इंग्रज सरकार विरुद्ध विद्रोह करण्यासाठी व युद्ध करण्यासाठी विद्रोहाचा प्रचार करणारा पत्रव्यवहार केला, अशा प्रकारे इंग्रज सरकारविरुद्ध कार्य केले. विद्रोही लोकांना मदत केली. त्यांना इंग्रज सरकार विरुद्ध भडकावले. इंग्रज सरकारचे राज्य नष्ट करण्यासाठी व युद्ध करण्यासाठी विद्रोहींना प्रेरणा दिली; अशा प्रकारे या प्रदेशातून इंग्रजी सत्ता नाहीशी करण्यासाठी प्रयत्न केले, याने इंग्रज सरकारविरूद्ध स्वतः युद्ध केले. याचे हे सारे कार्य १८५७ च्या १६ व्या कायद्यान्वये मोठा गुन्हा होता.”

त्यानंतर अहमद अली खानला विचारण्यात आले, “तुमच्या विरूद्ध लावल्या गेलेल्या या आरोपाखाली तुम्ही स्वतःला अपराधी समाजतां की, निरपराधी.” तेव्हा अहमद अली खानने ताठ मानेने निर्भयतेने जोरात उत्तर दिले, “निरपराधी.”

त्यानंतर कमिशनर कार्यालयातील मुंशी चिमनलाल व बहादुरशहांचा इंग्रजांना फितुर झालेला हकीम अहसानुल्ला खाँ यांच्या साक्षी झाल्या. त्यांनी नबाब अहमद अली खानाचा पत्रव्यवहार न्यायाधीशापुढे सादर केला. अकरा दिवस या खटल्याचे कामकाज चालले. १३ जानेवारी १८५७ रोजी या खटल्याचा निकाल देण्यात आला.

[irp]

“सर्व साक्षीदारांच्या साक्षी विचारात घेऊन या अदालतीने निर्णय केला आहे की, फर्सखनगरचा नबाब कैदी अहमद अली खान सर्व आरोपांबद्दल दोषी ठरला आहे. म्हणून ही अदालत अहमद अली खान नबाब फर्रूखनगर याला फांसावर लटकविण्याची वजोपर्यंत तो मरणार नाही, तो पर्यंत फासावर लटकवून ठेवण्याची शिक्षा देण्यात येत आहे आणि त्याची सर्व चल-अचल संपत्ती जप्त करण्याचा आदेश देत आहे.”

मेरठ डिव्हीजनचा कमांडर मेजर जनरल पेनीने त्यावर शिक्कामोर्तब केले आणि जाहीर केले की, “उद्या दुपारी चार वाजता याला फांशी देण्यात येईल.”

त्यानुसार २४ जानेवारी १८५८ रोजी नबाब अहमद अली खान याला दुपारी ४ वाजता. दिल्लीच्या चांदणी चौकात आम जनतेसमोर फांशी देण्यात आले. नंतर त्याचा मृतदेह इंग्रज अधिकाऱ्यांनी गुपचूप दिल्लीच्या किल्ल्याच्या खंदकात फेकून देऊन आपल्या सभ्यतेचे दर्शन घडविले. किती सार्थक आहे या ओळी!

कुछ खेल नहीं है आजादी। इसमें है खुदकी बर्बादी ॥

[irp]

संदर्भ :

महान भारतीय क्रांतिकारक

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

MPSC GK Online Test 5

0

Mahavitran Exam Question Set 6

0

MPSC Online Test 27

0

घासीसिंह

0

MPSC GK Online Test 91

0

MPSC GK Online Test 102

0

MPSC Online Test 16

0

MPSC GK Online Test 57

0

Mahavitran Exam Question Set 5

0

MPSC Current Affairs Quiz 6

0
error: Content is protected !!