अस्पृश्यांचा लष्करी पेशा

150

पुस्तकाचा सारांश

अस्पृश्यांचा लष्करी पेशा
अस्पृश्यांचा लष्करी पेशा

कै. चांगदेव खैरमोडे यांनी लिहिलेल्या “अस्पृश्यांचा लष्करी पेशा” या पुस्तकात ईस्ट इंडिया कंपनीच्या नोकरीत असलेल्या महार सैनिकांच्या तुकड्यांचा व इ. स. १९४१ मध्ये उभ्या केलेल्या महार रेजिमेंट मधील महार सैनिकांच्या बहादुरीचा व कर्तव्यपरायणतेचा मानाने उल्लेख केला आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या अनेक लहान मोठ्या लढाया झाल्या त्या सर्व लढायात महार पलटणींनी उल्लेखनीय कर्तबगारी दाखविली हे नमूद करताना मला फार आनंद वाटतो, व महार रेजिमेंटचा पुष्कळ वर्षे कर्नल कमांडंट राहिल्याकारणाने त्याचा गर्व पण वाटतो.

प्रथम महार रेजिमेंट मध्ये फक्त महार जातीच्या जवानांनाच प्रवेश मिळत असे. पण थोड्याच वर्षात इतर जाती जमातीच्या जवानांना पण प्रवेश मिळू लागला. सुरुवातीला स्पृश्य -अस्पृड्य हा भेदभाव थोड्या प्रमाणांत होता यात काही शंका नव्हती पण फारच लौकर हा भेदभाव नष्ट झाला व आता तर त्याचे नावनिज्ञाणसुद्धा राहिले नाही. ज्या ज्या लढाईत महार पलटणींनी भाग घेतला त्या सर्व लढायात त्या फलटणी तल्या स्पृशय-अस्पृज्य जवानांनी उत्तम कामगिरी दाखविली. त्यामुळे महार रेजिमेंट नाव भारतीय सैन्यात फार वरच्या दर्जाला पोचले आहे. महार काय किंवा इतर जातींचे जवान काय यांच्यामध्ये आम्ही कसलाही फरक करीत नाही किंवा भेदभाव दाखवीत नाही. आमच्या दृष्टीने महार रेजिमेंट मध्ये नोकरी करणारा मग तो कोणी असो आम्ही त्याला महारच समजतो.

इ. स. १९५० साली उत्तर कोरीया व दक्षिण कोरिया या दोन देशात युद्ध सुरु झाले. उत्तर कोरियाच्या मदतीला चीन व रशिया हे देज्ञ आले व दक्षिण कोरियाच्या मदतीला युनायटेड नेञन्सचे प्रचंड सैन्य लढाईत उतरले. ही घनघोर लढाई १९५३ साली थांबली. आणि हिच्यात सुमारे सत्तर हजार चीनी व उत्तर कोरियन सैनिक युनायटेड नेशन कमांडच्या हाती सापडले. तसेच २००-३०० इंग्रज, अमेरिकन व दक्षिण कोरियन सैनिक उत्तर कोरियन सैन्याच्या ताब्यात गेळेलढाई थांबल्यानंतर या युद्धकैद्यांना आपआपल्या देशी पाठविण्याची वेळ आली तेव्हा दोन्ही वाजूच्या या कैद्यांनी स्वदेशी जाण्यास साफनकार दिला. तेव्हा या कैद्यांचे काय करावयाचे हा प्रश्‍न उभा राहिला. पुष्कळ वाटाघाटी नंतर Neutral Nations Repatriation Commission व त्यांच्या मदतीला Indian Castodian Force कोरियाला पाठविण्यात आला. त्यांचा कमांडर म्हणून माझी नेमणूक झाली. मी माझ्या पाच हजार सैन्याची जुळवाजुळव करताना तिसर्‍या महार पलटणीच्या “वी” कंपनीचा माझ्या सैन्यात समावेश केला मला सांगावयाला आनंद वाटतो की, या कंपनीने कॅएन बक्षी यांच्या अधिपत्याखाली फारच उत्तम कामगिरी केली. त्यांच्या कार्यक्षमतेचे अभिनंदन सर्व राष्ट्रांनी मुक्त कंठाने केले.

या पुस्तकाचे नाव जरी “अस्पृश्यांचा लष्करी पेक्षा” हे आहे, तरी यात महारांच्या खेरीज इतर अस्पृश्य जमातींचा निर्देश नाही. या इतर जातींचाही विज्ञेषतः मांग, रामोशी व चांभार जातीचा लष्करी पेश्ाशी संबंध होता. छत्रपती शिवाजी महाराज रामोशी व मांग जातींचा किल्यांच्या बाहेरील परिसराचे संरक्षण करण्यासाठी नेहमी उपयोग करीत. दुसऱया महायुद्धात चांभार जमातीची एक फलटण उभी केली होती. तिनेपण चांगली कामगिरी केली होती. एकंदरीत महार, मांग रामोशी व चांभार जातींच्या अस्पृश्यांनी लष्करात ईमाने इतबारे व उल्लेखनीय कामगिरी बजावली यात शंका नाही. त्यांच्या वंशजांना याचा गर्व वाटला पाहिजे.

Preview

Download E-Book
Download Now

This file is not uploaded on Bhartijahirat.com we are only providing download link

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाबद्दल थोडक्यात

स्वतंत्र भारतातील महाराष्ट्राच्या ज्ञानविज्ञानाच्या क्षेत्रातील आधुनिक गरजा आधीच हेरुन महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय श्री. यशवंतरावजी चव्हाण यांनी दिनांक १ मे १९६० रोजी, महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या वेळी शासनाची जी धोरणविषयक प्रमेये जाहीर केली त्यात मराठी साहित्य, कला व संस्कृती या क्षेत्रातील कार्याची प्रगती होईल असे आश्वासन दिले होते. त्याच धोरणानुसार महाराष्ट्राचे साहित्य, इतिहास व संस्कृती यांच्या विकासासाठी दिनांक १९ नोव्हेंबर १९६० रोजी शासनाने “साहित्य संस्कृती मंडळाची” स्थापना पहिल्यांदा पाच वर्षाकरिता केली.

“महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने” प्रकाशित केलेली ४०० हून अधिक पुस्तके वाचकांसाठी PDF, Mobi, EPub या पोर्टेबल फॉरमॅटस् मधे विनामूल्य उपलब्ध केली आहेत. या बरोबरच सदर ४००हून अधिक पुस्तके ‘जशीच्या तशी’ स्कॅन करून वाचकांसाठी PDF या पोर्टेबल फॉरमॅटस् मधे विनामूल्य उपलब्ध केली आहेत. डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा..

दिनांक 19 नोव्हेंबर 1960 च्या ज्या शासकीय ठरावान्वये मंडळाची प्रथम स्थापना झाली त्या ठरावानुसारच शासनाने मंडळाकडे खालील उद्दिष्टे व जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत –

  • महाराष्ट्राचे साहित्य, संस्कृती व इतिहास या क्षेत्रातील संशोधनांचे प्रकल्प वा योजना यांच्या पूर्ततेसाठी चालना देणे, मदत करणे वा अशा योजना मंडळाने स्वतः हाती घेणे.
  • अशा संशोधनांचे मराठीतून प्रकाशन करण्यासाठी चालना देणे, मदत करणे वा मंडळाने स्वतः प्रकाशित करणे.
  • स्वतंत्र व विद्यमान्य प्रबंध, व्याप्तिलेख, ग्रंथ, नियतकालिके त्याच प्रमाणे ज्ञानविज्ञानाच्या कोणत्याही शाखेतील कोणत्याही अन्य लेखनाचे मराठीतून प्रकाशन करण्यासाठी चालना देणे, मदत करणे वा मंडळाने ते स्वतः प्रसिद्ध करणे.
  • साहित्य अकादमीने आधीच भाषांतरासाठी हाती घेतलेले ग्रंथ वगळून मराठीखेरीज अन्य भारतीय भाषा व परदेशी भाषा यातील अन्य उत्कृष्ट ग्रंथांची मराठीत भाषांतरे करुन घेणे व ती प्रसिद्ध करणे. तसेच, अशा भाषांतराच्या योजनांस चालना देणे व मदत करणे.
  • महाराष्ट्राचा इतिहास व संस्कृती यांची प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे आधारभूत अशी महत्त्वाची प्रकाशित वा अप्रकाशित साधनसामग्री (कागदपत्रे) संपादित करणे, मराठीत भाषांतरित करणे व प्रसिद्ध करणे आणि अशा योजनांना चालना देणे, मदत करणे वा त्या योजना स्वतः कार्यान्वित करणे.
  • महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व वाङ्‌मयीन इतिहासाचे संपादन व प्रकाशन करण्याबाबतच्या योजनास चालना देणे, मदत करणे वा अशा योजना स्वतः कार्यान्वित करणे.
  • साहित्यविषयक संशोधन व साहित्याची अभिवृद्धी याबाबत शासकीय धोरण आखण्यासाठी शासनास मदत करणे.

Other Books

Posts not found

 

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here